‘गणेश’ निवडणुकीत विखेंना धक्का

आवडल्यास ही बातमी शेअर करा

19 पैकी 18 जागांवर थोरात-कोल्हे गट विजयी

राहाता : राहुरी पाठोपाठ गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने पराभवाचा धक्का दिला आहे.
विखे-पाटील यांच्या जनसेवा मंडळ पॅनलचा दारुण पराभव झाला असून थोरात-कोल्हे गटाने 19 पैकी 18 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे.

गेल्या महिन्याभरापासून गणेश सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेले होते. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटीव व खासदार सुजय विखे-पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. दुसरीकडे भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एकत्रितपणे येत विखेंना धोबीपछाड दिला.

कारखान्याच्या 19 जागासाठी शनिवारी मतदान झाले होते. यामध्ये 19 पैकी 18 जागांवर बाळासाहेब थोरात व विवेक कोल्हे यांच्या गणेश कारखाना परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी सुरवातीपासूनच घेतलेली आघाडी कायम राखली.

या निवडणूकीत शिर्डी गटामधून विजय दंडवते, राहता गटातून मा अॅड. नारायणराव ज्ञानेश्वर कारला, डांगे व संपत कचरू हिंगे, अस्तगाव गटातून महेंद्र गोरडे, बाळासाहेब चोळके, नळे नानासाहेब, वाकडी गटातून अरूंधती फोपसे, सुधीर लहारे, शेळके विष्णुपंत शंकर, पुणतांबा गटातून गाढवे अनिल सोपान, चौधरी संपत नाथाजी इतर मागासवर्गीय मतदार संघातून टिळेकर अनिल राजाराम अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून अलेश कापसे, भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून- सातव मधुकर यशवंतराव, महिला प्रतिनिधी मतदार संघातून शोभाताई गोंदकर, कमलताई धनवटे हे ७०० मतांच्या आसपासच्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहे. तर सहकारी संस्थांमधून विखे गटाला एक जागा मिळाली

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »