साखरेची ICUMSA- ग्रेड

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार विकास महामंडळाचे एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी आणि साखर क्षेत्रावरील अनेक पुस्तकांचे लेखक श्री. मंगेश तिटकारे लिहिताहेत ‘शर्करायन’ या वाचकप्रिय सदरातून. यावेळी वाचा साखरेच्या इकुम्सा ग्रेडबाबत सर्व काही…
इकुम्सा (ICUMSA) International Commission for Uniform Methods and Sugar Analysisचे संक्षिप्त रूप आहे. ३० देशाहून अधिक सदस्य असलेली, साखरेची गुणवत्ता, शुद्धतेचे, रंगाचे निर्धारण करणारी संशोधन व अभ्यास करणारे एकमेव आंतरराष्ट्रीय संस्था आहे. साखर उद्योगातील विश्लेषणात्मक पद्धतींचे मानकीकरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय आयोग (ICUMSA) ही सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. तिची स्थापना १८९७ सालात जर्मनीत हॅम्बुर्ग येथे झाली. आंतरराष्ट्रीय व्यापार विवादांचे निराकरण करण्यासाठी विशेषतः कच्च्या साखरेतील सुक्रोज सामग्रीच्या ध्रुवीय निर्धारणा (polarimetric determination of sucrose content in Raw sugar) साठी तिची स्थापना करण्यात आली. साखरेची शुद्धता, साखरेच्या व्यापारासाठी एक सामान्य आंतरराष्ट्रीय भाषा तयार करण्याचा तिचा मुख्य उद्देश होता.
१९०० च्या दशकाच्या सुरुवातीला आयोगाने साखरेच्या विश्लेषणासाठी आंतरराष्ट्रीय पद्धतीचे संरेखन (aligning international methods for analyzing sugar) करण्यावर लक्ष केंद्रित केले. सुरुवातीच्या सत्रांमध्ये व्हिएना (१८९८), पॅरिस (१९००) आणि बर्लिन (१९०३) येथे सत्रांचे आयोजन करण्यात आलं.१९१२ मध्ये न्यूयॉर्क मधील ७ व्या सत्रात युएस ब्युरो ऑफ स्टँडर्डचे फ्रेडरिक बेट्स यांच्या सूचनेनुसार सॅकरी मीटर स्केलवर साखरेचे मोजमाप कसे करायचे यामध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा झाल्या. १९३०व्या दशकात मानकांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न झाले. १९३२ सालापर्यंत उत्पादकांनी त्यांच्या उपकरणांमध्ये आंतरराष्ट्रीय साखर स्केल आय.एस.एस. समाविष्ट करण्यास सुरुवात केली. दुसर्या महायुद्धाच्या काळानंतर १९४९ साला मध्ये ब्रुसेल्स येथे पुन्हा सत्र सुरू झाली, ज्याच्यामध्ये ऊस, बीट आणि साखरेच्या पद्धतीचे आधुनिकीकरण करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले. १९९७ सालात इकुम्सा ने जागतिक मानके स्थापित करण्याचे शंभरावे वर्ष म्हणजेच शताब्दी साजरी केली.
नियमित अद्ययावतीकरण

संस्था इकुम्सा पद्धती पुस्तक (ICUMSA Method Book) प्रकाशित करते आणि नियमितपणे ती अद्ययावत करते, ज्यामध्ये कच्च्या, पांढर्या आणि विशेष साखरेचे विश्लेषण करण्यासाठी तपशीलवार, प्रमाणित प्रक्रिया पद्धत असते. ‘इकुम्सा मेथड्स बुक’ मध्ये नमूद केलेल्या असंख्य पद्धतीमध्ये कोरड्या घनपदार्थांचे प्रमाण, रंग, साखरेचे प्रमाण कमी करणे आणि आर्सेनिक आणि तांब्यासारख्या धातूंची उपस्थिती यासारख्या महत्त्वाच्या पॅरामीटर्स निश्चित करण्यासाठी प्रोटोकॉल समाविष्ट असतात.
हे पुस्तक सारण्यांच्या स्वरूपात असून यामध्ये साखर विषयक बहुमूल्य सांख्यिकी समाविष्ट असते. वेगवेगळ्या साखर द्रावणांच्या अपवर्तन निर्देशकांबद्दल सुद्धा चांगली माहिती मिळते. ही माहिती केवळ रिफ्रेक्ट्रोमॅटीक माध्यमांद्वारे साखरेचे वैशिष्ट्यकरण करण्यास मदत करत नाही तर विविध उद्योगांमध्ये तिचा व्यापक वापर कसा होईल हे देखील शोधले जाते.
आधुनिक रिफ्रॅक्ट्रोमीटर अचूक वाचन रिडिंग प्रदान करण्यासाठी याचा वापर करतात. तापमान सुधारणा, घटक अचूकता सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

इकुम्साची रचना
इकुम्सा संस्थेच्या रचनेत जागतिक प्रतिनिधित्व असतं. या संघटनेत प्रमुख साखर आयात आणि निर्यात करणार्या देशाने नियुक्त केलेल्या राष्ट्रीय समित्यांचे प्रतिनिधी असतात. इकुम्सामधील मतदान प्रणालीची रचना अशी केलेली आहे की या प्रतिनिधींचा प्रभाव त्यांच्या संबंधित राष्ट्रांच्या साखर व्यापाराच्या प्रमाणात असतो, त्यामुळे संतुलित आणि समावेशक निर्णय प्रक्रियेला चालना मिळते. आयोगाचे नेतृत्व विविध राष्ट्रीय समित्यांमधील पंच करतात ज्यांचे नेतृत्व सात विषय आणि नऊ सामान्य विषय क्षेत्रामध्ये केली जाते.
हे विषय साधारणता-कच्ची साखर ,पांढरी साखर, विशेष साखरेचे उत्पादन, गुळ ,ऊस ,बीट ,ऊस प्रक्रिया ,बीट प्रक्रिया ,पांढरी साखर , लागवड, असे असतात. तर सामान्य विषयांमध्ये असोसिएशनचे लेख आणि उपविधी,पद्धतीचे स्वरूप, सहयोगी चाचणी आणि सांख्यिकीय उपचार, रंग, गढूळपणा आणि परावर्तन मापन, भौतिक पद्धती, रासायनिक पद्धती, सूक्ष्मजीवशास्त्रीय पद्धती, नमुना घेणे, हाताळणे आणि त्याची तयारी यासारखे असतात.दर दोन ते तीन वर्षांनी होणार्या सत्रांमध्ये नवीन किंवा सुधारित पद्धतींसाठीच्या शिफारशींवर चर्चा केली जाते आणि त्यांचा स्वीकार केला जातो.
ऐतिहासिक दृष्ट्या युरो-केंद्रीत असताना इकुम्साने सध्याच्या उद्योगाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जागतिक, स्वयंचलित आणि जवळ- अवरक्त Near infrared (NIR) पद्धतींचा समावेश वाढत्या प्रमाणात केला आहे. इकुम्सा साखर उद्योगाचा एक आधारस्तंभ म्हणून काम करते. ही संस्था साखर विश्लेषणासाठी केवळ प्रामाणिक पद्धती प्रदान करत नाही तर शाश्वत वाढ आणि ग्राहकांच्या विश्वासासाठी आवश्यक असलेल्या गुणवत्तेचे नियंत्रण आणि स्पर्धात्मकतेची संस्कृती देखील वाढवते.
