‘बिद्री’वर एक्साइजचा छापा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : कागल तालुक्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्यावर राज्य उत्पादन उत्पादन शुल्क (एक्साइज) विभागाकडून छापा टाकून चौकशी करण्यात आल्याने कोल्हापूरच्या राजकीय क्षेत्रासह साखर कारखानदारांमध्येही एकच खळबळ उडाली आहे.

माजी आमदार के. पी. पाटील चेअरमन असलेल्या दूधगंगा वेदगंगा अर्थात बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पाची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तपासणी करण्यात आली आहे. 21 जून रोजी रात्री अचानक पथकाने रात्रभर तपासणी केली.

के. पीं. ना मविआच्या वाटेवरुन वळवण्यासाठी ही चाल ?

माजी आमदार के. पी. पाटील गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत दिसत असून. ते महाविकास आघाडीच्या कार्यक्रमात ही झळकू लागले आहेत. यातच पाटील हे महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची ही चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. यापार्श्वभूमीवर हा छापा पडल्याने विविधरंगी चर्चेचे पेव फुटले आहे. त्यात भर म्हणून, पाटील यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेले नाही.

ऊसाला सर्वाधिक दर
गेल्या हंगामामध्ये राज्यातील सर्वाधिक ऊसाला दर देण्याचा विक्रम बिद्री सहकारी साखर कारखान्याने केला होता. जिल्ह्यात सर्वाधिक सभासद असलेला हा सहकारी साखर कारखाना आहे. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कारखान्यांवर धाडसत्र कोल्हापूरमध्ये सुरू झालं आहे का? असा सुद्धा प्रश्न या कारवाईने उपस्थित झाला आहे.

बिद्री कारखान्यावर एकहाती सत्ता
दरम्यान, गेल्यावर्षी झालेल्या बिद्री साखर कारखाना निवडणुकीत के. पी. पाटलांच्या पॅनेलने विरोधी राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचा सुमारे साडे पाच हजारांहून अधिक मताधिक्क्यांनी पराभव करत एकहाती सत्ता अबाधिता राखली होती. दोन खासदार, दोन कॅबिनेट मंत्री, दोन आमदार, पाच माजी आमदार आणि गोकुळ अध्यक्ष अशी तगडी फौज उतरल्यामुळे प्रचंड ईर्षा या निवडणुकीत निर्माण झाली होती. श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीने 25 पैकी 25 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »