‘त्या’ कारखान्यांसाठीच्या समितीची पुनर्रचना

मुंबई : आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेले सहकारी साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्यासाठी नेमलेल्या समितीची पुनर्रचना केली असून, या समितीत चारजणांचा समावेश करण्यात आला आहे. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आहे. राज्यातील सत्तांतरानंतर ही समिती अस्तित्वात नव्हती. आता राज्यात नवीन सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे या विषयाला नवी गती मिळणार आहे.
राज्यातील आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या किंवा अवसायनात आलेल्या सहकारी साखर कारखान्यांसह त्यांची अन्य युनिट भाडेतत्त्वावर किंवा सहयोगी तत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी २०२० मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीच्या बैठकीत, साखर कारखाने चालविण्यास देण्याबाबत निकष निश्चित करण्यात आले होते.