आज गौरी पूजन

आज सोमवार, सप्टेंबर १, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक १०, शके १९४७
सूर्योदय: ०६:२३ सूर्यास्त : १८:५३
चंद्रोदय : १३:५९ चंद्रास्त : ००:५६, सप्टेंबर ०२
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : वर्षा
चंद्र माह : भाद्रपद
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : नवमी – ०२:४३, सप्टेंबर ०२ पर्यंत
नक्षत्र : ज्येष्ठा – १९:५५ पर्यंत
योग : विष्कम्भ – १६:३२ पर्यंत
करणबालव – १३:५४ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – ०२:४३, सप्टेंबर ०२ पर्यंत
सूर्य राशि : सिंह
चंद्र राशि : वृश्चिक – १९:५५ पर्यंत
राहुकाल : ०७:५७ ते ०९:३१
गुलिक काल : १४:१२ ते १५:४६
यमगण्ड : ११:०५ ते १२:३८
अभिजित मुहूर्त : १२:१३ ते १३:०३
दुर्मुहूर्त : १३:०३ ते १३:५३
दुर्मुहूर्त : १५:३३ ते १६:२३
अमृत काल : १०:१३ ते ११:५८
वर्ज्य : ०४:३४, सप्टेंबर ०२ ते ०६:१७, सप्टेंबर ०२
दक्षिण भारत – भाद्रपद शुक्ल तृतीयेला गौरीचा सण सुरू होतो व तो बरेच दिवस चालतो. प्रत्येक गावात गौरीची एक पिठाची प्रतिमा करतात व तिला मखरात बसवून पूजतात. तिची रस्त्यातून मिरवणूकही काढतात.
महाराष्ट्रातील कोकण प्रांतातील कोळी समाजगटातील ,महिला या दिवशी तेरड्याची फांदी आणून तिला लक्ष्मीस्वरूप मानून तिची पूजा करतात. या दिवशी देवीला माशाचा नैवेद्य दाखविला जातो.
प्रांता प्रांतात पूजनाच्या विविध पध्द्ती आहेत.
आज गौरी पूजन आहे.
दधिची ( संस्कृत : दधीचि , रोमनीकृत : दधिचि ), दध्यांग , आणि दध्यांचा , हे हिंदू धर्मातील एक ऋषी आहेत पुराणांमध्ये त्याच्या बलिदानासाठी तो प्रसिद्ध आहे, जिथे त्यांनी आपला प्राण त्याग केला जेणेकरून त्याच्या हाडांचा उपयोग वृत्राचा वध करण्यासाठी इंद्र देवताच्या हिऱ्यासारखा आकाशीय वज्र तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो.
भारतीय लष्करी पदक असलेल्या परमवीर चक्राची रचना या ऋषींच्या बलिदानापासून प्रेरित मानली जाते.
आज महर्षी दधिची जयंती.
समाज संघटक दामुअण्णा : श्री दामुअण्णा दाते – अलिबाग जिल्हा रायगड प्राथमिक शिक्षण सोलापूर येथे तेथून वडिलांच्या बदली नुसार बारामती येथे पुढील शिक्षण. याच काळात बारामतीमध्ये त्यांचा संघाशी संबंध आला बारामती येथे मॅट्रिक (अकरावीच्या) वर्गात शिक्षण घेतले पण बारामतीत परीक्षा केंद्र नसल्यामुळे मुंबई केंद्रातून परीक्षेला बसले पुढे व्हीजेटीआय मुंबई येथून विद्युत अभियांत्रिकी पदविका परीक्षा उत्तीर्ण झाले त्यानंतर १९४८ मध्ये रेल्वेच्या टेलीफोन विभागात नोकरीला सुरवात केली. डिसेंबर १९४८ मध्ये संघ बंदीविरोधात सत्याग्रह कारावास व त्याचा परिणाम म्हणून रेल्वेतील नोकरी त्यांना गमवावी लागली.
मार्चमध्ये तुरुंगातून सुटका झाली पण नोकरीची पर्वा किंवा फिकीर न करता संघ कार्यासाठी संघ प्रचारक म्हणून कार्य करण्याचे त्यांनी ठरवले १९५० जूनपासून सुरुवातीला मुंबईत गिरगाव येथे प्रचारक म्हणून नियुक्ती झाली.
१९५२पासून नगर तालुका प्रचारक म्हणून नियुक्ती झाली. संघासाठी तो अतिशय कठीण , खडतर काळ होता संघबंदी नुकतीच उठलेली होती. लोक ना संघाला ओळखत वा संघाच्या विचारसरणीला अशा काळात संघ आणि संघ विचार तळागाळापर्यंत आणि सर्वांपर्यंत पोहोचवणे हे मोठे आव्हान होते आणि त्यांनी ते सहजपणे पार पाडले. त्यावेळेस कम्युनिस्ट बालेकिल्ला असणारा नगर जिल्हा त्यांनी अक्षरश पिंजून काढला आणि नगर परिसर ही त्यांची कर्मभूमी झाली तेथे सुमारे नऊ वर्षे नगर जिल्हा प्रचारक पुढे पुणे सातारा नगर असे विभाग प्रचारक म्हणून १९६५ पासून त्यांची विभाग प्रचारक म्हणून नियुक्ती झाली .
१९६७ मध्ये कोयनानगर येथे झालेला भूकंप प्रत्यक्ष अनुभवला दुसऱ्या दिवशी कोयनानगर येथे संघयंत्रणेतुन मदत कार्याची योजना आखली. १९७१ च्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीत पुणे येथे दुष्काळ विमोचन समिती’ची सुरू झाली या समितीचे पुढे नाव रा. स्व. संघ जनकल्याण समिती असे नामकरण होऊन सेवाकार्यांचे जाळे उभे करण्याचा उपक्रम राज्यात प्रभावीपणे उभा करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. १९७१ मध्ये सह प्रांत प्रचारक म्हणून नियुक्ती झाली प्रामुख्याने अन्य क्षेत्रातील संस्थांच्या व संघाच्या कामातील समन्वय सुसूत्रीकरण याची जबाबदारी पार पाडली.
१९७५ मध्ये आणीबाणीच्या पूर्व कालखंडात भूमीगत राहून आणीबाणी विरोधी लोकसंघर्ष संघटित करण्यात त्यांचा प्रमुख सहभाग होता. १९९७ पासून गुजरात महाराष्ट्र गोवा विदर्भ या पश्चिम क्षेत्राचे क्षेत्रीय कार्यकारणी सदस्य म्हणून नियुक्ती . साप्ताहिक विवेक मध्ये त्यांनी स्मरण शिल्पे नावाची लेखमाला चालू केली. यामध्ये जुन्या कार्यकर्त्यांच्या आठवणी, प्रसंग व व घटना सर्वांसाठी परत एकदा उभ्या केल्या.
सामाजिक समरसता हा त्यांचा तळमळीचा अथक परिश्रमाचा विषय होता. १९८४ मध्ये सामाजिक समरसता मंचाची स्थापना ही त्यांच्या पुढाकाराने झाली. स्वदेशी हा शब्द अर्थ हरवुन बसला आहे गुळगुळीत झाला समरसता या संकल्पनेचे तसे होऊ नये ,केवळ बौद्धिक चर्चा परिपाठ प्रस्तावाचा विषय होऊ नये तर रोजच्या व्यवहारात समरसता आली पाहिजे याबद्दल ते सतत आग्रही होते. आरक्षण पद्धती काय आहे, मंडल कमिशन काय आहे,महिला आरक्षण विधेयक काय आहे हे सगळ्यांनी माहित करुन घेणे असा त्यांचा आग्रह असे जिथे शाखा आहेत त्या परिसरात गावात सर्वांना मंदिर प्रवेश, एक पाणवठा, एक स्मशान हे घडले पाहिजे हा त्यांचा विचार होता संघाच्या स्वयंसेवकांचे घर हे समाज परिवर्तनाचे माध्यम व्हावे शाखेतील १ तासातील संस्काराचे २३ तासांच्या व्यवहारांमध्ये प्रकटीकरण एकात्म समाज निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे हा विचार ते सतत स्वयंसेवकांपुढे मांडत होते.
।। तील -तील कर के जलना पडता है ।जल जल कर के गलना पडता है । गल गल करके मरना पडता है ।। सातत्याने केलेले अथक परिश्रम कष्ट यातून अनेक शारिरीक व्याधींशी ते सामना करत होते तीस वर्ष असणारा मधुमेह , हृदयविकार वीस वर्षे, असाध्य त्या खोकला ताप , अॅनिमिया,या पायांवर सूज लिव्हर सूज मूत्रपिंडाचा असहकार थोडे श्रम झाले की दम लागणे, शरीर व्याधींनी जर्जर पण कार्यरत असताना कधी त्याची तमा बाळगली नाही.
औरंगाबाद ची बैठक संपवून पुण्याकडे येताना संध्याकाळी असणारा तळेगाव चा कार्यक्रम समरसता या विषयावर त्यांचे असणारे भाषण याची ते गाडीमध्ये चर्चा करत होते आणि आणि चर्चा चालू असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे गाडीतच निधन झाले . खरे तर त्यांचा मृत्यू कसा आला हे सांगण्याचा हा खटाटोप नाही तर शेवटच्या श्वासापर्यंत सतत जागणारा अजून एका संघ कार्यकर्त्याची , एका प्रचारकाची कार्य मग्नता जीवन व्हावे – मृत्यू ही विश्रांती उक्ती प्रमाणे जीवन यात्रा थांबली.
त्यांच्या स्मृती आम्हाला ध्येयपूर्तीसाठी चरैवेति चरैवेति करूनच पुढे आणि पुढे नेतील अगदी मृत्यूपर्यंत.
( आज दामुअण्णा यांचा स्मृतीदिन आणि दधिची ऋषी जयंती यातच सर्व काही आले )
२००२ : रा. स्व. संघाचे ज्येष्ठय प्रचारक दामोदर माधव उपाख्य दामुअण्णा दाते यांचे निधन . ( जन्म : ४ मार्च, १९२७ )
घटना :
१९०६: इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटलेक्च्युअल प्रोपर्टी अॅटॉर्नीची स्थापना झाली.
१९११: पं. भास्करबुवा बखले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली.
१९१४: रशियातील सेंट पीट्सबर्ग शहराचे नाव बदलुन पेट्रोग्राड करण्यात आले.
१९२३: टोक्यो आणि योकोहामा परिसरात भूकंप १,०५,००० ठार.
१९३९: जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. या घटनेमुळे दुसर्या महायुद्धाची सुरुवात झाली.
१९५१: अर्नेस्ट हेमिंग्वेयांची द ओल्ड मॅन अॅन्ड द सी ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक व पुलित्झर पुरस्कार मिळाले.
१९५६: भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC of India) स्थापना.
१९६९: लिबीयात उठाव- हुकूमशहा मुअम्मर गडाफी सत्तेवर आला.
१९७२: अमेरिकेच्या बॉबी फिशरने रशियाच्या बोरिस स्पास्कीला बुद्धीबळात पराभूत केले व जगज्जेता बनला.
१९७९: पायोनियर- ११ अंतराळयान शनीपासून २१,००० किमी अंतरावरुन गेले.
१९८५: संयुक्त अमेरिकन-फ्रेंच मोहिमेमुळे बुडालेले आरएमएस टायटॅनिक सापडले.
१९९१: उझबेकिस्तान सोविएत युनियनपासुन स्वतंत्र झाला.
मृत्यू :
१५८१: शिखांचे चौथे गुरू गुरू राम दास यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १५३४)
१८९३: प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक, अखिल भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक, काँग्रेसचे चिटणीस, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट, १८५०)
- जन्म :
१९०८: हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक के. एन. सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी, २०००)
१९१५: ऊर्दू कथाकार आणि हिन्दी पटकथालेखक राजिंदरसिंग बेदी यांचा जन्म
१९२१: यष्टीरक्षक व फलंदाज माधव मंत्री यांचा जन्म. ( मृत्यू: २३ मे, २०१४ )
१९३१: भारतीय शास्त्रज्ञ आणि विद्वान अब्दुल हक अन्सारी यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर २०१२)
१९४९: लोकसभेचे सभापती आणि मेघालयचे मुख्यमंत्री पी. ए. संगमा यांचा जन्म. ( मृत्यू : ४ मार्च, २०१६ )