ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ‘एआय’ वापरासाठी बिनव्याजी कर्ज

आवडल्यास ही बातमी शेअर करा

विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण

कागल :  शाहू उद्योग समूहाचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे यांच्या ७७ व्या जयंतीच्या निमित्ताने ऊस पीक मार्गदर्शन व ‘ऊस शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळा आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना राजे बँकेमार्फत देण्यात येणाऱ्या बिनव्याजी कर्ज मंजुरी पत्रांचे वाटप अशा या संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे, उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील, संचालक रमेश माळी, सर्व संचालक-संचालिका, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे म्हणाले की, शाहू साखर कारखान्याचे संस्थापक राजे विक्रमसिंह घाटगे यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे उसाचे उत्पादन वाढवण्यासाठी विविध उपक्रम यशस्वीपणे राबवले. ऊस शेतीच्या खर्चात कपात करून उत्पादनात वाढ करण्यासाठी एआय तंत्रज्ञान यशस्वी ठरल्याचे सिद्ध झाले, त्यामुळे हे तंत्रज्ञान वापरामध्ये शाहू कारखाना अग्रेसर राहील. इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सहभागी होणे हीच त्यांना जयंतीच्या निमित्ताने श्रद्धांजली ठरेल. हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी अजूनही ज्या शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभागी व्हायचे आहे, त्यांनी कारखान्याकडे नोंदणी करण्याचे आवाहन घाटगे यांनी केले.  

शेती अधिकारी दिलीप जाधव यांनी स्वागत, ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले. संचालक युवराज पाटील यांनी आभार मानले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »