गुरु पौर्णिमा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज गुरुवार, जुलै १०, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर आषाढ दिनांक १९, शके १९४७
सूर्योदय : ०६:०८ सूर्यास्त : १९:२०
चंद्रोदय : १९:१२ चंद्रास्त : चंद्रास्त नहीं
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माह : आषाढ़
पक्ष :शुक्ल पक्ष
तिथि : पौर्णिमा – ०२:०६, जुलै ११ पर्यंत
नक्षत्र :पूर्वाषाढा – ०५:५६, जुलै ११ पर्यंत
योग : इन्द्र – २१:३८ पर्यंत
करण विष्टि – १३:५५ पर्यंत
द्वितीय करण : बव – ०२:०६, जुलै ११ पर्यंत
सूर्य राशि : मिथुन
चंद्र राशि : धनु
राहुकाल : १४:२३ ते १६:०२
गुलिक काल : ०९:२६ ते ११:०५
यमगण्ड : ०६:०८ ते ०७:४७
अभिजितमुहूर्त: १२:१७ ते १३:१०
दुर्मुहूर्त : १०:३२ ते ११:२५
दुर्मुहूर्त : १५:४९ ते १६:४२
अमृत काल :००:५५, जुलै ११ ते ०२:३५, जुलै ११
वर्ज्य : १४:५२ ते १६:३३

॥गुरु वंद्य महान भगवा एकचि जीवन प्राण
अर्पण कोटी कोटी प्रणाम ॥

व्यासपौर्णिमेच्या दिवशी ‘ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे’ अशी प्रार्थना करून, त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत.

खरं गुरुपूजन, खरी गुरुपूजा म्हणजे गुरुंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जो बोध केला आहे, जी शिकवण दिली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे. सदगुरुंनी दाखवून दिलेल्या साधना मार्गाचा अभ्यास करणे, त्यांचा शब्द चालवणे म्हणजे खरे गुरुपूजन !
गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते, तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो –

गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥

जीवनाच्या प्रत्येक टप्प्या टप्प्यावर…

गुरूंचाच प्रभाव असतो आपल्या रहाण्या आणि वागण्या – बोलण्यावर…
गुरूच दूर करीत असतात जळमटे जमलेली आपल्या बुध्दीवर…
गुरूच शिकवत असतात आपल्याला विश्वास ठेवायला स्वतःवर…
गुरूच देतात वळण आपल्या जगण्याला घेऊन जातात यशाच्या शिखरावर…
गुरूच दाखवितात मार्ग आपल्याला सत्याची कास धरूण जाण्याचा मोक्षाच्या मार्गावर…

गुरूच देतात ताकद सर्वांना मात करण्याचीजीवनातील प्रत्येक संकटावर…
म्ह्णूनच गुरूपौर्णिमेच्या दिवशी वाहू याआपली निष्ठा, प्रेम, आदर आणि समर्पकता त्यांच्या चरणावर …

ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे । त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे ।
मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी । तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही ॥

“आज व्यास पौर्णिमा – गुरु पौर्णिमा आहे”

मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा
ह्सतमुखानं त्यांना या म्हणावं;
ऊंची, मखमली, आसनं देऊन
प्रेमानं बसा म्हणावं;
स्थानापन्न झाल्या की हळूच विचारावं,
काय घेणार ?
त्याही बेट्या मिस्कील ;
निष्पाप बालपणाचा आव आणून विचारतील,
काय देणार ?
मोकळेपणानं उत्तर द्यावं
मागाल ते तुमचंच…
– पद्मा गोळे

१९१३: कवयित्री पद्मा गोळे यांचा जन्म. (मृत्यू: १२ फेब्रुवारी , १९९८)

दत्तात्रेय लक्ष्मण पटवर्धन ऊर्फ डी लॅकमन पॅट उर्फ दत्तात्रय पटवर्धन – यांना आसपासच्या परिसरात ‘दत्तू’ म्हणून ओळखले जात असे. ५ वी नंतर त्यांचे वडील लखुतात्या यांनी त्यांना कोल्हापूरला पाठवले व पुढे मुंबईला गेले. मुंबईत ६ महिन्यांसाठी त्यांनी कुली म्हणून काम केले. माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये त्यांनी वायरमॅन म्हणून नोकरी मिळवली आणि शेवटी रेल्वे इंजिन ड्राइव्हर बनले.

ब्रिटीश राज्यामध्ये नोकरी मिळविण्यासाठी त्याने आपले नाव दत्तू पासून “डी लेकमन पॅट” असे नाव दिले होते. एके दिवशी सकाळी त्यांनी स्वत:ला कोळसाच्या बॅगमध्ये लपून ते “स्ट्रॅन्स फेलश” नावाच्या जर्मन जहाजावर पोहचले. जहाज समुद्र किनाऱ्यावर पोहोचल्यावर कॅप्टन हेनरिक जोदेल यांना भेटले आणि त्यांनी जहाजावरील वायरमॅन कम इंजिन देखरेख ठेवण्याचे काम केले.

हेनरिक जोदेलने त्यांची पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे सोबत घेतली व त्यांनी मरीन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हॅम्बर्ग येथे त्यांची नोंदणी केली. पदवी पूर्ण केल्यानंतर दत्तू स्कॉटलंडला गेले आणि त्यांनी “ओशन-किंग” नावाने दुसर्या जहाजात समुद्रात प्रवेश केला. १९११ पासून या जहाजाने लिव्हरपूल ते न्यूयॉर्क येथे प्रवास केला होता. त्यानंतर १९१२ मध्ये त्यांच्या तांत्रिक कौशल्यामुळे त्यांना ‘तुकाराम’ नावाच्या जहाजाचे इंजिन तयार करण्यासाठी मुंबई येथे पाठविले गेले.

१९१४ च्या सुरुवातीस प्रथम विश्वयुद्ध संपले तेव्हा दत्तू यांनी ब्रिटिश वॉर ऑफिसला कळविले आणि ‘एम्बुलन्स कॉर्प्स’ मध्ये प्रवेश केला.

त्याच्या निष्ठेमुळे त्याला सैनिक म्हणून पद देण्यात आले आणि “ससेक्स ब्रिगेड” मध्ये सामील होण्यासाठी सांगितले . त्यांनी तोफा, इतर शस्त्रे हाताळली. ते फ्रान्सच्या युद्ध मोर्चात सामील झाले . फ्रान्समध्ये असताना त्यांना ‘रॉयल वायुसेना’ मध्ये पायलट म्हणून सामील होण्यासाठी प्रोत्साहित केले गेले आणि वाहतूक आणि बॉम्बर विमान दोन्ही चालविणे सुरू केले.

त्या नंतर त्यांना तज्ज्ञ म्हणून ओळखले गेले. या कार्यकाळात दत्तूने जर्मनीची राजधानी बर्लिनवर विमानातून बॉम्ब वर्षाव केला होता.
त्याच्यावर गोळीबार होत असतानाही कसलीही पर्वा न करता ‘कैसर पॅलेस’ वर हल्ला केला होता. युद्धादरम्यान बर्लिनवर हल्ला करणारा प्रथम बॉम्बर पायलट म्हणून जगात ओळखले गेले.

या विलक्षण बहादुरतेसाठी त्यांना इंग्लंड चे राजा जॉर्ज ५ वे यांनी त्यांना “स्वॉर्ड ऑफ मिलिटरी ऑनर” हा बहुमान दिला .

दत्तूने राजा जॉर्ज ५ यांच्या समोर कबुल केले की सैन्यात प्रवेश घेण्यासाठी त्यांनी आपले नाव बदलले होते. राजाने त्याच्या खंबीरतेची प्रशंसा केली आणि त्याला “आमच्या वायुसेनातील एक यंग मराठा” असे संबोधले त्याच बरोबर त्यांनी असे आदेश दिले कि दत्तू यांच्या वर कसलीही कारवाई करण्यात येऊ नये. ही घटना २४ एप्रिल १९१९ ची.

दत्तूला आरएएफमध्ये लेफ्टनंट म्हणून पदोन्नती मिळाली. त्यांना १२००.०० प्रति मासिक वेतन मिळत होते. ‘माझ्या आयुष्यात हा एक महान क्षण आहे’ असे उद्गार काढले .

१९२१ साली मुंबईच्या राज्यपालांनी दत्तू यांना रॉयल अतिथी म्हणून दोन दिवस त्यांच्या निवासस्थानात आमंत्रित केले. नंतर दत्तू रत्नागिरीला परतले. अमरावतीच्या चंद्राताई शेवडे यांच्याशी विवाह केला. १९३० मध्ये ते निवृत्त झाले.

आरएएफमधील त्यांचे साहसीपणा आणि करियरचा हा संपूर्ण भाग २५ मार्च १९११ ला लंडन गॅझेटमध्ये प्रकाशित झाला. तसेच इंग्लंडचे वृत्तपत्र आणि ‘ग्राफिक’ यांनी १३ मे १९१९ रोजी त्यांचे लेख लिहिले. भारतात ‘केसरी’ दिनांक १३ मे १९१९ वृत्तपत्र मध्ये देखील त्यांचा लेख प्रसिध्द झाला.

“इंडिया फर्स्ट एविएटर” नावाचे पुस्तक १८ ऑक्टोबर २००३ रोजी प्रकाशित झाले. हे रत्नाकर शिवराम वाशीकर आणि अनंत रामचंद्र मराठे यांनी संयुक्तपणे लिहिले होते.

१९३९ साली द्वितीय विश्वयुद्ध सुरू झाल्यानंतर दत्तू यांना दिल्ली येथे अखिल भारतीय सैन्य, नौदल व वायुसेना अकादमी स्थापन करण्यास सांगण्यात आले. या अकादमीत दत्तू नी तीन सेवांच्या अनेक सैनिकांना प्रशिक्षित केले. १८ ऑक्टोबर १९४३ रोजी कर्करोगाने ग्रस्त असलेला हा धाडसी सैनिक मरण पावला.

त्यांची पत्नी आणि एकुलता एक मुलगा नागपूरमध्ये स्थायिक झाला होता. त्यांचे नातू प्रभाकर पटवर्धन आता आपली अभियांत्रिकी कंपनी कांदिवली येथे चालवत आहेत.
जेटीडी टाटा यांना नेहमीच १९२७ मध्ये विमान उड्डाण करणारे पहिले विमानवाहक म्हणून ओळखले गेले होते. परंतु दत्तूने १९१४ मध्ये बॉम्बर विमानाचे उड्डाण केले होते आणि स्वत: ला निष्णात केले होते. दत्तात्रय पटवर्धन यांचे १८ ऑक्टोबर १९४३ रोजी निधन झाले.

पहिला भारतीय वैमानिक या नावाने अ. रा. मराठे व रत्नाकर वाशीकर यांनी दत्तात्रय पटवर्धन यांच्यावर पुस्तक लिहिले आहे.

१८८३ : पहिले भारतीय वैमानिक दत्तात्रय लक्ष्मण पटवर्धन ऊर्फ डी लॅकमन पॅट यांचा जन्म ( मृत्यू : १८ ऑक्टोबर १९४३ )

  • घटना :
    १९१३: कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅलीमध्ये तापमान ५७ अंश सेल्सिअस पर्यंत वाढले, जे पृथ्वीवरील सर्वात उच्च तापमानाचे रेकॉर्ड आहे.
    १९२५: अवतार मेहेरबाबा यांनी मौनव्रताची सुरुवात केली सलग ४४ वर्षे हे व्रत मृत्यूपर्यंत पाळले.
    १९४०: बॅटल ऑफ ब्रिटन या नावाने ओळखले जाणारे हवाईयुद्ध सुरू झाले.
    १९६२: टेलस्टार-१ हा पहिला अमेरिकन दळणवळण उपग्रह प्रक्षेपित केला.
    १९७३: पाकिस्तानच्या संसदेने बांगलादेशला मान्यता दिली.
    १९७३: बहामाज देशाला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
    १९९२: आर्वी येथील विक्रम इनसॅट भू-केंद्र राष्ट्राला अर्पण केले.
    १९९२: संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या इन्सॅट-२ए या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोउरू येथून प्रक्षेपण झाले.
    २०००: नायजेरियात एका फुटलेल्या तेलवाहिनीत स्फोट होऊन गळणारे तेल गोळा करण्यासाठी आलेले २५० जण जळुन ठार झाले.

मृत्यू :
• १९६९: नाइट ऑफ द मिलिटरी ऑर्डर ऑफ सॅंटिएगो, पोर्तुगाल पुरस्कार सन्मानित इतिहासकार डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचे निधन. (जन्म: ३० मे ,१८९४)
• १९७१: भोजपुरी भाषेचे शेक्सपिअर भिखारी ठाकूर यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर ,१८८७)
• १९८९: साम्यवादी विचारवंत साहित्यिक प्रभाकर ऊर्ध्वरेषे यांचे निधन.
• १९९५: गरिबांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध डॉ. रामकृष्ण विष्णू केळकर यांचे निधन.
• २०००: भारतीय पत्रकार आणि राजकारणी वक्कम मजीद यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १९०९)
• २००५: पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट, १९३१)
• २०१३: ओडिसा साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय लेखक आणि शैक्षणिक गोकुलानंद महापात्रा यांचे निधन. (जन्म: २४ मे, १९२२)
• २०१४: पद्म भूषण पुरस्कार सन्मानित भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना आणि नृत्यदिग्दर्शक जोहरा सेहगल यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १९१२)

  • जन्म :
    १९०३: साहित्यिक रा. भि. जोशी यांचा जन्म.
    १९१० : मराठी संगीत नाटकांमध्ये काम करणारे मराठी गायक अभिनेते भार्गवराम भिकाजी ऊर्फ मामा आचरेकर यांचा जन्म ( मृत्यू : २७ मार्च १९९७ )
    १९२३: साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित कथालेखक जी. ए. कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर ,१९८७)
    १९३९ : मराठी लेखक, चरित्रकार आणि अभिनेते डॉ. विश्वास मेहेंदळे यांचा आज वाढदिवस
    १९४०: पद्म भूषण पुरस्कार सन्मानित अर्थशास्त्रज्ञ आणि इंग्लंडच्या हाऊस ऑफ लॉर्डस चे सभासद लॉर्ड मेघनाद देसाई यांचा जन्म.
    १९४९: पद्म भूषण पुरस्कार सन्मानित क्रिकेटपटू , समालोचक सुनील गावसकर यांचा जन्म.

SugarToday ला सहकार्य करा!

साखर उद्योगाबाबत होणारा अपप्रचार थांबावा आणि या क्षेत्राचे महत्त्व सर्वत्र अधोरेखित व्हावे म्हणून ‘शुगरटुडे’ मॅगेझीन सातत्याने प्रयत्न करत आहे. अशी सकारात्मक पत्रकारिता आपल्या सहकार्याखेरीज टिकणे शक्य नाही. आम्ही वेबसाइटवर गुगल जाहिराती जाणीवपूर्वक घेत नाही. कारण त्यामुळे वाचन करण्याचा आनंद हिरावला जातो. कोणतीही वेबसाइट उघडली की नको त्या जाहिराती तुम्हाला दिसतात, कधी आक्रंदणारी मुले-महिला, तर कधी अर्धनग्न महिलांच्या जाहिराती… तर कधी अश्लील मजकुराच्या जाहिराती…. त्यातून पैसे मिळतात; पण आपण जो विषय मांडतो, त्याचे गांभीर्य संपले, शिवाय वाचकाला विनाअडथळा बातमी वा लेख वाचता येत नाहीत. अशा आर्थिक कमाईचा आम्ही त्याग केला आहे आणि आपल्या पाठिंब्याची अपेक्षा करत आहोत.

खालील क्यूआर कोड स्कॅन करून आपणास शक्य तेवढी मदत करू शकता. हा क्यूआर कोड ‘शुगरटुड’ची प्रकाशन संस्था मास मीडिया एक्स्चेंजच्या बँक खात्याचा आहे.

आपल्या सहकार्याच्या प्रतीक्षेत – संपादक

SugarToday Help QR Code

(सोबत बँक खाते क्र. देखील दिला आहे. – Mass Media Exchange (MMx) – Publisher of SugarToday. Axis Bank, Dhankawadi Branch, Pune. ac no. 922020021151467, IFSC – UTIB0001168)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »