ऊसतोड कामगारांच्या ट्रॅक्टरला भीषण अपघात

आवडल्यास ही बातमी शेअर करा

दौलताबाद : धुळे-सोलापूर महामार्गावर माळीवाडा गावाजवळील उड्डापुलावर सोमवारी सकाळी  ११ वाजता ऊसतोड कामगारांच्या ट्रॅक्टरला अपघात झाला आहे. या अपघातात सहा ऊसतोड कामगार गंभीर जखमी झाले असून, त्यांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोरख लक्ष्मण जाधव (१६), प्रिया लक्ष्मण जाधव (१२), जगन भावडू पवार (२१), रामदास जाधव (६०), शांताबाई रामदास जाधव (५५), अनिल मोरे (१४, सर्व रा. लोणा, ता. भडगाव, जि. जळगाव) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दौलताबाद पोलिसांनी नोंद केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळच्या सुमारास धुळे-सोलापूर महामार्गावरून आपघातग्रस्त ट्रॅक्टर ऊसतोड कामगारांना लोणार येथून घेऊन जात होते. करोडी टोलनाक्यानजीक ट्रॅक्टर आले असता त्याची ट्रॉली हेडपासून वेगळी झाली आणि पाठीमागून येणाऱ्या ट्रकने (क्रमांक -जीजे ०३ बिटे. ४१६७)  त्या ट्रॉलीला जोरदार धडक बसली. या अपघातात सहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  दौलताबाद पोलिसांनी अधिक तपास करत आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »