उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी गुरुवारी धरणे आंदोलन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी गुरुवारी आंदोलन अंकुश संघटना श्री दत्त कारखाना, शिरोळ येथे धरणे आंदोलन करणार आहे.

संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की साखर व उप पदार्थ विकून मोठा नफा होऊनही कारखानदार एफ आर पी च्या वर मोबदला द्यायला तयार नाहीत. शेतकऱ्यांना आपल्या हक्काचे पैसे मिळवायचे असतील तर उघडपणे कारखाना विरोधात शेतकऱ्यांना रस्त्यावर यावे लागेल. अन्यथा कारखान्यावर विसंबून हक्काचे पैसे बुडतील.

सध्याच्या एफ आर पी मध्ये उत्पादन खर्च भागत नाही, काटामारी, रिकव्हरी चोरी आणि तोडणी वाहतुकीच्या खर्चात वाढ करून कारखाने एफ आर पी गेल्या 10 वर्षात वाढूच देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस पिकवण्याबरोबरच उसाच्या दरासाठी पण जागृत राहून परवडणारा दर घेण्यासाठी थोडी हिम्मत आणि वेळ द्यायला पाहिजे, असे संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी म्हटले आहे.

यावर्षी उसाची टंचाई असल्याने कारखान्यांना उसाची आणि शेतकऱ्यांची गरज भासणार आहे आणि उसाचा दर उच्च पातळीवर नेऊन ठेवण्याची हिच खरी वेळ आहे हे ओळखा. यावर्षी ऊस तोडा म्हणून शेतकऱ्यांना कारखान्याकडे चकरा मारण्याची गरज नसून कारखान्यांना उसाच्या बांधावर ऊस द्या म्हणून यावे लागणार आहे आणि हीच संधी साधून त्यांना आपण मागचं पैसे टाका आणि चालूला 3500 जाहीर करा म्हणून विचारायचे आणि ते करत नाही तोपर्यंत कोयता लावायचा नाही ही भूमिका शेतकऱ्यांना घ्यावी लागणार आहे, असे आवाहन संघटनेने केले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »