दोन-तीन महिन्यांत मला तुरुंगात टाकले जाईल : आ. रोहित पवार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : मला राजकीय सूडापोटी लक्ष्य केले जात आहे, त्यातूनच येत्या दोन-तीन महिन्यांत मला अटक करून तुरुंगात टाकण्याचे सत्ताधाऱ्यांचे मनसुबे आहेत, असा घणाघाती आरोप आ. रोहित पवार यांनी केला आहे.

कन्नड कारखाना जप्तीची नोटीस मला अद्याप आलेली नाही. राजकीय द्वेषातून माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. प्रतिकात्मक (प्रोह्विजनल) जप्तीचे आदेश ईडीकडून देण्यात आले आहेत. जप्तीची नोटीस आमच्याकडे पोहचली नाही. त्यांचे ट्विट पाहिल्यावर आम्हाला ही माहिती कळाली. जप्ती म्हणजे संपूर्ण जप्ती नाही एक प्रतिकात्मक आहे, असा खुलासाही आ. पवार यांनी केला आहे.

बारामती ॲग्रोचे व्यवस्थापकीय संचालक आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भारतीय जनता पार्टीवर गंभीर आरोप केले आहेत. “पक्ष चोरी केल्यानंतर माझ्यावरील कारवाईला सुरुवात झाली. ईडीची यामध्ये काहीही चूक नाही. मी त्यांना सहकार्य करत आहे. आम्ही 22 फेब्रुवारी रोजी सर्व माहिती त्यांना दिली होती, असे रोहित पवार म्हणाले. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते

रोहित पवार म्हणाले, विधानसभेत देखील मला अनेकांनी सांगितलं की तू गप बस. मात्र, आम्ही या प्रकरणात कुठे ही घाबरत नाहीत. ज्यांचे नाव दोषी म्हणून आहे, त्यातील 70 टक्के नावं भाजप, शिवसेना अजित दादांकडे आहेत. एकावरही आत्तापर्यंत कारवाई केली नाही. मात्र आता, माझ्यावर केस आली मी लढणार आणि जिंकणारच आहे.

पुढील 2-3 महिन्यात मला जेलमध्ये टाकले जाईल. मी संघर्ष यात्रा काढली म्हणून माझ्या विरोधात नोटीस काढली गेली. निवडणुकीच्या आधी मी शांत बसावं म्हणून मला नोटीस दिली जातेय का? मला अडचणीत आण्याच्या प्रयत्न केला जातोय, असे रोहित पवार म्हणाले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »