डिस्टिलर्स असोसिएशनच्या कार्यकारी मंडळावर डॉ. राहुल कदम यांची नियुक्ती

पुणे : उदगिरी शुगर अँड पॉवर लि. चे (Udagir Sugar & Power Ltd.) चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. राहुल शिवाजीराव कदम यांची दी डिस्टिलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या (The Distillers’ Association of Maharashtra, Mumbai) च्या कार्यकारी मंडळात सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. राहुल कदम हे गेल्या दीड दशकापासून साखर उद्योगात योगदान देत आहेत. त्यांची नियुक्ती सन २०२५ ते २०२८ या तीन वर्षांच्या कालावधी करिता असणार आहे.
असोसिएशनच्या मुंबईत येथे २८ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये डॉ. कदम यांच्या नियुक्तीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या नियुक्तीसंदर्भात दी डिस्टिलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील यांनी डॉ. कदम यांना नुकतेच पत्र दिले.
डॉ. राहुल कदम यांची नियुक्ती असोसिएशनला लाभकारी ठरेल, असे अध्यक्षांनी म्हटले आहे. डॉ. कदम यांच्या नेतृत्वाखाली बामणी पारे (ता. खानापूर, जि. सांगली) येथील उदगिरी शुगर प्रगतीची नवी शिखरे गाठत आहे. कारखान्याची डिस्टिलरी देशातील आघाडीच्या डिस्टिलरीमध्ये गणली आहे.
शुगरटुडे मॅगेझीनच्या वतीने डॉ. राहुल कदम यांचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!