अशोक चव्हाणांसह ११ नेत्यांच्या साखर कारखान्यांना शेकडो कोटींची मदत

आवडल्यास ही बातमी शेअर करा

मुंबई : सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यावर राज्य सरकार मेहरबान आहे. नुकतेच भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाणांच्या सहकारी साखर कारखान्याला राज्य सहकारी बँकेकडून थकहमी पोटी १४७.७९ कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली.

याच सोबत अजित पवार यांना पाठिंबा देणारे कल्याण काळे, अमरसिंह पंडित आणि प्रशांत काटे यांना देखील राज्य सहकारी बँकेकडून आर्थिक मदत दिली. तसेच एनसीडीसी मार्फत ज्या भाजप नेत्यांच्या कारखान्यांना मदत देण्यात आली त्यात रावसाहेब दानवे, हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक यांचा समावेश आहे.

सध्या काँग्रेस मध्ये असलेले आणि भाजपला सातत्याने मदत होईल अशी भुमिका घेणारे धनाजीराव साठे यांच्या संत कुरूमदास सहकारी कारखान्याला ५९.४९ कोटी रुपयांची मदत देण्यात आली.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने मदत केलेले कारखाने
१) भाऊराव चव्हाण सहकारी कारखाना लक्ष्मी नगर नांदेड – १४७.७९ कोटी. व्यवस्थापन- अशोक चव्हाण
२) संत कुरुमदास सहकारी कारखाना पडसाळी सोलापूर – ५९.४९ कोटी. व्यवस्थापन – धनाजीराव साठे
३) वसंतराव काळे सहकारी कारखाना भाळवणी पंढरपूर- १४६.३२ कोटी. व्यवस्थापन – कल्याणराव काळे
४) छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर इंदापूर- १२८ कोटी. व्यवस्थापन- प्रशांत काटे
५) जय भवानी सहकारी साखर कारखाना शिवाजीनगर, गेवराई, बीड- १५० कोटी. व्यवस्थापन – अमरसिंह पंडित

एनसीडीसी मार्फत मदत मिळालेले कारखाने
१) शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर माळशिरस- ११३.४२ कोटी. व्यवस्थापन – विजयस्ािंह मोहिते पाटील
२) कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी कारखाना महात्मा फुले नगर इंदापूर- १५० कोटी. व्यवस्थापन – हर्षवर्धन पाटील
३) निरा भिमा सहकारी साखर कारखाना शहाजी नगर, रेडा इंदापूर- ७५ कोटी. व्यवस्थापन- हर्षवर्धन पाटील
४) शेतकरी सहकारी साखर कारखाना किल्लारी, लातूर- ५० कोटी. व्यवस्थापन- अभिमन्यू पवार
५) रामेश्वर सहकारी साखर कारखाना रावसाहेब नगर, जालना- ३४.७४ कोटी. व्यवस्थापन- रावसाहेब दानवे
६) भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर, सोलापूर- १२६.३८ कोटी. व्यवस्थापन- धनंजय महाडिक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »