‘डीएसटीए’ सेमिनारसाठी नोंदणी करा

पुणे : साखर उद्योगाला नव्या तंत्रज्ञानासाठी सदैव मागदर्शन करणाऱ्या दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’च्या वतीने येत्या १८ मे रोजी एक दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
‘हीट अँड मास बॅलन्स इन शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज’ हा सेमिनारचा विषय आहे. सकाळी १० ते संध्या ५:३० या दरम्यान सेमिनार होत आहे, असे ‘डीएसटीए’ने कळवले आहे. सेमिनारमध्ये नामवंत तज्ज्ञांचे मार्गदर्शन होईल, तसेच काही शोधनिबंध सादर केले जातील.
उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे माजी संचालक प्रो. ज़ी. डी. यादव आणि सन्माननीय पाहुणे म्हणून नॅचरल उद्योग समूहाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक, कृषिरत्न बी. बी. ठोंबरे लाभले आहेत.
संस्थेच्या पुण्यातील (शिवाजीनगर) लालचंद हिराचंद सभागृहात हा सेमिनार पार पडेल. डीएसटीएचे अध्यक्ष एस. बी. भड यांच्या प्रास्ताविकाने सेमिनारला सुरुवात होईल. विशेष पाहुणे आणि प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर संस्थेचे उपाध्यक्ष एस. डी. बोखारे (तंत्र) यांच्या आभार प्रदर्शनानंतर उद्घाटन सत्राचा समारोप होईल.
दुसरे तांत्रिक सत्र लगेच सुरू होईल. त्यात हिंदुस्थान ॲन्टिबायोटिक्स माजी एमडी यशवंत घारपुरे (सेमिनार कशासाठी?), साखर तंत्रज्ञान सल्लागार एस. जी. आठवले (हीट अँड मास बॅलन्स केस स्टडी ऑफ शुगर प्लॅंट), व्हीएसआयचे माजी सल्लागार एस. व्ही. बोरूडे (हीट अँड मास बॅलन्स केस स्टडी ऑफ कोजन प्लँट), राज प्रोसेसेसचे एमडी अनिल पिसे (हीट अँड मास बॅलन्स केस स्टडी ऑफ डिस्टिलरी प्लँट) हे मार्गदर्शन करतील.
भोजनानंतरच्या सत्रात डिजिटल ट्रान्स्फॉर्मेशन ऑफ शुगर इंडस्ट्री या विषयावर इक्विनॉक्सचे सीईओ अलोक पंडित, ‘मटेरियल अँड एनर्जी बॅलन्स कॅल्क्युलेशन्स टू एनहान्स द प्राफिटॅबिलिटी ऑफ शुगर इंडस्ट्री’ या विषयावर एमआयटी एओइचे प्रा. डॉ. एस. व्ही. तारळकर, ‘सिमुलेशन टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन फॉर शुगर अलाइड इंडस्ट्री’ यावर इक्विनॉक्सचे व्हीपी (तंत्रज्ञान) डॉ. संजीव बाचल हे मार्गदर्शन करतील.
तसेच ‘हीट अँड मास बॅलन्स डायग्राम’वर इंजि. बंगळूरचे पी. के. सलोनी, त्रिवेणी टर्बाइन लि. चे प्रशांत धनपावडे (हेड वेस्ट झोन) यांचे सादरीकरण पाहण्याची संधी लाभेल.
शेवटी थर्मोडायनॅमिक्स कॅल्क्युलेशन्स सीमर्सचे टीम लीड चिरायू शाह आणि वरिष्ठ व्यवस्थापक (सेल्स अँड मार्केटिंग) विराज पवार यांचा शोधनिबंध सादर होईल.
या सेमिनारसाठी कसलेही नोंदणी शुल्क नाही, मात्र www.dstaevents.in या बेवसाईटच्या माध्यमातून नोंदणी करणे गरजेचे आहे.
साखर उद्योग व संबंधित क्षेत्रातील सदस्यांनी या सेमिनारला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष एस. बी. भड, उपाध्यक्ष (महाराष्ट्र) एस. एस. शिरगावकर, उपाध्यक्ष (गुजरात) एम. के. पटेल, उपाध्यक्ष (तंत्र) एस. डी. बोखारे, अभियांत्रिकी समिती समन्वयक एस. डी. बोरूडे, सहसमन्वयक वा. र. आहेर, कौन्सिलचे निमंत्रक बी. एच. श्रीकांत आणि कार्यकारी सचिव गौरी पवार यांनी केले आहे.
Sugar today
CBG process
Sure sir
No