‘हीट अँड मास बॅलन्स इन शुगर इंडस्ट्री’ वर १८ ला सेमिनार
‘डीएसटीए’च्या वतीने आयोजन
पुणे : साखर उद्योग तंत्रज्ञानात सदैव मागदर्शकाच्या भूमिकेत असलेल्या, दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’च्या वतीने येत्या १८ मे रोजी एक दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
‘हीट अँड मास बॅलन्स इन शुगरअँड अलाईड इंडस्ट्रीज’ हा सेमिनारचा विषय आहे. सकाळी १० ते संध्या ५:३० या दरम्यान सेमिनार होत आहे, असे ‘डीएसटीए’ने कळवले आहे. सेमिनारमध्ये नामवंत तज्ज्ञांचे मार्गदर्शन होईल, तसेच काही शोधनिबंध सादर केले जातील. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ‘आयआयएसईआर’चे संचालक डॉ. एस. एस. भागवत आणि सन्मानीय पाहुणे म्हणून नॅचरल समूहाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक, कृषिरत्न बी. बी. ठोंबरे लाभले आहेत.
संस्थेच्या पुण्यातील (शिवाजीनगर) लालचंद हिराचंद सभागृहात हा सेमिनार पार पडेल.
‘आयआयएसईआर’चे संचालक डॉ. एस. एस. भागवत, इक्विनॉक्सचे सीईओ अलोक पंडित, व्हीएसआयचे माजी तंत्र सल्लागार एस. डी. बोरूडे, साखर सल्लागार एस. जी. आठवले, एमआयटी एओइचे प्रा. डॉ. एस. व्ही. तारळकर, त्रिवेणी टर्बाइन लि. चे प्रशांत धनपावडे आणि राज प्रोसेसेसचे अनिल पिसे या नामवंतांचे मार्गदर्शन यावेळी लाभेल.
या सेमिनारसाठी कसलेही नोंदणी शुल्क नाही, मात्र www.dstaevents.in या बेवसाईटच्या माध्यमातून नोंदणी करणे गरजेचे आहे.
साखर उद्योग व संबंधित क्षेत्रातील सदस्यांनी या सेमिनारला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष एस. बी. भड, उपाध्यक्ष (महाराष्ट्र) एस. एस. शिरगावकर, उपाध्यक्ष (गुजरात) एम. के. पटेल, उपाध्यक्ष (तंत्र) एस. डी. बोखारे, अभियांत्रिकी समिती समन्वयक एस. डी. बोरूडे, सहसमन्वयक वा. र. आहेर, कौन्सिलचे निमंत्रक बी. एच. श्रीकांत आणि कार्यकारी सचिव गौरी पवार यांनी केले आहे.