डॉ. राहुल कदम यांच्या कामगिरीचा ‘बिझनेसवर्ल्ड’कडून गौरव

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नवी दिल्ली : उदगिरी शुगर अँड पॉवर लि.चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) डॉ. राहुल कदम यांच्या औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रांतील योगदानाची प्रसिद्ध ‘बिझनेसवर्ल्ड’ या नामांकित मॅगेझीनने दखल घेतली आहे. ‘व्हीजनरी लीडर’ असा त्यांचा विशेष लेखात गौरवास्पद उल्लेख करून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले आहे.
यापूर्वीही डॉ. कदम यांच्या साखर उद्योग आणि अन्य क्षेत्रांतील नेतृत्त्वाची प्रशंसा राष्ट्रीय करण्यात आलेली आहे. ‘बिझनेस टुडे’ने ‘इन्स्पायरिंग इंडियन लीडर्स’ या मुखपृष्ठ कथेमध्ये देशभरातील नामवंत उद्योजकांत डॉ. राहुल कदम यांना स्थान दिले होते. आता ‘बिझनेसवर्ल्ड’ने त्यांच्यावर विशेष लेख प्रसिद्ध केला आहे.

या लेखामध्ये डॉ. कदम यांनी उदगिरी शुगरमध्ये राबवलेल्या विविध योजना आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उहापोह करण्यात आला आहे. ‘आरपीसी’ अर्थात रोटरी पार्टिकल कलेक्टर तंत्रज्ञान वापरणारा उदगिरी शुगर आशिया खंडातील पहिला साखर कारखाना आहे. त्याबाबतही लेखात माहिती दिली आहे. तसेच डॉ. कदम यांच्या सीएसआर कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »