घोडगंगा कारखान्यावर अशोक पवारांचे वर्चस्व

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे – जिल्ह्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आ. ॲड. अशोकराव पवार यांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले. पवार यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला.

विरोधातील घोडगंगा किसान क्रांती पॅनेलचे दादा पाटील फराटे हे एकमेव उमेदवार विजयी झाले. प्रमुख विजयी उमेदवारामध्ये ॲड अशोक पवार, पंचायत समितीचे माजी उपसभापती वाल्मिकराव कुरुंदळे, आबासाहेब पाचुंदकर आदींचा समावेश आहे.

विरोधकांनी या निवडणुकीत प्रचंड ताकद लावली होती. मात्र त्यांची निराशा झाली. पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग थोरात, पांडुरंग दुर्गे, महेश ढमढेरे, आबासाहेब गव्हाणे यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासूनच सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत शेतकरी विकास पॅनेलचा उमेदवारानी आघाडी घेतली होती. गेल्या २० वर्षाहून अधिक काळ कारखान्यावर पवार यांची एकहाती सत्ता आहे. त्यांनी पुत्र ऋषिराज पवार याला बिनविरोध संचालक म्हणून निवडून आणत राजकारण प्रवेश करून घेतल्याचे मानले जात आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »