…अखेर पांझराकान कारखान्याला हिरवा कंदील !

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कारखाना लवकरच सुरू होणार : आ. मंजुळा गावित

धुळे : अनेक वर्षांपासून बंद पडलेला साक्री तालुक्यातील पांझराकान सहकारी साखर कारखाना लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आमदार मंजुळा गावित आणि शिंदेसेनेचे जिल्हा प्रमुख डॉ. तुळशिराम गावित यांनी दिली आहे. पांझराकान साखर कारखाना सुरू करण्यास संदर्भात आमदार मंजुळा गावित यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेउन सविस्तर चर्चा केली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत काही महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत कारखाना सुरू करण्यासाठी तात्काळ निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. या बैठकीस सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार दिलीप बनकर, डॉ. गावित यांच्यासह उपस्थित होते.

१९७१ साली सुरू झालेला आणि २००२ मध्ये बंद पडलेल्या या कारखान्याला पुनर्जीवन देण्यासाठी सुरू असलेल्या अथक प्रयत्नांना अखेर  यश आले आहे. २०२१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री, सहकार मंत्री आणि शिखर बँकेला पत्र देऊन कारखाना सुरू करण्याची विनंती केली होती. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे मंत्रालय स्तरावर कारखान्याच्या कागदपत्रांची आता हालचाल सुरू झाली आहे.

कारखाना हस्तांतरणाची प्रक्रिया लवकरच पूर्ण!

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसारश, पांझराकान हा कारखाना रावळगाव साखर कारखान्याचे चेअरमन बबनराव गायकवाड यांच्या माध्यमातून सुरू होणार आहे. या कारखाना हस्तांतरणाची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असून, ९ ऑक्टोबर रोजी बबनराव गायकवाड यांना हस्तांतरित करण्यात येईल. त्यानंतर कारखाना खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »