‘डीएसटीए’ची ऑगस्टमध्ये वार्षिक परिषद

आवडल्यास ही बातमी शेअर करा

रिसर्च पेपर सादर करण्याचे आवाहन

पुणे : साखर तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांचे प्रतिनिधित्व करणारी आघाडीची संस्था दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्‌स असोसिएशन (इंडिया) ची ६९ वी आर्थिक परिषद ऑगस्ट २०२४ मध्ये होणार असून, त्यासाठी रिसर्च पेपर (शोधनिबंध) सादर करण्याचे आवाहन संस्थेने केले आहे. परिषदेची नक्की तारीख यथावकाश जाहीर करण्यात येणार आहे.

कृषी, उत्पादन (प्रक्रिया), अभियांत्रिकी आणि उपपदार्थ व व्यवस्थापन अशा चार कॅटेगरीमध्ये रिसर्च पेपर सादर करता येणार आहेत. त्यासाठी रिसर्च पेपर सादर करणाऱ्या तज्ज्ञांना प्रति पेपर रू. २००० प्रोत्साहनपर मानधन देण्याची घोषणाही संस्थेने केली आहे. त्यासाठी रिसर्च पेपरचे सादरीकरण (पीपीटी) १५ दिवस आधी सादर करणे आणि सादरीकरणाचा कालावधी दहा मिनिटांपेक्षा अधिक नसावा, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.

ही नियोजित वार्षिक परिषद यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री.  एस.  बी. भड यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सर्व पदाधिकारी, विविध समित्या कार्यरत आहेत.

रिसर्च पेपर बाबत अधिक तपशीलासाठी खालील पीडीएफ फाइल पाहावी…

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »