पाडेगाव केंद्रात सुविधांसाठी ४१ कोटींचा निधी मंजूर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पाडेगांव ऊस संशोधन केंद्रासाठी (ता. फलटण, जि. सातारा) सुमारे ४० कोटी ९१ लाख रुपयांचा निधी नुकताच मंजूर करण्यात आला आहे. शासनाने यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये शेतकरी प्रशिक्षण केंद्र व अतिथीगृह, ऊस संशोधनासाठी नवीन प्रशासकीय इमारत आणि कर्मचारी निवासस्थानाच्या बांधकामाचा समावेश आहे.

आजपर्यंत पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने उसाच्या लागवडीसाठी एकूण १७ जाती प्रसारित केल्याने येथे कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ, महिला व पुरुष शेतकऱ्यांनी भेटी देतात. मात्र, निवासाची सोय नसल्याने गैरसोय होत होती. १९३२ साली केंदावी प्रशासकीय इमारत ९३ वर्षे जुनी असून इमारतीचा छताचा भाग कोसळलेला आहे. त्यामुळे नवीन प्रशासकीय इमारतीची गरज होती. तत्कालिन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी यापूर्वी सोयी-सुविधांसाठी बैठका घेउन पाठपुरावा केला होता.

सबंधित निधी लवकर मिळाल्यास पाडेगावमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांची वर्दळ वाढून येथील संशोधित ऊस वाण सर्वदूर पोहोचण्यास आणखी फायदा होण्याची अपेक्षा आहे.

कामानुसार मिळालेला निधी खालीलप्रमाणे ः

१. शेतकरी प्रशिक्षण केंद्र व अतिथीगृह ः  १४ कोटी ८६ लाख २७ हजार

२.  नवीन प्रशासकीय इमारतः  १४ कोटी ९२ लाख ५६ हजार

३.  कर्मचारी निवासस्थान ११ कोटी १२ लाख २८ हजार

एकूण रक्कम : ४० कोटी ९१ लाख ११ हजार रुपये

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »