डॉ. कुणाल खेमनार : वाढदिवस शुभेच्छा
महाराष्ट्राचे साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांचा १५ ऑक्टोबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्राच्या प्रशासन क्षेत्रातील ते एक आश्वासक चेहरा आहेत. त्यांच्या कामाची शैली खूप वेगळी असून, मोठा उरक आहे.
२०११ च्या बॅचचे आयएस अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी २ एप्रिल २०२४ रोजी साखर आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. ते आतापर्यंतचे सर्वात तरुण साखर आयुक्त आहेत.
डॉ. खेमनार हे २००८ मध्ये मुंबईच्या किंग एडवर्ड मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस झाले आणि २०११ मध्ये ते आयएएस झाले. देशात त्यांचा ८७ वा रँक होता. त्यांच्यावर पहिली जबाबदारी गडहिंग्लज (कोल्हापूर) येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून आली.
साखर आयुक्तपदी नेमणूक होण्यापूर्वी ते पुणे महानगर पालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त पदावर काम करत होते. तेथील त्यांचा कार्यकाल पूर्ण झाला होता. त्यांनी कोविड काळामध्ये केलेली कामगिरी कौतुकास्पद ठरली.
खेमणार हे ऑगस्ट 2020 मध्ये महापालिका अतिरिक्त आयुक्त पदावर रुजू झाले होते. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये त्यांनी अत्यंत उत्तमपणे कामकाज पाहिलं. तसेच त्यांनी केलेल्या होर्डींग्जवरील कारवाई मुळे ते चर्चेत राहिले होते
महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तपदी त्यांनी तब्बल तीन वर्षे आठ महिने काम पाहिले. त्यांच्यावर पुणे महानगर परिवहन विभागाचाही काही काळ अतिरिक्त कार्यभार होता. या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांनी आपल्या शैलीचा ठसा उमटवला होता.
‘शुगरटुडे’च्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा…