हर्षवर्धन पाटील : वाढदिवस शुभेच्छा

महाराष्ट्राचे माजी सहकारमंत्री, तसेच १९९५ ते २०१४ या मोठ्या कालावधीत विविध मंत्रिपदे भूषवणारे भाजप नेते, सदाहरित व्यक्तिमत्त्व हर्षवर्धन पाटील यांचा २१ ऑगस्ट रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’ परिवाराच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा!
श्री. पाटील हे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आहेत, तसेच एनसीडीसीचे संचालकही आहेत. ते तीन दशकांपासून साखर उद्योग क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांची आज एकसष्टी. त्यांना पुन्हा शुभेच्छा, साखर महासंघाला त्यांच्या नेतृत्वाखाली नवी दिशा मिळो, हीच सदिच्छा.