बिद्री कारखान्याचे व्हा. चेअरमन फराकटे यांचे निधन
कोल्हापूर : बिद्री सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन गणपतराव फराकटे ऊर्फ तात्या यांचे शनिवारी, (२४ ऑगस्ट) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झाले. कोल्हापुरात खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते ६५ वर्षांचे होते.
माजी आमदार के. पी. पाटील यांचे ते व्याही असलेले तात्या अनेक वर्षांपासून राजकीय, सहकार क्षेत्रात कार्यरत होते. कागलच्या राजकारणातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. बोरवडे ग्रामपंचायतीचे सरपंच पद, कागल पंचायत समितीचे उपसभापती इ. पदेही त्यांनी भूषवली होती.
बिद्री साखर कारखान्यात २५ वर्षाहून अधिक काळ ते संचालक होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती..