डॉ. राहुल कदम : इन्स्पायरिंग इंडियन लीडर

साखर उद्योगातील लीडरशिपची ‘बिझनेस टुडे’कडून दखल
नवी दिल्ली : उदगिरी शुगर अँड पॉवर लि.चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) डॉ. राहुल कदम यांच्या औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रांतील योगदानाची प्रसिद्ध ‘बिझनेस टुडे’ या मॅगेझीनने दखल घेतली आहे. ‘इन्स्पायरिंग इंडियन लीडर्स’ या मुखपृष्ठ कथेमध्ये देशभरातील नामवंत उद्योजकांत डॉ. राहुल कदम यांना स्थान देण्यात आले आहे.

‘बिझनेस टुडे’ हे ‘इंडिया टुडे’ समूहाचे अग्रगण्य नियतकालिक आहे. उद्योग क्षेत्रातील घडामोडींची वेगळ्या नजरेतून त्यात दखल घेतली जाते. आगामी आवृत्तीमध्ये ‘इन्स्पायरिंग इंडियन लीडर्स’ या मथळ्याखाली मुखपृष्ठ कथा म्हणजे मुख्य लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. देशात वेगळ्या पद्धतीने काम करणाऱ्या आठ उद्योजकांची माहिती या लेखात दिली असून, त्यात डॉ. राहुल कदम यांच्याबाबत एक पूर्ण पान लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या लेखामध्ये डॉ. कदम यांनी उदगिरी शुगरमध्ये राबवलेल्या विविध योजना आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उहापोह करण्यात आला आहे. ‘आरपीसी’ अर्थात रोटरी पार्टिकल कलेक्टर तंत्रज्ञान वापरणारा उदगिरी शुगर आशिया खंडातील पहिला साखर कारखाना आहे. त्याबाबतही लेखात माहिती दिली आहे. तसेच डॉ. कदम यांच्या सीएसआर कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे.
