डॉ. यशवंत कुलकर्णी/वाढदिवस शुभेच्छा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कर्तव्यदक्ष, प्रयोगशील, द्रष्टे कार्यकारी संचालक डॉ. श्री. यशवंत कुलकर्णी यांचा १ जुलै रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’ मासिकाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा!

डॉ. यशवंत कुलकर्णी गेल्या तीन दशकांपासून साखर उद्योग क्षेत्रात कार्यरत असून, त्यांचे या क्षेत्रासाठी खूप मोठे योगदान आहे. त्याबद्दल त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. ते विविध संस्था आणि समित्यांवर पदाधिकारी आहेत. महाराष्ट्र राज्य सह. साखर कारखाना एमडी असोसिएशनचे ते उपाध्यक्ष असून, को-जन असोसिएशन ऑफ इंडियाचेही संचालक आहेत.

महाराष्ट्रातील आघाडीच्या, श्रीपूर येथील प्रसिद्ध श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक पदाची धुरा ते गेल्या अकरा वर्षांपासून यशस्वीपणे सांभाळत आहेत. त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »