उसाच्या चोथ्यापासून बनविली शाई

आवडल्यास ही बातमी शेअर करा

डॉ. बाबासाहेब डोळे यांना ’पेटंट’

 छत्रपती संभाजीनगर :  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. बाबासाहेब निवृत्ती डोळे यांना ऊसाच्या चोथ्यापासून (बगॅस) पेनाची शाई बनविण्याच्या रसायनासाठी पेटंट जाहीर झाले आहे. या इको फ्रेंडली शाईचा व्यावसायिक पद्धतीने वितरण करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

 पदार्थविज्ञान विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. डोळे व तनया डोळे यांना यांना भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने पेटंट घोषित केले आहे.  कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. डोळे यांनी 6 एप्रिल 2024 रोजी पेटंट नोंदणीसाठी अर्ज केला होता.

डोळे हे गेल्या वीस वर्षांपासून पदार्थविज्ञान विभागात कार्यरत आहेत. तत्पूर्वी जेईएस महाविद्यालय, जालना व पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालय त्यांनी अध्यापन कार्य केले आहे. तसेच पदार्थविज्ञान विभागप्रमुख, अभ्यासमंडळ अध्यक्ष, विद्या परिषद सदस्य, खरेदी समिती, रिड्रेसल कमिटी आदी पदांवर त्यांनी काम केले आहे. तसेच ’बामुटा’ संघटनेचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले आहे. तसेच २ मे पासून ते परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

इको फ्रेंडली व देशी बनावटीची शाई: डॉ. डोळे

वेस्टपासून बेस्ट या अंतर्गत उसाच्या चोथ्यापासून शाई बनविण्याचे तंत्र विकसित करण्यात आले आहे. या शाईचे वैशिष्ट्य म्हणजे ही केमिकल मुक्त व इको फ्रेंडली अशी शाई असणार आहे. तसेच ही कागदावर लिहिल्यानंतर जास्त पसरणार नसून तिचे आयुष्यही जास्त दिवस असणार आहे. देशी बनावटीच्या या शाईचा वापर इंक पेन, बॉल पेन, पॅड व मुद्रणासाठी देखील आगामी काळात करता येणार आहे. तसेच उसाच्या चिपडापासून ही शाई  तयार करण्यात येत असल्यामुळे  अधिक स्वस्तही उपलब्ध करून देण्यात येईल. विद्यापीठाला पहिल्यांदाच प्रॉडक्ट बेस्ड पेटंट मिळाल्याचा आनंद असून कुलगुरू डॉ . विजय फुलारी यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन यामुळे हे शक्य झाले, अशी प्रतिक्रिया डॉ. बाबासाहेब डोळे यांनी व्यक्त केली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »