उदगिरी शुगरची वेगवान प्रगती
उदगिरी शुगर अँड पॉवर लि.चे चेअरमन डॉ. राहुलदादा शिवाजीराव कदम यांचा 26 मार्च रोजी वाढदिवस. त्यानिमित्त ‘शुगरटुडे परिवारा’च्या त्यांना हार्दिक शुभेच्छा.
चेअरमन डॉ. राहुल कदम हे शांत, संयमी, जिज्ञासू वृत्तीचे अभ्यासू व्यक्तीमत्व आहे. त्यांचे शिक्षण बी.ई. (कॉम्प्युटर्स), एमबीए (मार्केटिंग व एचआर) असून त्यांनी व्यवस्थापनामध्ये पीएच. डी. मिळविलेली आहे.
डॉ. राहुलदादा हे साखर क्षेत्राबरोबरच आयटी, फार्मा, ऑटोमोबाईल, हॉर्टिकल्चर तसेच बांधकाम क्षेत्रामध्येही कार्यरत आहेत. तरुण वयात त्यांनी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवल्याने ते अल्पावधीत यशस्वी उद्योजक म्हणून परिचित झाले आहेत.
वेस्ट इंडियन शुगर्स असोसिएशनचे संचालक म्हणूनही त्यांनी यशस्वीपण काम केलेले आहे. या संस्थेच्या माध्यमातून खासगी साखर कारखान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत.
डॉ. राहुलदादा कदम यांनी 2014 पासून उदगिरी कारखान्याच्या चेअरमन पदाची जबाबदारी स्विकारली असून ती यशस्वीपणे पार पाडत आहेत. कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम आणि मा.आ. मोहनराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राहुलदादा यांनी अल्पावधीत कारखान्याचा नांवलौकीक वाढविलेला आहे.
दैनंदिन 2500 मे.टन ऊसाचे गाळप, 14 मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्पाची विक्रमी म्हणजे केवळ 9 महिन्यामध्ये बामणीच्या उजाड माळावर उभारणी पूर्ण करण्यात येवून यशस्वी चाचणी गळीत हंगाम घेतलेला आहे. तसेच 30 हजार लिटर्स क्षमतेचा आसवणी प्रकल्प डिसेंबर, 2015 पासून कार्यान्वित केलेला आहे आणि तो आता दीड लाख लिटर क्षमतेचा केला आहे. तर गाळप क्षमता ५ हजार मे. टन केली आहे.
डॉ. राहुलदादा यांच्या कुशल नेतृत्वाखाली कारखान्याने आतापर्यन्तचे सर्व गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडले आहेत. या सर्व हंगामामध्ये शेतकऱ्यांना वेळेत एफआरपी प्रमाणे पेमेंट दिलेले आहे. त्याच बरोबर विविध हंगामामध्ये मिळून एकूण 59 कोटी 66 लाख रुपये एफआरपी पेक्षा जादा रक्कम शेतकऱ्यांना दिलेली आहे.
कामकाजातही आधुनिक तंत्रज्ञान
कारखान्याने विविध विभागाचे कामकाजामध्ये सुसूत्रता यावी, कामे बिनचुक व वेळेत व्हावीत याकरिता अत्याधुनिक ईआरपी सिस्टीम बसविलेली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या ऊसाची नोंद प्रत्यक्ष त्यांचे बांधावर जावून सॅटेलाईट प्रणालीद्वारी घेतली जाते. ऊस तोडणी-वाहतुकीची स्लीप डायरेक्ट नंबर ट्रेकींग तसेच वजन काट्यास फिड होते.
आरपीसी (रोटरी पार्टिकल कलेक्टर) हे अत्याधुनिक अमेरिकी तंत्रज्ञान वापरणारा उदगिरी शुगर हा आशियातील पहिलाच साखर कारखाना आहे. त्यामुळे प्रदूषण पातळी शून्यावर आली आहे. हे तंत्रज्ञान पाहण्यासाठी देशभरातून शिष्टमंडळे कारखान्याच्या भेटी देत असतात.
डॉ. राहुलदादा यांच्या कुशल नेतृत्वाखाली कारखान्याने केलेली प्रगती :
- 1) कारखाना गाळप क्षमता 2500 मे.टना वरुन 5000 मेटन विस्तारवाढ.
- 2) आसवणी प्रकल्प क्षमता 30,000 लिटर्सवरुन 150,000 लिटर्स विस्तारवाढ
- 3) कारखान्यामध्ये ईआरपी प्रणालीचा वापर, प्रामुख्याने शेती विभागामामध्ये प्रभावी वापर.
- 4) सर्वप्रथम एक रकमी एफआरपी देणारा कारखाना म्हणून नांवलौकीक.
- 5) कारखान्यामध्ये प्रदुषण कमी करणेसाठी अमेरिकन पेटंट असलेले रोटरी पार्टीकल कलेक्टर यंत्राची उभारणी.
- 6) कारखाना व डिस्टिलरीमधून वाया जाणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करणारे कंडेंसेट पॉलिशींग युनिटची उभारणी.
- 7) डिस्टिलरीमधील स्पेंटवॉश पासून पोटॅश खत निर्मिती प्रकल्प,
- 8) कारखान्याच्या शेडवर 200 केडब्ल्यु क्षमतेचा रुफटॉप सोलर प्रकल्प,
विविध पुरस्कार
डॉ.राहुलदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉ. शिवाजीराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या झालेल्या प्रगतीचा विचार करून कारखान्यास राज्य तसेच देश पातळीवरील विविध पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामुळे अल्पावधीत आदर्श कारखाना म्हणून कारखान्याचा नावलौकीक झालेला आहे.
- पुरस्कार *
- वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे यांचा गळित हंगाम 2016-17 करिता “बेस्ट टेक्नीकल इफिसिएन्सी” पुरस्कार प्राप्त. गळित हंगाम 2019-20 करिता “सर्वोत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन” पुरस्कार प्राप्त. सन 2020-21 करिता “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन” पुरस्कार प्राप्त.
- पर्यावरणपूरक हरित ऊर्जा निर्मिती करिता कारखान्याचे को-जन निर्मिती प्रकल्पास “इंडिया ग्रीन एनर्जी” पुरस्कार 2020-21 प्राप्त को-जन असोसिएशन ऑफ इंडियाचा बेस्ट को-जन पॉवर प्लॅन्ट अवॉर्ड, 2023.
- चिनी मंडी या संस्थेचा बेस्ट एन्व्हार्यमेंट फ्रेंडली शुगर मील 2024 पुरस्कार प्राप्त.
- महाराष्ट्र डिजिटल मिडीया संपादक-पत्रकार संघटना (DMEJ) यांचा कारखान्याचे चेअरमन डॉ. राहुलदादा कदम यांना महाराष्ट्र महागौरव पुरस्कार 2024 प्रदान.
- भारतीय शुगर्स या संस्थेचा युथ आयकॉन ऑफ शुगर इंडस्ट्रिज पुरस्कार कारखान्याचे चेअरमन डॉ. राहुलदादा कदम यांना प्रदान 2024
सीएसआर फंडातून अनेक सामाजिक कामे
डॉ. राहुलदादा यांची समाजाच्या विकासासाठी सतत काही तरी करण्याची तळमळ असते. डॉ. शिवाजीराव कदम आणि डॉ. राहुलदादा यांनी उदगिरी कारखान्याच्या माध्यमातून सीएसआर फंडातून विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांना आज अखेर एकूण दीड कोटींपेक्षा अधिक निधी वाटप केलेला आहे.