गोपाळ गणेश आगरकर

आज सोमवार, जुलै १४, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर आषाढ दिनांक २३, शके १९४७
सूर्योदय : ०६:०९ सूर्यास्त : १९:२०
चंद्रोदय : २२:०५ चंद्रास्त : ०९:११
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माहआषाढ़
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : चतुर्थी – २३:५९ पर्यंत
नक्षत्र : धनिष्ठा – ०६:४९ पर्यंत
योग : आयुष्मान् – १६:१४ पर्यंत
करण : बव – १२:३३ पर्यंत
द्वितीय करण : बालव – २३:५९ पर्यंत
सूर्य राशि : मिथुन
चंद्र राशि : कुंभ
राहुकाल : ०७:४८ ते ०९:२७
गुलिक काल : १४:२३ ते १६:०२
यमगण्ड : ११:०५ ते १२:४४
अभिजित मुहूर्त : १२:१८ ते १३:११
दुर्मुहूर्त : १३:११ ते १४:०३
दुर्मुहूर्त : १५:४९ ते १६:४२
अमृत काल : २३:२१ ते ००:५५, जुलै १५
वर्ज्य : १३:५४ ते १५:२८
। विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय, लम्बोदराय सकलाय जगद्धिताय।
। नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय, गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते॥
आज संकष्टी चतुर्थी आहे.
२०२३ :आंतराळ संशोधन संस्था इस्रोने जुलै महिन्यात जगाला हेवा वाटेल अशी कामगिरी केली. इस्रोने १४ जुलै २०२३ रोजी श्रीहरीकोटा येथून चांद्रयान ३ हे अवकाशयान लाँच केले.
निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूलें !
स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूलें !! – मा. राजेंद्रसिंहजी.
• एक असामान्य वैज्ञानिक स्वयंसेवक – पू. रज्जुभैय्या
प्राध्यापक डॉ. राजेंद्र सिंहजी उर्फ रज्जूभैय्या यांचा जन्म २९ जानेवारी १९२२ रोजी उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील बनैल गावात श्रीमती ज्वाला देवी आणि श्री कुंवर बलवीर सिंह यांच्या घरात झाला. श्री बलवीरसिंग जी स्वतंत्र भारतातील उत्तर प्रदेशचे पहिले भारतीय मुख्य अभियंता म्हणून नियुक्त झाले. अतिशय सभ्य, हुशार आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. वडिलांचे साधेपणा, काटकसर आणि जीवनमूल्यांची जाणीव यांचा राजेंद्रसिंगांवर विशेष परिणाम झाला.
रज्जू भैय्या यांचे प्राथमिक शिक्षण बुलंदशहर, नैनीताल, उन्नाव आणि दिल्ली येथे झाले. बी.एससी. आणि एम.एस्सी. परीक्षा प्रयागमधून उत्तीर्ण झाली.
एकदा कॉलेजमधील एका एंग्लो-इंडियन विद्यार्थ्याबरोबर त्यांचा गांधीजींविषयी वाद झाला. एंग्लो-इंडियन गांधीजींना दोष देत होते, तर रज्जू भैय्या गांधीजी श्रेष्ठ आहेत असे सांगत होते. यावर प्रतिवाद न करता आल्याने चिडून अँग्लो-इंडियन विद्यार्थ्याने त्यांना दोन ठोसे मारले. रज्जू भैय्या यांनी या अपमानाचा सूड घेण्याचा निर्णय घेतला आणि व्यायामास सुरवात केली. दररोज दोन तास व्यायाम करून शरीरयष्टी व पुरेशी ताकद कमावली. मग एके दिवशी जेव्हा पुन्हा त्या अँग्लो-इंडियनशी वाद होण्याची शक्यता आली तेव्हा रज्जू भैय्यांनी मागचा पुढचा विचार न करता एकदम त्याला जोरदार ठोसा मारला. त्या माराने तो विद्यार्थी इतका बिथरला की पुढे कधीही त्याने रज्जू भैय्यांशी बाद घालण्याचे धाडस केले नाही.
त्यांनी बीएससीची अंतिम वर्षाची परीक्षा दिली त्या परीक्षेत ते अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यावेळी त्यांचे वय २० वर्षे होते. त्याच वर्षी घरच्यांनी त्यांचे लग्न त्यांना न सांगताच ठरविले. मात्र रज्जू भैय्यांनी लग्नाला स्पष्ट नकार दिला. रज्जू भैयांच्या जीवनाचे ध्येय काही वेगळे होते.
रज्जू भैय्या यांचा संघाशी संबंध १९४२ मध्ये प्रयाग विश्वविद्यालयात भौतिक शास्त्र या विषयाची प्राध्यापकी करीत असतांना आला. तसा त्यांचा सामाजिक कार्याचा कल सुरुवातीपासूनच होता. संघाचे तत्कालीन सरसंघचालक श्री गुरूजी यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता.
१९४3 मध्ये रज्जू भैया यांनी काशी येथून प्रथम वर्षाचा संघशिक्षा वर्ग पूर्ण केला. तेथे ‘शिवाजीचे जयसिंगास पत्र’ या विषयावर झालेल्या श्रीगुरुजींच्या बौद्धिक वर्गाने प्रेरित झाल्यानंतर त्यांनी आपले जीवन संघकार्यासाठी वाहिले. आता अध्यापनाच्या कार्याबरोबरच त्यांनी उर्वरित वेळ संघकार्यात व्यतीत करण्यास सुरवात केली. लग्नाच्या बंधनात आपण कधीही अडकणार नाही, असे त्यांनी घरात सांगितले.
प्राध्यापकी करीत असताना रज्जू भैय्या आता संघाच्या कार्यासाठी संपूर्ण उत्तर प्रदेशात प्रवास करू लागले.
ते आपल्या वर्गांचे अशा प्रकारे नियोजन करीत असत की ज्यायोगे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही आणि त्यामुळे त्यांना आठवड्यातून दोन ते तीन दिवस संघ कार्यासाठी संबधित गावी मुक्काम करता येई. शिकवण्याच्या त्यांच्या शैलीमुळे विद्यार्थी त्यांच्या वर्गासाठी उत्सुक होते. रज्जू भैय्या यांची राहणी अत्यंत साधी होती. ते अत्यंत काटकसरीने मिळालेला पगार खर्च करीत व मुद्दाम पैसे शिल्लक ठेवून ते गरीब विद्यार्थ्यांच्या फी आणि पुस्तकांवर खर्च करीत.
आपल्या ६० वर्षांच्या संघकार्य काळात पू. रज्जू भैय्यांनी विविध प्रकारच्या जबाबदार्या पार पाडल्या.
विशेष म्हणजे १९४३ ते १९६६ पर्यंत प्रयाग युनिव्हर्सिटीमध्ये अध्यापनाचे काम करीत असतानाही त्यांनी आपला प्रचारक कार्यकाळ चालूच ठेवला. या काळात त्यांनी अनेक गावांमध्ये , प्रदेशांमध्ये प्रवास करून संघकार्य विस्तार केला.
१९४३ मध्ये त्यांचा प्रथम वर्षाचा संघशिक्षा वर्ग झाला. यावेळी त्यांच्याकडे नगर कार्यवाह हे दायित्व होते. १९५४ मध्ये त्यांनी द्वितीय वर्षाचे प्रशिक्षण घेतले. यावेळी भाऊराव देवरसांनी त्यांच्यावर संपूर्ण उत्तर प्रदेश प्रांताची जबाबदारी सोपवली व ते अन्य प्रांतात संघकार्यासाठी गेले.
१९६१ मध्ये भाऊराव देवरस यांच्याकडे उत्तर प्रदेश प्रांत प्रचारक हे दायित्व आले आणि रज्जू भैय्यांकडे सह प्रांत प्रचारक हे दायित्व आले. पुढे एका वर्षात भाऊरावांचे कार्यक्षेत्र व ओघाने दायित्वही बदलले. त्यामुळे १९६२ ते १९६५ या कालावधीसाठी पू. रज्जूभैय्या यांच्याकडे उत्तर प्रदेश प्रांत प्रचारक हे दायित्व आले. १९६६ ते १९७४ या कालवधीत त्यांनी सह क्षेत्र प्रचारक व क्षेत्र प्रचारक ह्या जबाबदाऱ्या पार पाडल्या.
१९७५ ते १९७७ या कालावधीत आणीबाणीच्या काळात त्यांनी भूमिगत राहून लोकशाही बचाव आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. १९७७ मध्ये त्यांच्याकडे सह सरकार्यवाह हे दायित्व आले व माधवराव मुळे ह्यांच्याकडे सरकार्यवाह हे दायित्व आले.
मात्र माधवरावांच्या निधनामुळे १९७८ मध्ये त्यांच्याकडे सरकार्यवाह हेही दायित्वही आले. त्यामुळे त्यांनी १९७८ ते १९८७ या कालावधीत त्यांना दुहेरी दायित्व सांभाळावे लागले. १९८७ साली श्री. हो. वे. शेषाद्री यांच्याकडे सरकार्यवाह हे दायित्व देण्यात आले व पू. रज्जू भैय्यांकडे सह सरकार्यवाह हे दायित्व देण्यात आले.
१९९३ मध्ये संघाचे तिसरे सरसंघचालक पू. बाळासाहेब देवरस यांनी त्यांच्या हयातीत प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे राजेंद्रसिंहजींना ‘सरसंघचालक पद’ सुपूर्त केले. संघेतिहासातील ही पहिलीच घटना होती.
त्यांच्या आयुष्यातील एक घटना सर्व काही बोलून जाते.
प्रसिद्ध अणूवैज्ञानिक डॉ. होमी भाभा ह्यांनी त्यांना ‘भाभा अणुशक्ती केंद्रा’त नोकरीसाठी आमंत्रित केले होते. पण ज्यांच्या जीवनाचा एकेक क्षण ‘संघमंत्र’ बनला होता, अशा श्री. रज्जूभैय्यांना ही ‘ऑफर’ कशी पटणार ? त्यांनी त्वरित नकार दिला व आपल्या जीवनध्येयावर, संघकार्यावर पुनश्च लक्ष केंद्रित केले. असे म्हणतात की, श्री. रज्जूभैया जर संघात आले नसते तर ते जागतिक स्तरावरचे मोठे शास्त्रज्ञ बनले असते.
त्यांच्या नम्र वागण्यामुळे स्वयंसेवक व कार्यकर्ते त्यांना ‘रज्जू भैय्या’ म्हणून संबोधू लागले.
पू. रज्जू भैयांचा विविध राजकीय पक्ष आणि राजकारणी आणि वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांशी अतिशय जवळचा संपर्क होता. आपल्या प्रवासादरम्यान ते ह्यातील बहुतेकांशी प्रत्यक्ष भेटून अथवा दूरध्वनी, पत्रव्यवहार ह्या माध्यमातून संपर्क करीत असत. सर्व पंथातील धर्मगुरू आणि संतांचा त्यांना आदर होता. यामुळे त्यांना सर्व वर्गातील लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद प्राप्त झाले. भारत आणि परदेशातील शास्त्रज्ञ, विशेषत: सर सी.व्ही. रमण यांसारख्या उत्कृष्ट वैज्ञानिकांचे पू. रज्जू भैयांशी अत्यंत स्नेहपूर्ण संबंध होते.
असे हे असामान्य व्यक्तिमत्व आपल्या देशाला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लाभले हे भाग्यच म्हणावे लागेल.
आज पू. रज्जू भैय्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
• २००३: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक प्रो. राजेंद्रसिंहजी ऊर्फ रज्जू भैय्या यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १९२२)
केसरीचे पहिले संपादक गोपाल गणेश आगरकर – राजकीय स्वातंत्र्याआधी समाजसुधारणा महत्त्वाची आहे. बालविवाह, अस्पृश्यता यांसारख्या समाजातील अनिष्ट रूढी आधी नष्ट केल्या पाहिजेत अशा विचारांचे ते होते. समाजसुधारणा विरुद्ध राजकीय स्वातंत्र्य याच वादातून १८८७ च्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी केसरीचे संपादकत्व सोडले.
१८८८ साली त्यांनी ‘सुधारक (वृत्तपत्र)’ हे वृत्तपत्र सुरू केले. व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद, भौतिकता या मूल्यांचा प्रचार त्यांनी सुधारकमधून केला, तसेच जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य, बालविवाह, ग्रंथप्रामाण्य- धर्मप्रामाण्य, केशवपन इत्यादी अन्यायकारक परंपरांना त्यांनी विरोध केला. अंधश्रद्धा, पाखंडीपणा यांच्यावर प्रहार केले. सुधारक हे इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित केले जात होते.
इंग्रजी सुधारकची जबाबदारी काही काळ नामदार गोखले यांनी सांभाळली होती. आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केला समाजाने व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करून समाजातील त्या-त्या घटकाला स्वातंत्र्य देणे आवश्यक आहेत याला स्त्रिया देखील अपवाद असता कामा नयेत श्री स्वातंत्र्याचा देखील पुरस्कार झाला पाहिजे याचा पुनरुच्चार आगरकरांनी केला.
राजकीय व सामाजिक बाबतीत समता, संमती व स्वातंत्र्य हे घटक महत्त्वाचे आहेत; मनुष्यकृत विषमता शक्य तितकी कमी असावी; सर्वांस सारखे, निदान होईल तितके सारखे सुख मिळण्याची व्यवस्था होत जाणे म्हणजे सुधारक होत जाणे – अशी त्यांची सुटसुटीत विचारसरणी होती. ‘विचारकलह हा समाजस्वास्थ्याला आवश्यक आहे,’ असे त्यांचे मत होते. त्यांच्या या विचारसरणीमुळे त्यांना टोकाचा विरोध झाला.
सनातनी लोकांनी त्यांच्या जिवंतपणीच त्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली होती. पण तरीही निग्रहाने आणि निश्चयाने त्यांनी आपल्या विचारांचा पाठपुरावा केला.
वयाच्या अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले.
१८५६: थोर समाजसुधारक तसेच केसरीचे पहिले संपादक गोपाल गणेश आगरकर यांचा टेंभू कराड येथे जन्म. (मृत्यू: १७ जून १८९५)
- घटना :
१७८९: पॅरिस मध्ये नागरिकांनी फ्रेंच राज्यसत्तेचे दडपशाहीचे चिन्ह असलेल्या बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला आतील सात बंद्यांची मुक्तता केली. ही घटना म्हणजे फ्रेंच क्रांतीची मुहूर्तमेढ होती.
१८६७: आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइट या स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले.
१९५८: इराक मध्ये राजेशाही विरुद्ध उठाव. अब्दुल करीम कासम सत्तेवर.
१९६०: चिंपांझींचा अभ्यास करण्यासाठी जेन गुडॉल टांझानियातील अभयारण्यात दाखल झाल्या. ४५ वर्षे त्यांनी संशोधन केले.
१९६९: अमेरिकेने $500, $1,000, $5,000 व $10,000 च्या नोटा चलनातुन काढुन टाकल्या.
१९७६: कॅनडात मृत्युदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली.
२००३: जागतिक बुद्धिबळ महासंघ द्वारा सन्दीप चंदा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार मिळाला.
२०१३: डाकतार विभागाची १६० वर्षांपासूनची तार सेवा बंद झाली.
• मृत्यू :
• १९३६: भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान धन गोपाळ मुखर्जी यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १८९०)
• १९६३: योगी व आध्यात्मिक गुरू स्वामी शिवानंद सरस्वती यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर १८८७)
• १९७५: संगीतकार मदनमोहन यांचे निधन. (जन्म: २५ जून १९२४)
• १९९३: करवीर संस्थानच्या महाराणी श्रीमंत विजयमाला राणीसाहेब यांचे निधन.
• २००३: हिंदी चित्रपट अभिनेत्री लीला चिटणीस यांचे निधन. (जन्म: ९ सप्टेंबर१९०९)
• २००८: सर्वोच्च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड यांचे निधन. (जन्म: १२ जुलै , १९२०)
- जन्म :
१८८४: महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर , १९७०)
१८९३: भारतीय कवी आणि लेखक गारिमेला सत्यनारायण यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर १९५२)
१९१७: संगीतकार रोशनलाल नागरथ ऊर्फ रोशन यांचा जन्म. (मृत्यू: १६ नोव्हेंबर, १९६७)
१९२०: केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी, २००४)