विघ्नहरची आर्थिक फसवणूक; बीडच्या सहा जणांविरोधात गुन्हा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : जिल्ह्यातील जुन्नर येथील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला ऊसतोडणी मजूर आणि वाहतूक सेवा पुरवतो असे सांगून मुकादमाची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कारखान्याचे मुकादम अशोक सोनवणे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, पोलिसांनी बीड जिल्ह्यातील एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रामराव आंधळे, बिपिन आंधळे, भागवत आंधळे, भीमराव आंधळे, शहादेव आंधळेआणि दीपक सानप (सर्व रा. आंधळेवाडी, बीड) अशी या सहा संशयित आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामराव आंधळे, बिपिन आंधळे, भागवत आंधळे, भीमराव आंधळे, शहादेव आंधळेआणि दीपक सानप (सर्व रा. आंधळेवाडी, बीड) या सहा आरोपींनी संगनमताने कारखान्याशी करारनामा केला होता. मजूर व वाहतूक पुरवण्याची हमी देत त्यांनी विघ्नहर कारखान्याकडून तब्बल ६० लाख रुपयांहून अधिक रक्कम बँक खात्यात घेतली; परंतु त्यांनी दिलेले कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यांनी या रकमेचा अपहार करून कारखान्याची आर्थिक फसवणूक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »