DSTA(I) चे वार्षिक पुरस्कार जाहीर

राजारामबापू कारखाना, वेंकटेश शुगर, नॅचरल शुगरचा होणार सन्मान
पुणे : साखर उद्योग तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची संस्था दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया) चे (DSTAI) वार्षिक पुरस्कार जाहीर झाले असून, येत्या २२ सप्टेंबर रोजी पुण्यात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
येत्या २२ आणि २३ सप्टेंबर रोजी पुण्यात जे. डब्ल्यू. मॅरिऑट हॉटेलमध्ये डीएसटीएची ७० वी वार्षिक परिषद आणि शुगर एक्स्पो होणार आहे. यावेळी साखर उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि संस्थांचा पुरस्कारांनी सन्मान करण्यात येणार आहे.
उत्कृष्ट साखर कारखाने म्हणून राजारामबापू सहकारी साखर कारखाना, वेंकटेश पॉवर अँड शुगर लि., नॅचरल शुगर, द्वारकाधीश शुगर आणि गणदेवी सहकारी खांड उद्योग या कारखान्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
साखर उद्योग गौरव पुरस्कार, उत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार, उत्कृष्ट तांत्रिक कामगिरी, उत्कृष्ट उद्योजकता, जीवनगौरव आणि सर्वोत्तम कामगिरी अशा सहा श्रेणींमध्ये प्रत्येकी पाच पुरस्कार दिले जातात. उत्कृष्ट साखर करखाना श्रेणी वगळता सर्व पुरस्कार वैयक्तिक स्वरूपाचे आहेत.
साखर उद्योग गौरव पुरस्काराने आ. विनय कोरे, बाबूराव बोत्रे पाटील, अरविंद गोरे यांना सन्मानित करण्यात येईल. उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कारांसाठी संजय देसाई (रिग्रीन एक्सेल) , डॉ. सचिन निकम (उल्का इंडस्ट्रीज), अनिलराज पिसे (राज प्रोसेसेस) आदींची निवड करण्यात आली आहे.
एस. डी. बोरूडे, बी. जी, सुतार (एमडी, यशवंतराव मोहिते कृष्णा स.सा. कारखाना), तंत्रज्ञ वा. र. आहेर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केले जातील, तर सर्वोत्तम कामगिरीसाठी डॉ. यशवंत कुलकर्णी (एमडी, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग स.सा. कारखाना) यांची निवड करण्यात आहे.
राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, राष्ट्रीय साखर संस्थेच्या संचालक सीमा परोहा, साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ, विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, एसटीएआयचे अध्यक्ष संजय अवस्थी, एसआयएसएसटीएचे अध्यक्ष एन. चिन्नप्पन या मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
या कार्यक्रमासाठी आगाऊ नोंदणी करून जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डीएसटीएचे अध्यक्ष एस. बी. भड, उपाध्यक्ष (महाराष्ट्र) आणि परिषदेचे चेअरमन सोहन शिरगावकर, उपाध्यक्ष (गुजरात) एम. के. पटेल आणि उपाध्यक्ष (तंत्र) एस. डी. बोखारे यांनी केले आहे.
पुरस्कारांची सविस्तर यादी खालीलप्रमाणे
Sakhar Udyog Gaurav Puraskar
1. Sangamesh Nirani, Nirani Group
2. Baburao Botre-Patil, Omkar Sugars
3. Patel Bhavesh, Bardoli (Gujrat)
4. Aravinda Gore, Ambedkar Sugar
5. Vinay Kore, Warana Sugar Group
Best Sugar Factory Award
1. Rajarambapu SSK Ltd.
2. Venkatesh Power and Sugars
3. Natural Sugars
4. Dwarakadhish Sugars
5. Ganadevi SKUM Ltd.
Technical Excellence Award
1. P. N. R. Rao
2. Mrs. Karandeep Kaur
3. V. S. Desai
4. Pravin Agarwal
5. Anand Murugan
Industrial Excellence Award
1. Dr. Sachin Nikam
2. Gopalkrushnana
3. Bhambre
4. Sanjay Desai
5. Anil Pise
Lifetime Achievement Award
1. Borude S. D.
2. Aher W. R.
3. Sutar B. G.
4. Ghodgaonkar S.
5. Dr. Mrs. Snehal Joshi
Outstanding Performance
1. Dr. Kulkarni Yashwant S.
2. Chavan L. D.
3. Yeole G. G.
4. Patil Prashant
Link for Convention Registration





