गुरु गोविंद सिंग जी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज रविवार, डिसेंबर २२, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष १, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०७:०८ सूर्यास्त : १८:०७
चंद्रोदय : ००:३१, डिसेंबर २३ चंद्रास्त : १२:१६
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : हेमंत
चंद्र माह : मार्गशीर्ष
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : सप्तमी – १४:३१ पर्यंत
नक्षत्र : उत्तराफाल्गुनी – पूर्ण रात्रि पर्यंत
योग : आयुष्मान् – १९:०० पर्यंत
करण : बव – १४:३१ पर्यंत
द्वितीय करण : बालव – ०३:४७, डिसेंबर २३ पर्यंत
सूर्य राशि : धनु
चंद्र राशि : सिंह – १२:५६ पर्यंत
राहुकाल : १६:४४ ते १८:०७
गुलिक काल : १५:२२ ते १६:४४
यमगण्ड : १२:३७ ते १४:००
अभिजितमुहूर्त : १२:१५ ते १२:५९
दुर्मुहूर्त : १६:३९ ते १७:२३
अमृत काल : ०१:०४, डिसेंबर २३ ते ०२:५२, डिसेंबर २३
वर्ज्य : १४:१८ ते १६:०६

आज २२ डिसेंबर – वर्षातील सर्वात लहान दिवस आहे

आज राष्ट्रीय गणित दिन आहे.

धर्म व समाजाच्या संरक्षणासाठी गुरु गोविंद सिंहजी यांनी १६९९ मध्ये खालसा पंथाची स्थापना केली. खालसा पंथाच्या माध्यमातून त्यांनी जातीय भेद नष्ट करून समानता प्रस्तापित केली. शीख बांधवामध्ये आत्म-सन्मानाची भावना वाढीस लावली.

गुरु गोविंद सिंह यांना तीन पत्नी होत्या. माता जीतोजी, माता सुंदरीजी व माता साहिबकौरजी अशी त्यांची नावे होती. बाबा अजित सिंह, बाबा जुझार सिंह ही त्यांची मुले होती. ती चमकौरच्या युद्धात शौर्यमरण प्राप्त झाले होते. तर बाबा जोरावर सिंह व फतेह सिंह या लहान मुलांना सरहंदच्या नवाबने जिवंत भिंतींत पुरले होते. केसगड, फतेहगड, होलगड, आनंदगड व लोहगड हे किल्ले त्यांनी युद्धात जिंकले होते.
गुरुजी दररोज गुरूवाणीचे पठण करून आपल्या भक्तांना त्याचा सविस्तर अर्थही सांगत असत. तेव्हा त्यांचे लहान भाऊ मनी सिंहजी ते लिहीत असत. सलग पाच महिने लिहून गुरुवाणी पूर्ण झाली होती.
गुरु गोविंद सिंहजी यांनी 42 वर्षापर्यंत शत्रूविरुद्ध सामना केला होता.

कट्टर आर्यसमाजी असलेले लाला दौलतराय गुरू गोविंदजींबद्दल लिहितात, ‘मी स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, परमहंस इत्यादींबद्दल खूप काही लिहू शकतो, पण जे परिपूर्ण पुरुष आहेत त्यांच्याबद्दल मी लिहू शकत नाही. मला गुरू गोविंद सिंगमध्ये परिपूर्ण माणसाचे सर्व गुण दिसतात.’ म्हणून लाला दौलतराय यांनी गुरू गोविंद सिंगजींबद्दल पूर्ण पुरुष नावाचे एक चांगले पुस्तक लिहिले आहे.

त्याचप्रमाणे मुहम्मद अब्दुल लतीफ देखील लिहितात की जेव्हा मी गुरू गोविंद सिंगजींच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करतो तेव्हा त्यांच्या कोणत्या पैलूचे वर्णन करावे हे मला समजत नाही. कधी तो मला महाधिराज, कधी महान दाता, कधी फकीर, कधी गुरू म्हणून दिसतो.


शिखांचे दहावे गुरू असण्यासोबतच गुरुजी हे एक महान योद्धा, कवी, भक्त आणि आध्यात्मिक नेता, मूळ विचारवंत आणि संस्कृत, ब्रज भाषा, पर्शियन यासह अनेक भाषांचे जाणकार होते. ते लहानपणापासूनच साधे, सोपे, भक्ती कर्मयोगी होते.

गुरू गोविंद सिंग यांनी त्यांच्या हयातीत अनेक सृष्टी केली, ज्यांची छोटी छोटी पुस्तके तयार झाली. ते गेल्यानंतर त्यांची पत्नी माता सुंदरी यांच्या सांगण्यावरून भाई मणिसिंग खालसा आणि इतर खालसा बांधवांनी त्यांचे सर्व लेखन एकत्र करून एका खंडात ठेवले.

१७०८ मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील नांदेड येथील सचखंडमध्ये आपला देह त्यागला होता.

१६६६ : शिखांचे दहावे गुरु – गुरु गोविंद सिंग यांचा जन्म ( मृत्यू : ७ ऑक्टोबर, १७०८ )

‘चैन भोगिली घडोघडी, पण संसार झाला पडापडी |

लग्न लाविले कुटुंब केले, कळत असोनी टाकली उडी |

पायात बेडी बळे अडकवली येऊन नसल्या बारा नडी |

दिल्या झुगारून सगळ्या एकीकडे त्यामुळे रुसले खेळगडी |

हिरा हिरकणी होती जवळी एक विकली बाजारी तातडी’ |

लावणी सम्राट श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी – वेदपठणात पारंगत असणारे, जंगलीमहाराजांचा आपल्यावर कृपाप्रसाद आहे, असे म्हणणारे कलगीची सिद्धी प्राप्त आहे अशी हटश्रद्धा असणारे बापूराव एक कलावंत, प्रतिभाशाली सारस्वत म्हणून सतत आसक्ती आणि विरक्तीच्या हिंदोळ्यावर, तसेच श्रृंगार आणि आध्यात्माच्या हिंदोळ्यावर हेलकावे घेत असत. आपल्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा आणि आपणाकडून झालेल्या कृत्यांचा लेखाजोखा ते लेखणीतून मांडीत असत.
शिक्षण इंग्रजी चार-पाच इयत्तांपर्यंत. बापूराव ब्राह्मण असून त्यांच्याकडे कुलकर्णीपणाची वृत्ती होती. बडवे घराण्यातील सरस्वती नावाच्या स्त्रीशी त्यांचा विवाह झालेला होता ; परंतु तमाशाच्या आवडीमुळे त्यांचा व्यवसाय आणि संसार त्यांनी सोडून दिला.

स्वतःचा फड उभारून त्यात स्वरचित लावण्या व कवने पठ्ठे बापूराव ह्या नावाने म्हणू लागले. त्यांच्या फडात पवळा नावाची, महार जातीची एक सुंदर स्त्री होती. तिच्यावर त्यांचे अतोनात प्रेम होते. पठ्ठे बापूरावांनी गण, गौळण, भेदिक, झगड्याच्या, रंगबाजीच्या, वगाच्या इ. विपुल लावण्या रचिल्या. त्यांतील काही तीन भागांत प्रसिद्ध झाल्या आहेत (१९५८).तथापि त्यांची बरीचशी रचना आजही अनुपलब्ध आहे. बहुतेक तमाशांत पठ्ठे बापूरावांच्या लावण्या गायिल्या जातात आणि सगळे तमासगीर त्यांना पूज्य मानतात.

बापूरावांच्या आयुष्यातून पवळा निघून गेल्यानंतर त्यांचा तमाशाचा व्यवसाय हळूहळू ढासळत गेला. पुणे येथे ते निधन पावले.
सांस्कृतिक क्षेत्राने पठ्ठेबापूरावांना जणू बेदखलच केले. अभिजनांच्या अंगणातल्या वेदपठणाचा पठ्ठे बापूरावांचा गाता गळा बहुजनांच्या प्रांगणात गौळणी, लावण्या रचू लागला, गाऊ लागला. ‘श्रेष्ठ वर्ण मी ब्राह्मण असुनि सोवळे ठेवले घालुन घडी। हाती घेतली मशाल तमाशाची लाज लावली देशोधडी’ असे आपले वर्णन मोठ्या अभिमानाने त्यांनी स्वतःच केले आहे.

१९४५ : लावणी सम्राट श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा पठ्ठे बापूराव यांचे निधन ( जन्म : ११ नोव्हेंबर, १८६६ )

  • घटना :

६०९ : मुहम्मद यांनी पहिल्या प्रगटीकरणाचा दावा केला
१८५१ : भारतातील पहिली मालगाडी रुरकी येथे सुरु झाली
१८८५ : सामुराई इटो हिरोबुमी जपानचे पहिले पंतप्रधान झाले
१९२१ : भारतातील विश्वभारती विद्यापीठ सुरु झाले.

• मृत्यू :

१९७५ : लिफ्ट अपघातात संगीतकार वसंत देसाई यांचा मृत्यू ( जन्म : ९ जून, १९१२ )
१९९६ : संगीत समीक्षक व पत्रकार रामकृष्ण धोंडो तथा तात्या बाक्रे यांचे निधन
१९९७ : भावगीत लेखक निवृत्तीनाथ रावजी पाटील उर्फ पी सावळाराम यांचे निधन ( जन्म : ४ जुलै, १९१३ )
२००२ : व्यावसायिक व प्रायोगिक रंगभूमी अभिनेते दिलीप कुलकर्णी यांचे निधन
२०११ : मध्यमगती गोलंदाज वसंत रांजणे यांचे निधन ( जन्म : २२ जुलै, १९३७ )

  • जन्म :

१८५३ : भारतीय तत्वज्ञ सरदादेवी ( शारदा ) यांचा जन्म ( मृत्यू : २० जुलै, १९२० )
१८८७ : भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म ( मृत्यू : २६ एप्रिल, १९२० )
१९४७ : भारतीय फिरकी गोलंदाज दिलीप दोषी याचा जन्म.

आपला दिवस मंगलमय जावो.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »