। नूतन वर्षारंभस्य शुभचिंतनम् ।

आज रविवार, मार्च ३०, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र ९, शके १९४७
सूर्योदय : ०६:३४ सूर्यास्त : १८:५२
चंद्रोदय : ०६:५९ चंद्रास्त : १९:५७
शालिवाहन शक संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : चैत्र
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : प्रतिपदा – १२:४९ पर्यंत
नक्षत्र : रेवती – १६:३५ पर्यंत
योग : इन्द्र – १७:५४ पर्यंत
करण : बव – १२:४९ पर्यंत
द्वितीय करण : बालव – २२:५९ पर्यंत
सूर्य राशि : मीन
चंद्र राशि : मीन – १६:३५ पर्यंत
राहुकाल : १७:२० ते १८:५२
गुलिक काल : १५:४७ ते १७:२०
यमगण्ड : १२:४३ ते १४:१५
अभिजित मुहूर्त : १२:१८ ते १३:०८
दुर्मुहूर्त : १७:१३ ते १८:०३
अमृत काल : १४:२८ ते १५:५२
। नूतन वर्षारंभस्य शुभचिंतनम् ।
आज शोभन संवत्सर, उत्तरायण, वसन्त ऋतू, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा. म्हणजे गुढीपाडवा.
महाराष्ट्रात, चंद्राच्या तेजस्वी अवस्थेच्या पहिल्या दिवसाला गुढी पाडवा ( मराठी : गुढी पाडवा ), पाडवो ( कोकणी : पाडयो ; कन्नड : ಪಾಡ್ಯ ; तेलुगु : పాడ్యమి ) म्हणतात. कोंकणी हिंदू वेगवेगळ्या प्रकारे या दिवसाला सौसार पडवो किंवा सौसार पडयो (अनुक्रमे सौसार पाडवो आणि सौसार पाड्यो) म्हणून संबोधतात. कर्नाटकातील कन्नड हिंदू याला [उगादी]] (युगादि/ ಯುಗಾದಿ), हिंदू प्रसंगी उगादि , त्याच प्रसंगी साजरा करतात . सिंधी लोक हा दिवस चेतीचंद म्हणून साजरा करतात , हा दिवस झुलेलालच्या उदयाच्या दिवसाच्या रूपात साजरा केला जातो . झुलेलालला प्रार्थना केली जाते आणि ताहिरी (गोड भात) आणि साईभाजी सारखे स्वादिष्ट पदार्थ बनवून हा सण साजरा केला जातो .
तथापि, हे सर्व हिंदूंसाठी सार्वत्रिक नवीन वर्ष नाही. काहींसाठी, जसे की गुजरातमधील आणि जवळच्या लोकांसाठी, नवीन वर्षाचे उत्सव पाच दिवसांच्या दिवाळी सणासोबतच येतात. इतर अनेकांसाठी, हिंदू चंद्र सौर दिनदर्शिकेच्या सौर चक्र भागानुसार, नवीन वर्ष वैशाखी रोजी १३ ते १५ एप्रिल दरम्यान येते आणि हे केवळ भारतीय उपखंडातील हिंदूंमध्येच नव्हे तर आग्नेय आशियातील बौद्ध आणि हिंदूंमध्ये देखील सर्वात लोकप्रिय आहे.
एकूण हा दिवस म्हणजे नवीन संवत्सराचा पहिला दिवस.
“अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥ ५० ॥”
– श्री ज्ञानेश्वरी
आरंभ होई चैत्रमासीचा गुढय़ा-तोरणे सण उत्साहाचा.
गुढीपाडव्याचा सन
आतां उभारा रे गुढी
नव्या वरसाचं देनं
सोडा मनांतली आढी
गेलसालीं गेली आढी
आतां पाडवा पाडवा
तुम्ही येरांयेरांवरी
लोभ वाढवा वाढवा
- कवियत्री बहिणाबाई चौधरी
आज हिंदू नववर्ष प्रारंभ आहे
प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!
गुढीपाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा…
१९४० : ॥ शके अठराशें एकसष्टांत । प्रमाथिनाम संवत्सरांत । चैत्रमासीं शुद्धांत । वर्षप्रतिपदेला ॥५१॥ हा ग्रंथ कळसा गेला । शेगांव-ग्रामीं भला । तो गजाननांनीं पूर्ण केला । प्रथम प्रहरीं बुधवारीं ॥५२॥
शके १८६१ (बुधवार, २२ मार्च *१९३९ ) वर्षप्रतिपदेला संत कवी *श्री दासगणू महाराज यांनी संत श्रेष्ठ शेगाव निवासी श्री गजानन महाराज यांच्यावरील २१ अध्यायांचा ‘ श्री गजानन विजय ‘ ग्रंथ लेखन पूर्ण करून श्रींचे चरणी अर्पण केला.
सरसेनापती जनरल थिमय्या, कोदेंदर सुबय्या – यांचे शालेय शिक्षण बंगलोर येथे व डेहराडून येथील राष्ट्रीय सैनिकी विद्यालयात प्राथमिक लष्करी शिक्षण. त्यानंतर इंग्लंडमधील शाही सैनिकी महाविद्यालयात शिक्षण घेतल्यावर १९२६ साली हैदराबाद पायदळ रेजिमेंट (सध्याची कुमाउँनी) मध्ये राजादिष्ट अधिकारी. १९३५ मध्ये नीना करिअप्पा यांच्याशी विवाह. १९३६‒३९ मध्ये मलायात कामगिरी. १९४१ साली स्टाफ कॉलेजचा शिक्षणक्रम पूर्ण. दुसऱ्या महायुद्धात आराकान मोहिमेत ३६व्या पायदळ ब्रिगेडचे प्रथम ब्रिगेडिअर. त्यांच्याच हाताखाली ले. कर्नल (आता ले. जनरल) शं. पां. पाटील थोरात व लि. प्र. ऊर्फ बोगी सेन हे दोघे पायदळ अधिकारी होते. सप्टेंबर १९४५ मध्ये जपानकडून लष्करी शरणागती स्वीकारण्याच्या वेळी हिंदुस्थानी सेनेचे हे एकमेव प्रतिनिधी होते.
१९४६ साली जपानमध्ये २६८ या ब्रिगेडचे मुख्याधिपती. १९४७ च्या फाळणीनंतर त्यांनी निर्वासितांच्या पुनर्वसन कार्यात मोठी कामगिरी बजावली. १९४८ मध्ये काश्मीरमधील आक्रमकांचा पराभव करणाऱ्या भारतीय सेनेचे प्रमुख. १९५०-५१ साली राष्ट्रीय सैनिकी प्रबोधिनीचे समादेशक (कमांडंट). १९५१-५२ मध्ये संयुक्त राष्ट्रांतील भारतीय प्रतिनिधी मंडळाचे सैनिकी सल्लागार. कोरियन युद्धानंतर (१९५०‒५३) युद्धकैदी स्वदेश प्रत्यावर्तन कार्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या आयोगाचे अध्यक्ष व पंच.
१९५७ ते १९६१ या काळात भूसेनाध्यक्ष. याच कालखंडात त्यावेळचे संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांच्याशी झालेल्या मतभेदावरून त्यांनी आपल्या जागेचा राजीनामा देण्याचा व तो परत घेण्याचा प्रसंग घडला. १९६१ साली ३५ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्ती. जून १९६४ पासून मृत्यूपर्यंत सायप्रससध्ये ग्रीक व तुर्क यांच्यात शांतता राखण्यासाठी, संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेचे सेनापती. सायप्रसमध्ये कार्यरत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या सैनिकी व इतर महत्त्वाच्या कार्यामुळे त्यांचा माननीय असा उल्लेख (१९४४) करण्यात आला व त्यांना महावीरचक्र आणि पद्मभूषण या पदव्या देऊन गौरविण्यात आले आहे.
१९०६: भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती जनरल कोदेंदर सुबय्या तथा के. एस. थिमय्या यांचा जन्म. ( मृत्यू: १७ डिसेंबर १९६५ )
- घटना :
१७२९: थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला.
१८४२: अमेरिकन शल्यविशारद डॉ. क्रॉफर्ड लाँग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इथर या द्रव्याचा प्रथमच वापर केला.
१८५६: पॅरिसचा तह झाल्याने क्रिमियन युद्ध संपले.
१९११ : ।। ही मी देतों भाकर । ती खाऊं घाला लवकर । टिळकांप्रती अंतर । यांत कांहीं करुं नका ॥८८॥ या भाकरीच्या बळावरी । तो मोठी करील कामगिरी । जातो जरी फार दूरी । परी न त्याला इलाज ॥
गीता रहस्य लेखनास प्रत्यक्ष श्री गजानन महाराजांचा शुभ आशीर्वाद होता.
लोकमान्य टिळकांनी मंडाले तुरुंगात ह्या ग्रंथाचे लेखन केले .
आज गीता रहस्य ग्रंथ जयंती आहे . ( ०८ जून , १९१५ रोजी प्रथम आवृत्ती प्रकाशित केली. )
१९२९: भारत व इंग्लंडदरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली.
१९३९: हेइंकेल १०० ह्या सैनिकी विमानाने ७४५ किमी / ताशी वेगाने उडण्याचा विक्रम केला.
१९४४: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी सोफिया, बल्गेरिया येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.
• मृत्यू :
• १९६९: कवी व समाजसेवक वासुदेव गोविंद मायदेव यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १८९४)
• १९७६: चित्रकार रघुवीर मूळगावकर यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९१८)
• १९८९: सोबत साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक गजानन वासुदेव तथा ग. वा. बेहेरे यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर , १९२२)
• १९९३ : व्यासंगी, अद्भूत व वास्तववादी चित्रकार साबानंद मोनप्पा उर्फ एस. एम. पंडित यांचे निधन ( जन्म : २५ मार्च, १९१६)
• २००२: गीतकार आनंद बक्षी यांचे निधन. (जन्म: २१ जुलै १९३०)
• २००५: भारतीय लेखक आणि चित्रकार ओ. व्ही. विजयन यांचे निधन. (जन्म: २ जुलै १९३०)
- जन्म :
१८९९ : अनेक चित्रपटांसाठी पटकथा लेखनाचं काम करणारे बंगाली कथाकार आणि कादंबरीकार शरदिंदू बंडोपाध्याय यांचा जन्म ( मृत्यू : २२ सप्टेंबर १९७० )
१९०८: अभिनेत्री देविका राणी यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १९९४)
१९१३ : भारताचे दुसरे नौदलप्रमुख व्हाईस अॅडमिरल भास्कर सोमण यांचा जन्म ( मृत्यू : ८ फेब्रुवारी १९९५)
१९२१ : भारतीय कालगणना सांगणारी आणि भारताच्या सामाजिक, आर्थिक जडणघडणीचा महत्त्वाचा भाग असलेली परंपरा म्हणजे पंचांग . पंचांगाचे रूपांतर वृक्षामध्ये होण्यासाठी महत्वाची जबाबदारी उचलणारे पंडित धुंडिराजशास्त्री ऊर्फ अण्णा लक्ष्मण दाते यांचा जन्म ( मृत्यू : १८ एप्रिल १९९५ )
१९२८ : संगीत क्षेत्रातील जुन्या पिढीतील भावगीत गायक दत्ता वाळवेकर तथा ‘मास्टर दत्ता‘ यांचा जन्म. ( मृत्यू : १६ मार्च २०१०)
१९३८: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चे स्थापक क्लाउस स्च्वाब यांचा जन्म.
१९४२: भाषातज्ज्ञ, कोशकार, लेखक आणि कवी वसंत आबाजी डहाके यांचा जन्म.
१९५३ : प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये सरकारी बाजू मांडणारे वकील उज्ज्वल निकम यांचा जन्म.
१९६३ : प्रसिद्ध तबलावादक पंडित रामदास पळसुले यांचा जन्म
१९७७: भारतीय संचालक आणि पटकथालेखक अभिषेक चोब्बे यांचा जन्म.