जनरल अरुणकुमार वैद्य

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज सोमवार, जानेवारी २७, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ ७ , शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०७:१४ सूर्यास्त : १८:२९
चंद्रोदय : ०६:१५, जानेवारी २८ चंद्रास्त : १६:२१
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
उत्तरायण
ऋतु : हेमंत
चंद्र माह : पौष
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : त्रयोदशी – २०:३४ पर्यंत
नक्षत्र : मूळ – ०९:०२ पर्यंत
योग : हर्षण – ०१:५७, जानेवारी २८ पर्यंत
करण : गर – ०८:४९ पर्यंत
द्वितीय करण : वणिज – २०:३४ पर्यंत
सूर्य राशि : मकर
चंद्र राशि : धनु
राहुकाल : ०८:३८ ते १०:०३
गुलिक काल : १४:१६ ते १५:४०
यमगण्ड : ११:२७ ते १२:५१
अभिजितमुहूर्त : १२:२९ ते १३:१४
दुर्मुहूर्त : १३:१४ ते १३:५९
दुर्मुहूर्त : १५:२९ ते १६:१४
अमृत काल :०४:११, जानेवारी २८ ते ०५:४७, जानेवारी २८
वर्ज्य : ०७:२४ ते ०९:०२
वर्ज्य : १८:३६ ते २०:१२

• २००९: भारताचे ८ वे राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १९१०)

लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य – २ महावीर चक्र, एक परम विशिष्ट सेवापदक, एक अति विशिष्ट सेवा पदक अशी बहुमानाची पदके मिळविणारे एकमेव मराठी लष्करी अधिकारी आहेत.

लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य म्हणजेच चीफ ऑफ आर्मी स्टाफ होते.
इ.स. १९६५ चा खेमकरणचा पाकिस्तान बरोबरचा लढा मोठा अविस्मरणीय झाला. पाकिस्तानची पहिली सशस्त्र पलटण आत घुसली होती. त्या सैन्याला घोड्याच्या नालाच्या आकाराची व्यूहरचना करून ३६ तास रणकंदन करून पाकिस्तानचे एम्४७ व एस्४८ हे प्रचंड पॅटन रणगाडे त्यांनी खिळखिळे करुन टाकले. ते सुद्धा डेक्कन हॉर्स जवळील जुन्या “शेरमन” रणगाड्याच्या सहाय्याने, खेमकरण विभागात पाकिस्तानचे ३६ रणगाडे उडवले. ६ सप्टेंबर १९६५ रोजी अतुल शौर्याबद्दल त्यांना महावीरचक (व्हिक्टोरिया क्रॉस सदृश) मिळाले.
त्यांची बदली ईस्टर्न कमांडमध्ये त्रिपुरा, आसाममध्ये नागा टोळीवाल्यांचा बंदोबस्त करण्याकरता झाली. तिथे योजना चातुर्य दाखवून त्यांनी नागांचा तथाकथित जनरल साली, सोळाव्या सशस्त्र पलटणीचे प्रमुख म्हणून वसंतार नदीवर पाकिस्तानचे मोबू अंगामी व इतर सशस्त्र नागांना पकडले.

भारत-पाकदरम्यानच्या १९७१ सालच्या युद्धाच्या वेळी वैद्य `झफरवाल’ विभागाचे ब्रिगेडिअर होते. तेथील युद्धभूमीत जमिनीत सुरुंग पेरलेले होते. जनरल वैद्य यांनी त्या वेळी असामान्य धाडस दाखविले आणि स्वत: सुरुंगातून रस्ता मोकळा करून आपल्या संपूर्ण तुकडीस पुढे घेऊन गेले. त्यामुळे पाकिस्तानी सैन्यावर जलद हल्ला करता आला. त्याच युद्धात बसंतर येथील कारवाईत आपल्या कुशल नेतृत्वाची चुणूक दाखवीत दाट सुरुंग पेरलेल्या भागातून भारतीय रणगाडे सहीसलामत पुढे नेले. याच रणगाडय़ांनी पुढे पाकिस्तानचे ६२ रणगाडे नेस्तनाबूद केले. या त्यांच्या असामान्य धाडसाबद्दलही त्यांना पुन्हा एकदा महावीर चक्र प्रदान करण्यात आले.

१ ऑगस्ट १९८३ रोजी भारताचे सरसेनानी म्हणून त्यांनी सूत्रे हातात घेतली. “जनरल” म्हणून त्यांची एक विशिष्ट कामगिरी वाखाणण्या सारखी आहे. २०,००० फूटांवर “सियाचेन” प्रदेशात लढाईस तयार करण्यात आलेली हिंदी सेना व रशियन बनावटीची टी-७२ बरोबरीचा अर्जुन रणगाडा त्यांनी तयार केला.

३१ जुलै १९८४ रोजी जनरल वैद्य भारताचे तेरावे लष्करप्रमुख बनले. त्यांच्याच कारकिर्दीत ऑपरेशन ब्लू स्टार’ घडले. तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात शरण घेतलेल्या खलिस्तानवादी अतिरेक्यांना हुसकावून लावण्यासाठी ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ या नावाने कारवाई करण्याचे ठरविले होते. या कारवाईचे संपूर्ण नियोजन जनरल वैद्य यांच्या नेतृत्वाखाली आखण्यात आले होते. शीख धर्माच्या पवित्र सुवर्ण मंदिरात सैन्य घुसविणे ही अत्यंत संवेदनशील बाब होती. मात्र असामान्य धाडस दाखवून ही कारवाई करण्यात आली व त्यात भारतीय सैन्य यशस्वी झाले.
(याच धाडसाने जसा श्रीमती इंदिरा गांधी यांचा बळी घेतला, तसाच जनरल वैद्य यांचाही बळी घेतला.)

पोस्टाची तिकिटे जमवण्याचा त्यांना छंद होता. सुमारे दहा हजार तिकिटांचा संग्रह त्यांचेपाशी असावा. घोड्यावरची रोजची रपेट, वाचन, संगीत हे त्यांचे आवडते कार्यक्रम.

जनरल वैद्य यांनी केलेल्या मातृभूमीच्या सेवेबद्दल भारत सरकारने त्यांना मरणोत्तर अतिविशिष्ठ सेवा पदक आणि पद्मविभूषण पुरस्कार घोषित केला.

१९२६: भारताचे १३ वे लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांचा जन्म. (निघृण हत्या / मृत्यू: १० ऑगस्ट १९८६)

  • घटना :
    १८८०: थॉमस अल्वा एडिसन यांनी विजेच्या दिव्यासाठी पेटंट घेतले.
    १९२६: जॉन लोगीबेअर्ड यांनी प्रथमतः टेलिव्हिजनचे प्रात्यक्षिक दाखवले.
    १९४४: दुसरे महायुद्ध – ८७२ दिवस लेनिनग्राडला घातलेला वेढा जर्मन फौजांनी उठवला.
    १९४५: दुसरे महायुद्ध – रशियाच्या रेड आर्मीने पोलंडमधील ऑस्विच येथील छळछावणीतील बंदिवानांची मुक्तता केली.
    १९६७: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. सद्ध्या ही संस्था बालभारती या नावाने ओळखली जाते.
    १९६७: केनेडी अंतराळ केंद्रात अपोलो १ या अंतराळयानाच्या चाचणी दरम्यान आग लागून त्यात गस ग्रिसम, एडवर्ड व्हाइट व रॉजर शॅफी हे अंतराळवीर मृत्युमुखी पडले
    १९७३: पॅरिसमध्ये झालेल्या एका करारान्वये ३१ वर्षे चालू असलेले व्हिएतनाम युद्ध संपुष्टात आले. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला व्हिएतनामसमोर माघार घ्यावी लागली.
    १९८३: जगातील सगळ्यात मोठा पाण्याखालचा बोगदा (५३.९०० किमी) जपानच्या होन्शू व होक्काइदो बेटांमध्ये खुला करण्यात आला.

• मृत्यू :
• १९६८: नाटककार व साहित्यिक सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ कुमुदबांधव यांचे निधन. (जन्म: २६ मे, १९०२)
• १९८६: मैहर घराण्याचे सतारवादक निखिल बॅनर्जी यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर, १९३१)
• २००७: पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक कमलेश्वर यांचे निधन. (जन्म: ६ जानेवारी, १९३२)

  • जन्म :
    १९०१: विचारवंत ‘पद्मभूषण’ लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे१९९४)
    १९२२: हिन्दी चित्रपटांतील खलनायक अजित खान ऊर्फ अजित यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑक्टोबर,१९९८)
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »