सावंत, बक्षी राम, समीर सोमय्या यांना साखर उद्योग गौरव पुरस्कार
पुणे : दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’च्या वतीने यंदाच्या वार्षिक परिषदेत विविध श्रेणीत पुरस्कार देण्यात आले. साखर उद्योग गौरव पुरस्कार २०२३ चे मानकरी ठरले आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, पद्मश्री डॉ. बक्षी राम, डॉ. भाग्यलक्ष्मी, समीर सोमय्या, विशाल निरानी आणि घनश्यामभाई पटेल.
प्रथम साखर उद्योग गौरव पुरस्कार २०२३ सावंत यांच्या भैरवनाथ शुगर ला देण्यात आला. त्यानंतर पद्मश्री डॉ. बक्षी राम, डॉ. भाग्यलक्ष्मी, श्री समीर सोमय्या, विशाल निरानी, घनश्याम पटेल यांना पुरस्कार देण्यात आले
तांत्रिक उत्कृष्ट पुरस्कार २०२३ ‘नॅशनल शुगर इन्स्टिट्युट’, ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट’, ‘नॅशनल फेडरिशन ऑफ को-ऑपरेटिव शुगर फॅक्टरी लिमिटेड’, ‘आवांत सिस्टीम अँड कंट्रोल लिमिटेड’ यांना देण्यात आला.
उत्कृष्ट उद्योग पुरस्कार २०२३ श्री मलीकार्जुन शामनूर, बबनराव शिंदे, प्रेम रुपारेल, नंदिनी नोपानी, मानसिंहभाई पटेल यांना देण्यात आला.
जीवन गौरव पुरस्कार डॉ. एम. ऐस. देशपांडे, राजेंद्र चांदगुडे, बी.बी. निकम, ऐस.डी. बोखरे, अजित चौघुले, ए.ऐस. अष्टेकर, मोहन डोंगरे यांना देण्यात आला.
उत्कृष्ट शोध निबंध पुरस्कार मंगल सिंग (सुवर्ण पदक), संजीव माने(प्रथम पुरस्कार), गणपतराव पाटील( द्वितीय पुरस्कार) याचप्रमाणे अभियांत्रिकी क्षेत्रातील पुरस्कार आनंद मोकाशी( मरणोत्तर, प्रथम पुरस्कार), विवेक वर्मा( द्वितीय पुरस्कार) तसेच उत्पादन निर्मिती पुरस्कार ऐस. पांडा( प्रथम पुरस्कार), एम. बी. लोंढे(द्वितीय पुरस्कार), व्यवस्थापन क्षेत्रातील पुरस्कार डी.एम. रासकर (प्रथम पुरस्कार), डब्लू. आर. आहेर(द्वितीय पुरस्कार) यांना देण्यात आले.
त्याचप्रमाणे प्रायोजकांचाही सन्मान करण्यात आला .
सविस्तर पुरस्कार यादी