24, 25 ऑगस्टला डीएसटीएचे वार्षिक अधिवेशन आणि शुगर एक्स्पो
पुणे : साखर उद्योग तंत्रज्ञान क्षेत्रात १९३६ पासून कार्यरत असलेली नामवंत संस्था दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन (इंडिया) अर्थात डीएसटीएचे बहुप्रतीक्षित वार्षिक अधिवेशन आणि तंत्रज्ञान प्रदर्शन (शुगर एक्स्पो) येत्या २४ आणि २५ ऑगस्ट रोजी, पुण्यातील जे. डब्ल्यू. मॅरियट या पंचतारांकित हॉटेलमध्ये होत आहे.
हे 69 वे वार्षिक अधिवेशन असून, त्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी नावनोंदणीही सुरू करण्यात आली आहे.
या अधिवेशनाला एक हजारांहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे, त्यात प्रमुख धोरणकर्ते, निर्णय प्रक्रियेतील मंडळी, तंत्रज्ञ, कृषी तज्ज्ञ आणि प्रगतीशील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश राहणार आहे.
अधिवेशनादरम्यान साखर आणि संलग्न उद्योगाच्या सर्व विभागांमधील अलीकडील ट्रेंड कव्हर करणारे शोधनिबंध तज्ञांद्वारे सादर केले जातील आणि प्रतिनिधींद्वारे त्यावर चर्चा केली जाईल.
शुगर-एक्स्पो 2024 हे अधिवेशनासोबतच आयोजित केले आहे आणि त्यात विविध प्रमुख संस्था सहभागी होतील. त्यांची अद्ययावत यंत्रसामग्री, उपकरणे, उत्पादने, तंत्रज्ञान आणि सेवा एकाच ठिकाणी, एका छताखाली पाहायला आणि अनुभवयाला मिळणार आहेत.
DSTA च्या वतीने, आम्ही तुम्हा सर्वांना या वार्षिक अधिवेशनात आणि शुगर एक्स्पो-2024 मध्ये सहभागी होण्यासाठी हार्दिक आमंत्रित करत आहोत, असे संस्थेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या अधिवेशनासाठी सर्व संबंधितांनी दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणावर नोंदणी करावी, असे आवाहन डीएसटीएचे अध्यक्ष एस. बी. भड, उपाध्यक्ष (महाराष्ट्र) आणि अधिवेशन समितीचे चेअरमन एस. एस. शिरगावकर, उपाध्यक्ष (गुजरात) एम. के. पटेल आणि उपाध्यक्ष (तंत्र) एस. डी. बोखारे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संस्थेच्या कार्यकारी सचिव गौरी पवार (९१७५९१६०४४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. नावनोंदणी खालील क्यूआर कोड स्कॅन करूनही करता येऊ शकेल.
अधिवेशन आणि शुगर एक्स्पोचे काही ठळक मुद्दे
- संपूर्ण भारतातून आणि विशेषत: महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकमधील साखर कारखानदार, प्रमुख धोरण कर्ते, निर्णय कर्ते, वरिष्ठ अधिकारी आणि साखर तसेच संबंधित उद्योगातील नामवंत तंत्रज्ञांचा सहभाग.
- निर्णय प्रक्रिया आणि जनमानसावर प्रभाव असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या मोठ्या समूहाशी चर्चा करण्याची, त्यांना भेटण्याची सुवर्णसंधी.
- उत्पादने आणि सेवा सादरीकरणासाठी तुम्हाला हवा असलेला प्रेक्षक वर्ग.
- साखर उद्योगातील तंत्रज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळणार असल्याने, या क्षेत्रातील नव्या ट्रेंडची माहिती मिळण्यासाठी दुर्मिळ संधी.
- मान्यवर वक्त्याचे एस.एन. गुंडुराव स्मृती व्याख्यानमालेत विविध विषयांवर मार्गदर्शन.
- जे.पी. मुखर्जी स्मृती व्याख्यानमालेत प्रख्यात उद्योग तज्ज्ञाचे उद्योगाशी संबंधित महत्त्वपूर्ण विषयांवर व्याख्यान.
- …
डीएसटीए(आय) ही भारतातील सर्वात जुन्या प्रीमियर इंडस्ट्री असोसिएशनपैकी एक आहे. केवळ साखर आणि संबंधित उद्योगाच्या विविध पैलूंचा समावेश करून कार्यक्षमता आणि उत्पादकतेमध्ये सतत सुधारणा करण्यासाठी समर्पित ती आहे. 1936 मध्ये स्थापना झाल्यापासून, डीएसटीएने साखर आणि संबंधित उद्योग क्षेत्राच्या विकासात भरीव योगदान दिले आहे.
सध्या संपूर्ण भारतातील साखर आणि संबंधित उद्योगांशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे जोडलेल्या सर्वांसाठी एक समन्वयक व्यासपीठ म्हणून संस्थेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. संस्थेचे सुमारे सव्वादोन हजार सदस्य आहेत. त्यात माजी मंत्री, विद्यापीठांचे कुलगुरू, संशोधन संस्थांचे प्रमुख, महाविद्यालयांचे प्राचार्य, साखर उद्योग कंपन्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, विविध क्षेत्रातील पीएच. डी. धारक तज्ज्ञ व्यक्ती आदींचा त्यात समावेश आहे. तसेच ऊस उत्पादक प्रगतशील शेतकऱ्यांचाही त्यात समावेश आहे.