साखर संघावर घुले, जगताप यांची निवड

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे –
महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या संचालकपदी माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले आणि राहुल जगताप यांची निवड झाली आहे.

संघाच्या माध्यमातून सहकारी साखर कारखानदारीची गुणवत्ता वाढ, शेतकरी व साखर कारखान्यांच्या समस्या, शेतकऱ्यांना रास्त दर, उसाला देण्यात येणारी किमान आधारभूत किंमत, कारखान्यांना मिळणारा वित्तीय पुरवठा, त्यातील व्यावहारिक अडचणी, साखरेची निर्यात याबाबतच्या प्रश्नांचा केंद्र व राज्य शासनाकडे प्रभावीपणे पाठपुरावा करण्याचे काम. सहकारी साखर कारखाना महासंघ करत असतो.

राहुल जगताप हे कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. राज्य साखर संघावर यापुर्वी अध्यक्ष म्हणून स्व. शिवाजीराव नागवडे यांचे काम पाहिले होते तर घनश्याम शेलार हे संचालक आहेत. राहुल जगताप यांच्या निवडीचे श्रीगोंदे तालुक्यात स्वागत करण्यात आले आहे.

जगताप म्हणाले, राज्य साखर संघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यामुळे काम करण्याची संधी मिळाली आहे त्यांचा आभारी आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »