‘जयहिंद शुगर’कडून ३१ जानेवारीपर्यंतची बिले जमा
हंजगी- आचे गाव (ता. दक्षिण सोलापूर) येथील जय हिंद शुगरकडून दि. १६ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२३ पर्यंतची ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती जयहिंद शुगरचे चेअरमन गणेश माने-देशमुख यांनी दिली.
या कालावधीतील उसाचे बिल २६५ उसाकरिता प्रतिटन आहे. दोन हजार तीनशे, तर ८६०३२ आणि १०००१ या उसाकरिता तेवीसशे रुपये प्रतिटन रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन पंधरवडा संपल्यानंतर त्वरित ऊसबिल देण्याची परंपरा यंदाही जयहिंद शुगरने कायम राखली आहे. ऊस उत्पादक शेतकरीबांधवांनी जयहिंद शुगरला ऊस पुरवठा करून सहकार्य करण्याचे आवाहन जयहिंद शुगरचे मुख्य कार्यकारी संचालक बब्रुवान माने- देशमुख यांनी केले.