डुलकी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कामाच्या गडबडीतला थकवा आल्यावर||
किंवा जेव्हा जुन्या आठवणीत मन गुंततं|
निवांत क्षणी एकटेपणा जाणवल्यावर||
तेव्हा थोडीशी घेतलीकी जराबरं वाटतं||१||

कधी कधी बायकोच्या प्रेमात पडल्यावर||
जेव्हा तिला यातलं सगळंच खरं कळतं|
कधी कधी बायकोशी खटके उडाल्यावर|
तेव्हा थोडीशी घेतलीकी जराबरं वाटतं||२||

कधी जुनी मैत्रीण अचानक दिसल्यावर|

जेव्हा तिच्या आठवणींत उगा मन झुरतं||
तिने पाहून मुद्दाम काना डोळा केल्यावर|
तेव्हाथोडीशी घेतलीकी जराबरंवाटतं||३||


कधीकधी सग्यासोयऱ्यांच्याआग्रहाखातर|
जेव्हा चार चौघांचं सहज मन धरलं जातं|
मैफिलीतल्या मैत्रिणीच्या मैत्रिखातर||
तेव्हा थोडीशी घेतलीकी जराबरं वाटतं||४||

कधी जीवनात थोडंसं यश मिळाल्यावर||
जेव्हा कुठं निवांत जाऊन बसावं वाटतं|
कधी राजासारखंच जगावं वाटल्यावर||
तेव्हा थोडीशी घेतलीकी जराबरं वाटतं ||५||

घेणाऱ्याने वेळ सांभाळून घ्यायलाच हवी|

जरा जरा घेतली की तिचं  डोसकं फिरतं|
घेत जावी अशी की बायकोलाही न कळावी||
तेव्हा”डुलकी”घेतली की जरा बरं वाटतं ||६||

रचनाकार:आहेर वाळू रघुनाथ , नाशिक
(बीई एमआयई बीओई)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »