‘घोडगंगा’ कामगारांचे ‘दिंडी आंदोलन’
पुणे : न्हावरे येथील श्री. रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने दहा महिन्यांचा थकीत पगार आणि १२ टक्के वेतनवाढीच्या फरकाची रक्कम त्वरित द्यावी, या मागणीसाठी कामगारांनी ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवाला साकडे घालून, दिंडी काढून सोमवारी आंदोलन केले.
दिंडी मोर्चानंतर भाजपचे राजेंद्र कोरेकर, भाजप व्यापारी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष कांडगे,
संभाजी बिडगर, कामगार नेते महादेव मचाले, तात्या शेलार, अनिल शेलार यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. मागणी मान्य झाल्याखेरीज आपण आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटराव भुजबळ, संचालक मानसिंग कोरेकर, संभाजीराव फराटे, संजय काळे, नरेंद्र माने, दत्तात्रय फराटे यांनी तडजोडीचे प्रयत्न केले. मात्र, कामगारांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहात आंदोलन सुरूच ठेवले.
कारखान्याच्या कामगारांनी १ जुलैपासून ‘बेमुदत काम बंद’ आंदोलन सुरू केले आहे.