‘ज्ञानेश्वर’चे १३ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट
लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचा ५१ वा बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न
नगर – आपल्या कारखान्याने मार्च २०२५ अखेर १२ ते १३ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी दिली.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ५१ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे हस्ते व कारखान्याचे संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष पांडुरंग अभंग यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी अभंग बोलत होते.
कारखान्याचे जेष्ठ संचालक ॲड. देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, डॉ. क्षितिज घुले पाटील, काशिनाथ नवले, काकासाहेब शिंदे, दिलीपराव लांडे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी संचालक शिवाजीराव कोलते व सौ. निर्मला कोलते, बॉयलर अटेंडन्ट बापूसाहेब म्हस्के व सौ.संगीता म्हस्के यांच्या हस्ते विधिवत बॉयलर पूजा करण्यात आली.
संचालक बबनराव भुसारी यांनी आभार मानले.