डीएसटीएचा शनिवारी (२४ मे) महत्त्वाचा सेमिनार

पुणे : द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया) अर्थात DSTA ने शनिवार दि. २४ मे २०२५ रोजी महत्त्वपूर्ण सेमिनार आयोजित केला आहे. ‘न्यू एनर्जी, न्यू फ्यूचर – द नेक्स्ट जन शुगर कॉम्प्लेक्स’ हा सेमिनारचा विषय आहे.
पुण्यातील हायट (हयात, आगा खान पॅलेस जवळ) येथे २४ मे २०२५ रोजी दुपारी २ वाजता हा सेमिनार होणार असून, तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. साखर उद्योग क्षेत्रातील निमंत्रित व्यक्तींनी या सेमिनारला उपस्थिती लावून डीएसटीएच्या ज्ञानयज्ञाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष एस. बी. भड, उपाध्यक्ष (महाराष्ट्र) एस. एस. शिरगावकर, उपाध्यक्ष (गुजरात) एम.के. पटेल, उपाध्यक्ष (तांत्रिक) एस. डी. बोखारे यांनी केले आहे.