उसासाठी ठिबक सिंचन, ‘डीएसटीए’तर्फे २० रोजी सेमिनार
पुणे : कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत ठिबक सिंचन (Drip Irrigation for Sugarcane) पद्धतीचा अधिकाधिक ऊस उत्पादनासाठी परिणामकारक वापर कसा करायचा, या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर ‘डीएसटीए’च्या सेमिनारला हजेरी लावायलाच हवी.
दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’च्या वतीने येत्या २० एप्रिल रोजी संस्थेच्या पुण्यातील मुख्य कार्यालयातील लालचंद हिराचंद सभागृहात एक दिवसीय सेमिनाराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.०० ते दुपारी ५.०० या दरम्यान सेमिनार होईल, अशी माहिती संस्थेने दिली.
कमी पाण्यात उसाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी ठिबक सिंचनाची पद्धत फायदेशीर आहे. त्याबाबत सविस्तर माहिती साखर कारखान्यांना आणि त्यांच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी हा सेमिनार आयोजित केला आहे, असे संस्थेचे अध्यक्ष श्री. एस. बी. भड यांनी सांगितले.
फलोद्यान विभागाचे संचालक डॉ. कैलास मोटे सेमिनारसाठी प्रमुख पाहुणे लाभले असून, डॉ. ए. एस. कॉलेज ऑफ ॲग्री इंजि. अँड टेक (राहुरी) चे असो. डीन डॉ. डी. डी. पवार, हायड्रोलॉजिस्ट डॉ. सुधीर भोंगळे हे विशेष पाहुणे आहेत. नेटाफिम, जैन एरिगेशन, कोठारी ॲग्रोटेक, आयएएस (इनोव्हेटिव्ह एजी सर्व्हिसेस) हे या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत.
Thanks🙏 for your initiative to provide information and news related to sugar industry at a single point.