वसंतकुमार पदुकोण ऊर्फ गुरूदत्त

आज बुधवार, जुलै ९, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर आषाढ दिनांक १८, शके १९४७
सूर्योदय : ०६:०७ सूर्यास्त : १९:२०
चंद्रोदय : १८:२० चंद्रास्त : ०५:१९, जुलै १०
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माहआषाढ़
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : चतुर्दशी – ०१:३६, जुलै १० पर्यंत
नक्षत्र : मूळ – ०४:५०, जुलै १० पर्यंत
योग : ब्रह्म – २२:०९ पर्यंत
करण : गर – १३:११ पर्यंत
द्वितीय करण : वणिज – ०१:३६, जुलै १० पर्यंत
सूर्य राशि : मिथुन
चंद्र राशि : धनु
राहुकाल : १२:४४ ते १४:२३
गुलिक काल : ११:०५ ते १२:४४
यमगण्ड : ०७:४६ ते ०९:२५
अभिजित मुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:१७ ते १३:१०
अमृत काल : २२:०० ते २३:४३
वर्ज्य : ११:४६ ते १३:२९
वर्ज्य : ०३:०७, जुलै १० ते ०४:५०, जुलै १०
आदर्श, अभ्यासू लोकप्रतिनिधी – रामचंद्र काशीनाथ म्हाळगी ऊर्फ रामभाऊ म्हाळगी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि विधानसभेतील पहिले आमदार, तसेच भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राचे पहिले प्रादेशिक अध्यक्ष होते.
जनता पार्टीचे खासदार म्हणून १९७७ साली व १९८० साली ते ठाणे लोकसभा मतदार संघातून निवडून आले होते.
आपला मुद्दा कोणत्याही परिस्थितीत ते सोडत नसत . आज महाराष्ट्र शासनाचे जे मुंबई गृहनिर्माण दुरुस्ती विधेयक आहे (म्हाडातर्फे) त्यांच्यातर्फे गिरणगावातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचे विधेयक विधानसभेत जेव्हा चर्चेला आले तेव्हा गृहनिर्माण मंत्री यशवंतराव मोहिते होते. तेही अभ्यासू. रामभाऊ म्हाळगींनी या विधेयकाला १९५ उपसूचना मांडल्या होत्या आणि यातील प्रत्येक सूचना रामभाऊंनी मताला टाकून पहाटे पाच वाजेपर्यंत विधानसभागृहाची बैठक चालवली.
१९२१: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, ज्येष्ठ संसदपटू, रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म. (मृत्यू: ६ मार्च १९८२)
गुरुदत्त – ९ जुलै १९२५ रोजी बेंगळुरूमध्ये जन्मलेला वसंतकुमार शिवशंकर पदुकोन ऊर्फ गुरुदत्त हा हिंदी चित्रपटसृष्टीतला असामान्य दिग्दर्शक, दूरदृष्टीचा निर्माता आणि संवेदनशील अभिनेता म्हणून विख्यात आहे. त्याला नृत्याची उत्तम जाण होती आणि संगीताचा उत्तम कानसुद्धा. ओ. पी. नय्यर, सचिनदेव बर्मन, हेमंतकुमार, रवी यांसारख्या मातब्बर संगीतकारांकडून त्याने अजरामर गाणी आपल्या सिनेमांसाठी मिळवली. अवघ्या ३९ वर्षांच्या आयुष्यात त्याने जी कामगिरी करून ठेवली आहे, त्याला तोड नाही.
१९५१सालच्या ‘बाझी’पासून ते १९५९च्या ‘कागज के फूल’पर्यंतच्या आठ अफलातून कलाकृतींचं दिग्दर्शन, १९५४च्या ‘आरपार’पासून ते १९६६च्या ‘बहारें फिर भी आएगी’पर्यंतच्या आठ उत्तम सिनेमांची निर्मिती आणि १९४४च्या ‘चांद’पासून ते १९६४च्या ‘सांज और सवेरा’पर्यंतच्या १६ बहारदार सिनेमांतला अभिनय ही कामगिरी अचंबित करणारी अशीच म्हणावी लागेल!
त्यांनी दिग्दर्शित केलेले सर्वच सिनेमे म्हणजे आदर्श दिग्दर्शनाचा वस्तुपाठ ठरले असले, तरी खास उल्लेख करावाच लागतो तो ‘प्यासा’ आणि ‘कागज के फूल’ या दोन सिनेमांचा! जगभर घेतल्या गेलेल्या बहुतेक सर्वच सर्वेक्षणांमध्ये जगभरातल्या समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी या दोन सिनेमांना १०० सार्वकालिक उत्कृष्ट सिनेमांच्या यादीत आदराचं स्थान दिलं आहे. एकीकडे प्यासा, कागज के फूल, साहिब बीबी और गुलाम यांसारखे आशयघन, तरल, संवेदनशील सिनेमे बनवणाऱ्या गुरुदत्तने प्रेक्षकांची नाडी अचूक ओळखून बाझी, जाल, आरपार, मिस्टर अँड मिसेस ५५, सीआयडी, चौदहवी का चांद यांसारखे संगीतप्रधान आणि निखळ मनोरंजन करणारे सिनेमेही दिले आणि त्याचबरोबर ट्वेल्व्ह ओ क्लॉक, भरोसा, बहुरानी, सुहागन, सांज और सवेरा यांसारख्या इतर निर्मात्यांच्या सिनेमांत काम करून आपल्या अभिनयाची छापसुद्धा पाडली.
२२ जून १९६२ रोजी ‘साहिब बिवी और गुलाम’ प्रदर्शित झाला. बिमल मित्र यांच्या कादंबरीवरील या सिनेमातून मीना कुमारी प्रथमच त्यांच्या कॅम्पसमध्ये आली. तिने रंगवलेली छोटी बहूची भूमिका तिच्या करीयरमधील माइलस्टोन ठरली. खरं तर या सिनेमानंतर गुरू नवीन सिनेमाच्या तयारीत होता (बहारे फिर भी आयेगी) पण कुटुंबातील वाढलेले ताणतणाव, व्यसनाचा वाढलेला अंमल, सिनेमासारख्या बेभरवशाच्या दुनियेत सातत्याने होणारी घुसमट, मानसिक गुंतागुंत या सर्व गोष्टींचा परिपाक १० ऑक्टोबर १९६४ झाला. गुरूने आपला आपण सर्वनाश ओढवून घेतला.
आज जगातील श्रेष्ठ दिग्दर्शकाच्या पंक्तीत बसणारी जगन्मान्य कामगिरी करणाऱ्या या महान कलावंताला त्याच्या हयातीत सन्मानाचे फारसे क्षण लाभले नाहीत.
१९२५: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ गुरूदत्त यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर १९६४)
पटकथालेखक के. बालाचंदर – हे एक भारतीय चित्रपट निर्माता आणि नाटककार होता ज्यांनी प्रामुख्याने तामिळ चित्रपट उद्योगात काम केले. ते आपल्या चित्रपटाच्या वेगळ्या शैलीसाठी सुप्रसिद्ध होते आणि भारतीय चित्रपटसृष्टी त्यांना अपारंपरिक विषय आणि कठोर-तत्कालीन समकालीन विषयांचा मास्टर म्हणून ओळखले जात असे. बालाचंदरचे चित्रपट स्त्रियांच्या ठळक व्यक्तिमत्त्व आणि मध्यवर्ती व्यक्तिरेखांच्या भूमिकेसाठी चांगलेच ओळखले जातात .
त्याचे चित्रपट सामान्यत: असामान्य किंवा गुंतागुंतीच्या परस्पर संबंध आणि सामाजिक विषयावर केंद्रित असतात. १९६४ मध्ये त्यांनी पटकथा लेखक म्हणून चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली आणि नीरकुमिझी (१९६५) सह दिग्दर्शनाची सुरुवात केली.
आपल्या चित्रपट कारकिर्दीत, बालाचंदरने नऊ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि १३ फिल्मफेअर पुरस्कार जिंकले होते. त्यांना १९८७ मध्ये भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री आणि २०१० मध्य भारताचा चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च पुरस्कारे दादासाहेब फाळके पुरस्कारदेऊन गौरविण्यात आले.
१९३०: कला योगदानासाठी पद्मश्री तसेच दादासाहेब फाळके पुरस्कार सन्मानित तमिल, कन्नड़, तेलुगु, मलयालम आणि हिन्दी भाषिक चित्रपट भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक के. बालाचंदर यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर, २०१४)
- घटना :
१८७३: मुंबई शेअर बाजार सुरू झाला.
१८७७: विंबल्डन चॅम्पियनशिप सुरु झाली.
१८९३: डॉ. डॅनियल हेल यांनी जगातील पहिली यशस्वी ओपन हार्ट शस्त्रक्रिया शिकागो येथे केली.
१९४९ : युवा शक्तीला राष्ट्र उभारणीच्या विधायक कार्यात सहभागी करून घेणारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ह्या समर्थ युवा चळवळीची स्थापना.
१९५१: भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.
२०११: सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती.
• मृत्यू :
•१९६८: सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल , १८९६)
•२००५: महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री डॉ. रफिक झकारिया यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल, १९२०)
- जन्म :
१९३८: १४ फिल्मफेअर पुरस्कारांसाठी नामांकन पुरस्कार सन्मानित हिंदी अभिनेते हरी जरीवाला ऊर्फ संजीव कुमार यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९८५)