उसासाठी ठिबक सिंचन, नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत ठिबक सिंचन (Drip Irrigation for Sugarcane) पद्धतीचा अधिकाधिक ऊस उत्पादनासाठी परिणामकारक वापर कसा करायचा, या प्रश्नाचे उत्तर ‘डीएसटीए’च्या सेमिनारमध्ये सर्वांना मिळेल.

शनिवार, दि. २० एप्रिल रोजी हा सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. त्यात सहभागी होण्यासाठी १९ एप्रिल रोजी ४ वाजेपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन सर्व साखर कारखाने आणि सबंधितांना करण्यात आले आहे. www.dstaevents.in या वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करता येईल.

दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’च्या वतीने येत्या २० एप्रिल रोजी संस्थेच्या पुण्यातील मुख्य कार्यालयातील लालचंद हिराचंद सभागृहात एक दिवसीय सेमिनाराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.०० ते दुपारी ५.०० या दरम्यान सेमिनार होईल, अशी माहिती संस्थेने दिली.
कमी पाण्यात उसाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी ठिबक सिंचनाची पद्धत फायदेशीर आहे. त्याबाबत सविस्तर माहिती साखर कारखान्यांना आणि त्यांच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी हा सेमिनार आयोजित केला आहे.

फलोद्यान विभागाचे संचालक डॉ. कैलास मोते सेमिनारसाठी प्रमुख पाहुणे लाभले असून, डॉ. ए. एस. कॉलेज ऑफ ॲग्री इंजि. अँड टेक (राहुरी) चे असो. डीन डॉ. डी. डी. पवार, हायड्रोलॉजिस्ट डॉ. सुधीर भोंगळे हे विशेष पाहुणे आहेत. नेटाफिम, जैन एरिगेशन, कोठारी ॲग्रोटेक हे या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत.

या ज्ञान संवादाचा लाभ घेण्यासाठी सर्व निमंत्रितांनी सेमिनारला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन डीएसटीएचे अध्यक्ष एस. बी. भड, उपाध्यक्ष (महाराष्ट्) एस. एस. शिरगावकर, उपाध्यक्ष (गुजरात) एम. के. पटेल, उपाध्यक्ष एस. डी. बोखारे (तांत्रिक), कृषी समितीचे समन्वयक संजीव माने, सह समन्वयक डॉ. एस. एम. पवार, संस्थेचे मानद सचिव एम. आर. कुलकर्णी, कार्यकारी सचिव गौरी आर. पवार यांनी केले आहे.

या सेमिनारची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष एस. बी. भड यांच्या स्वागतपर भाषणाने सकाळी १०.३० वाजता होईल, त्यानंतर एस, जी. माने प्रास्ताविक करतील. ११ वाजता श्री. मोते यांचे मार्गदर्शन होईल. श्री. बोखारे हे आभार प्रदर्शन करतील. नंतर ११.४० वाजता तांत्रिक सत्र सुरु होणार आहे.

या सत्रात डॉ. सुधीर भोंगळे, डॉ. डी. डी. पवार, डॉ. अरुण देशमुख आणि आर. एम. गंगाई मार्गदर्शन करणार आहेत. दु. १.१५ वाजता हे सत्र समाप्त होईल.

भोजन अवकाशानंतर तिसरे आणि अंतिम सत्र दुपारी २.३० वाजता सुरू होईल. या सत्रात कोठारी ॲग्रीटेकचे सहा. सरव्यवस्थापक विजयकुमार सरूर, जैन एरिगेशनचे डॉ. बी. डी जडे, नेटाफिमचे व्यवसाय प्रमुख कृष्णात महामूलकर, कोठारी ॲग्रीटेकचे अयूब शेख, जैन एरिगेशनचे डॉ. विजय माळी यांचे मार्गदर्शन लाभेल. डीएसटीएचे उपाध्यक्ष एस. एस. शिरगावकर आभार मानतील.
सेमिनारची सांगता राष्ट्रगीताने होईल.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »