‘सल्फरलेस शुगर’ : विविध पर्यायांवर ‘डीएसटीए’चा सेमिनार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : साखर तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत संस्था दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’च्या वतीने ‘व्हेरिअस अल्टरनेटिव्हस्‌ फॉर प्रॉडक्शन ऑफ सल्फरलेस / रिफाइंड / रॉ / फार्मा शुगर’ या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर एक दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

येत्या १ जून रोजी संस्थेच्या पुण्यातील सभागृहात हा सेमिनार सकाळी १० ते दुपारी ४.३० या दरम्यान पार पडेल, असे डीएसटीएने कळवले आहे.

‘डीएसटीए’चे अध्यक्ष एस. बी. भड यांच्या प्रस्ताविकाने उद्‌घाटन सत्राचा प्रारंभ होईल. कार्यक्रमाचे विशेष पाहुणे, गुजरात राज्य सहकारी साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र ठक्कर आणि प्रमुख पाहुणे, नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे माजी संचालक प्रो. नरेंद्र मोहन अग्रवाल यांचे यावेळी मार्गदर्शन लाभेल. संस्थेचे उपाध्यक्ष (महाराष्ट्र) एस. एस. शिरगावरकर यांच्या आभार प्रदर्शनाने या सत्रांची सांगता होईल.

दुसरे सत्र तांत्रिक असून, त्यात संस्थेच्या उत्पादन समितीचे सहसमन्वयक व्ही. एम. कुलकर्णी, निराणी समूहाचे एस. पांडा आणि नॅचरल शुगरचे यू. डी. दिवेकर ही तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत.
या सत्रांचा दुसरा भाग भोजनानंतर सुरू होईल. त्यात डिफटेक टेक्नॉलॉजीजचे संजय जैन, यू. एस. जयस्वाल, सुनील अवस्थी आणि संतोष कुमार, तसेच निराणी उद्योग समूहाचे ए. पवार, सुविरॉन इक्विपमेंट्‌सचे चैतन्य जोशी आणि क्रेडो इम्पेक्सचे शंतनू कुलकर्णी मागदर्शन करतील.

सर्व साखर कारखान्यांसाठी हा सेमिनार अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे या ज्ञानमालिकेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘डीएसटीए’चे अध्यक्ष एस. बी. भड, उपाध्यक्ष एस. एस. शिरगावकर (महाराष्ट्र), उपाध्यक्ष एम. के. पटेल (गुजरात), उपाध्यक्ष एस. डी. बोखारे (तंत्र), सह समन्वयक व्ही. एम. कुलकर्णी आणि कार्यकारी सचिव गौरी पवार यांनी केले आहे.
नाव नोंदणीसाठी या बेवसाइटवर भेट द्यावी. www.dstaevents.in

आवडल्यास ही बातमी शेअर करा

2 Comments

Leave a Reply

Select Language »