साखर विश्लेषणासाठी स्वतंत्र तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट पद्धती शोधून काढणे, तिच्यात सतत सुधारणा करणे ही इकुम्साची प्राथमिक भूमिका आहे. इकुम्सा क्रमांक किंवा इकुम्सा रेटिंग हा साखरेच्या शुद्धतेचा एक उपाय आहे. कमी संख्या जास्त शुद्धता, (कमी रंग/ अशुद्धता) दर्शवते. एकूण साने १२४ पद्धती आणि मानके आणि त्यांचे तपशील विकसित केले आहे. ते वैयक्तिक पद्धती म्हणून मिळवता येतात किंवा इकुम्सा मेथड बुक्स मध्ये ते संकलित केले जातात.एकूण प्रथमतः तात्पुरत्या मंजुरीसाठी पद्धतींची शिफारस केली जाते.
आयोगाच्या सर्व आवश्यकता पूर्ण केल्यानंतर पद्धतींना अधिकृत दर्जा दिला जातो. ज्या पद्धती स्पष्टपणे उपयुक्त आढळल्या आहेत आणि त्यांचा उपयोग /उपयुक्तता आढळली आहे; परंतु त्यांच्या चाचण्या झालेल्या नाहीत, त्यांना स्वीकृत दर्जा दिला जातो. जिथे समान पॅरा मीटर आणि श्रेणीसाठी एकापेक्षा जास्त अधिकृत पद्धती अस्तित्वात असतात, त्यापैकी एका पद्धतीला अधिकृत संदर्भ दर्जा दिला जातो. २००२ सालात आपल्या देशात, पुण्यामध्ये २३ वे सत्राचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचे अध्यक्ष इटलीचे जी. व्हॅकारी हे होते व सरचिटणीस,जर्मनीचे एच. पुके हे होते, मागील वर्षी २०२५ सालात दिल्ली येथे ३४ वे सत्र पार पडले.या सत्राचे अध्यक्ष,नेदरलँडचे एम. लेइज्डेकर्स हे होते व सरचिटणीस जर्मनीचे डी मार्टीन हे होते.
इकुम्साचे आंतरराष्ट्रीय साखरेचे ग्रेडिंग हे त्याच्या द्रावणातील शुद्धतेबाबत व साखरेच्या रंगावर आधारित आहे. साखरेचे, मळीचे प्रमाण इ. वर आधारित १२१ पद्धतीने इकुम्साचे प्रमाण शोधता येते. RBU म्हणजे reference based unit ही संज्ञा त्याच्यासाठी वापरली जाते. इकुम्सा ग्रेडिंग ही देश व खंडासाठी वेगवेगळी असू शकते. इकुम्सा रेटिंग, साखरेची शुद्धता व रंग मोजते. ICUMSA ४५ ही ग्रेड सर्वात शुद्ध दर्जेदार पांढर्या साखरेची असते. (९९.८% सुक्रोज) ही ग्रेड सर्वात जास्त अन्न व पेयांमध्ये वापरली जाते.
इतर हलक्या दर्जाच्या साखरेचे एकूण चार रेटिंग दीडशे आरबीयू असू शकते ही रेटिंग पद्धत इन्स्टिट्यूट ऑफ शुगर अँड अल्कोहोल, ब्राझील या संस्थेने प्रमाणित केली आहे. जेवढी ५९ रेटिंग कमी तितकी जास्त शुद्धता असते. अशा अति शुद्ध साखरेची पोलारिटी ९९.८ असते, तर कमी शुद्ध १५० RBU रेटिंग असणार्या साखरेची पोलारिटी ९८.७ अशी असते.
अति शुद्ध साखरेत राखेचे प्रमाण कमी असते. ४५ RBU इकुम्सा साखरेत ते ०.०८% असते. इतर ग्रेडमध्ये १००-१५० स्टँडर्ड व त्याहून अधिक ६००-१०००+ यांचा समावेश होतो. ज्या गडद रंगाच्या कच्या साखर आहेत. VHP (very high polarization) जेवढी जास्त इकुम्सा रेटिंग RBU असेल तितकी त्या साखरेची प्रकाश परिवर्तन करण्याची क्षमता कमी असते व तितकी जास्त रसायने अशी साखर तयार करण्यासाठी वापरलेली असू शकतात.
इकुम्सा ४५ या अतिशुद्ध साखरेचा दर्जा (Specification) खालील प्रमाणे असतो.
| अ.क्र | तपशील | प्रमाण |
| १ | ICUMSA रेटिंग | ICUMSA 45 RBU (MAX) |
| २ | पोलरायझेशन | ९९.८०% |
| ३ | आर्द्रता | ०.०४% max by weight |
| ४ | राखेचे प्रमाण | ०.०४% max by weight |
| ५ | द्रावणशीलता | १oo % dry free fine flowing |
| ६ | रेडिएशन | नॉर्मल आंतरराष्ट्रीय मान्य मर्यादेत (No Cesiumor iodine) |
| ७ | मॅग्नेटिक कण प्रमाण | 4 mg/kg |
| ८ | सल्फर डायऑक्साइड | 20mg/kg min |
| ९ | रंग | चमकदार पांढरा (ICUMSA मेथड १९७८ प्रमाणे) |
| १० | दाणेदार पणा | Fine standard (0.44mm To 0.8 – 1.2mm) |
| ११ | द्रावणातील गाळाचे प्रमाण | नाही |
| १२ | वास | नाही |
| १३ | Reducing शुगर | ०.०५% Max by weight |
| Typical heavy Metal Limits | ||
| १४ | Max As | 1 PPM |
| १५ | Max Ps | 2PPM |
| १६ | Max Cu | 3 PPM |
ICUMSA100-150- अतिरिक्त, विशेष पांढरी दाणेदार साखर फूड ग्रेड मानली जाते, मोठ्या प्रमाणात बेकिंग पेये बनवण्यासाठी वा इतर अन्नपदार्थाच्या उत्पादनात वापरली जाते. ICUMSA६००-८०० खाणे योग्य तपकिरी चविष्ट साखर आहे. ICUMSA -८०० वरील दर्जाची साखर खाण्यायोग्य नाही. बॅक्टेरिया व इतर घटक या साखरेत असतात. अशुद्ध साखर ICUMSA१६००-२००० हा दर्जा खूप उच्च ध्रुवीकरण असलेल्या साखरेचा असतो.

ICUMSA 600 – 1200 Specification
| अ.क्र | तपशील | प्रमाण |
| १ | ICUMSA | 600 – 1200 |
| २ | पोलरायझेशन 20 °c ला | ९७.८०% ते ९९.२% |
| ३ | आर्द्रता ०.१५ % | ०.१५ % max by weight |
| ४ | द्रावणशीलता | ९५% dry free fine flowing |
| ५ | रेडिएशन | नॉर्मल आंतरराष्ट्रीय मान्य मर्यादेत |
| ६ | मॅग्नेटिक कण प्रमाण | १० mg/kg |
| ७ | सल्फर डायऑक्साइड | ६०mg/kg min |
| SO2 | १२० mg/kg | |
| ८ | रंग | तपकिरी चॉकलेटी गोल्ड |
| ९ | दाणेदार पणा | Solid brown Crustal |
| १ | वास | Free from unusual or a bnormal samell |
| २ | Re ducing. शुगर | ०.०५% Max by weight |
| ३ | Max As | 1 PPM |
| ४ | Max Ps | 2PPM |
| ५ | Max Cu | 3 PPM |
साखरेचे प्रमाण ०.०४ % max by weight
VVHP (very very high polarization)
ICUMSA-४६०० Max या दर्जाची साखर खूपच कच्ची आणि शुद्धीकरण करण्याची खूप आवश्यकता, अशा साखरेला असते. ही साखर पुनःप्रक्रियेसाठी रिफायनरीज मध्ये पाठवतात. इकुम्सा ग्रेड मोजताना ध्वनीलहरी, प्रकाश लहरींची अचूकता स्पेक्ट्रोफोटोमीटरने मोजतात. स्पेक्ट्रो फोटोमीटरने नमुना साखरेच्या द्रावणात सोडलेल्या गेलेल्या प्रकाशलहरींची अचूकता मोजतात .





