3८ साखर कारखान्यांनी थकवली १४० कोटी एफआरपी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : मागील वर्षीच्या साखर हंगामात ऊस घेऊन आलेल्या राज्यातील ३८ साखर कारखान्यांनी अद्यापही १४० कोटी रुपये थकविले आहेत. यंदाचा साखर हंगाम सुरू होऊन २4 दिवसांचा कालावधी झाला आहे.

मागील वर्षीच्या गाळप हंगामात राज्यातील २०० साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. उसाच्या कमतरतेमुळे तसे साखर कारखाने फारच कमी दिवस चालले होते. संपूर्ण हंगामातील गाळप ८५५. १० लाख मे. टन ऊस गाळप झाले होते.

मागील वर्षभरात १६२ साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे व त्यापेक्षा प्रति टन अधिक रक्कम ऊस उत्पादकांना दिली आहे. मात्र राज्यातील विविध जिल्ह्यातील ३८ साखर कारखान्यांनी १४० कोटी रुपये ऊस उत्पादकांचे दिले नाहीत.

मागील गाळपातील आकडे◼️ मागील वर्षी गाळप घेतलेले कारखाने : २००◼️ झालेले एकूण गाळप : ८५५. १० लाख मे. टन◼️ एफआरपी देय रक्कम : ३१,५९८ कोटी◼️ एफआरपी दिलेली रक्कम : ३१, ४५८ कोटी◼️ एफआरपी देणे शिल्लक : १४० कोटी◼️ आर.आर.सी. कारवाई : २८ कारखाने

राज्यात १४७ साखर कारखाने सुरू

राज्यातील साखर हंगाम आता वेग घेऊ लागला असून १४७ साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. आतापर्यंत ११७ लाख मे. टन ऊस गाळप तर ८७ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. यंदा दोनशेहून अधिक साखर कारखाने सुरू होण्याचा अंदाज असला तरी मागील वर्षांची थकलेली एफआरपी, अपुरी ऊस तोडणी-वाहतुक यंत्रणा व अर्थकारणामुळे साखर कारखाने सुरू होण्यास उशिर होत आहे.

शेतकऱ्यांचे पैसे थकविलेले कारखानेआजरा शेतकरी सहकारी, आजराश्री. छत्रपती राजाराम सहकारीकुंभी-कासारीपद्मश्री. डॉ. डी. वाय. पाटीलदालमिया भारत शुगरइको केन एनर्जीओलम ग्लोबल अ‍ॅग्रोआप्पासाहेब नलवडे, गडहिंग्लजपद्मभूषण क्रांतिवीर, नागनाथ नाईकवाडीराजारामबापू पाटील, साकराळे वाळवाराजाराम बापू, वाटेगावराजाराम बापू पाटील, करंडवाडीदालमिया भारत शुगर, कोकरुडश्रीनाथ म्हकोबाश्री. साईप्रिय शुगरअजिंक्यतारा सहकारीलोकनेते बाळासाहेब देसाईश्री. सिद्धेश्वर कुमठेगोकुळ शुगरमातोश्री लक्ष्मी शुगरश्री. वृद्धेश्वर सहकारीकादवा सहकारी, दिंडोरीश्रद्धा एनर्जी, परतुरडॉ. व्ही. व्ही. पाटील, केजकपेश्वर शुगर, औंढा नागनाथपूर्णा सहकारी, हिंगोलीश्री. लक्ष्मी नृसिंह शुगरश्री. रेणुका शुगर, परभणीबळीराजा शुगर, पुर्णायोगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज, पाथरीजागृती शुगर, लातूरसिद्धी शुगर, अहमदपूरविलास सहकारी, उदगीरशिवाजी सव्हिस टेशन, नांदेडटॉन्टी वन शुगर, लोहाकुंदुरकर शुगर, नायगावभाऊराव चव्हाण, नांदेडनॅचरल ग्रोवर्स, लाखंदूर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »