आंतरराष्ट्रीय योग दिवस

आज शनिवार, जून २१, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ दिनांक ३१, शके १९४७
सूर्योदय : ०६:०२ सूर्यास्त : १९:१९
चंद्रोदय : ०२:४२, जून २२ चंद्रास्त : १५:०७
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माह : ज्येष्ठ
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : योगिनी दशमी – ०७:१८ पर्यंत
क्षय तिथि : एकादशी – ०४:२७, जून २२ पर्यंत
नक्षत्र : अश्विनी – १९:५० पर्यंत
योग : अतिगण्ड – २०:२९ पर्यंत
करण : विष्टि – ०७:१८ पर्यंत
द्वितीय करण : बव – १७:५५ पर्यंत
क्षय करण : बालव – ०४:२७, जून २२ पर्यंत
सूर्य राशि : मिथुन
चंद्र राशि : मेष
राहुकाल : ०९:२१ ते ११:०१
गुलिक काल : ०६:०२ ते ०७:४२
यमगण्ड : १४:२० ते १६:००
अभिजितमुहूर्त : १२:१४ ते १३:०७
दुर्मुहूर्त : ०६:०२ ते ०६:५५
दुर्मुहूर्त : ०६:५५ ते ०७:४८
अमृत काल : १३:१२ ते १४:४१
वर्ज्य : १६:०९ ते १७:३७
वर्ज्य : ०४:३३, जून २२ ते ०६:००, जून २२
२१ जून ते २२ डिसेंबर हा काळ आहे जेव्हा सूर्य कर्क राशीतून मकर राशीत फिरतो जो उत्तरेकडून दक्षिण दिशेला असतो ज्याला दक्षिणायन म्हणतात. हा कालावधी २१ जूनपासून सुरू होतो आणि सहा महिन्यांपर्यंत चालू असतो ज्यामध्ये रात्र मोठी आणि दिवस लहान असतात.
दक्षिणायन प्रारंभ
पृथ्वीतलावर संगीत आवडत नाही, तसेच संगीताशी आपला काही एक संबंध नाही, असे म्हणणारा मनुष्य शोधून सुद्धा सापडणार नाही. तसं पाहिलं तर आपले आयुष्य संगीताच्या सप्तसुरांनी व्यापले आहे. वसुंधरेच्या प्रत्येक कणाकणात संगीत सामावले आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात नवचैतन्य संचारले आहे. संगीत नसेल तर माणसाचे जीवन क्षणभंगूर आहे. त्यामुळेच, की काय जागतिक पातळीवर ‘संगीत दिन’ मोठ्या हर्षोल्हासात साजरा केला जातो.
आज जागतिक संगीत दिवस आहे.
जगभरामध्ये आज जागतिक योग दिन साजरा करण्यात येत आहे. मानवी आरोग्यासाठी योग लाभदायी असल्याचे जगभराने मान्य केले आहे. अनेक आजारांवर योगा लाभदायी आहे हे आधुनिक वैद्यकशास्त्रानेही मान्य केले आहे. त्यातही सूर्यनमस्कार हा योगातील सर्वांग सुंदर व्यायाम समजला जातो. सूर्यनमस्काराने संपूर्ण शरिराचा आणि सोबतच श्वासाचा व्यायामही एकाच वेळी होतो. तुमच्याकडे जरी कमी वेळ असेल तर सूर्यनमस्कार हा सर्वोत्तम व्यायाम समजला जातो.
आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे.
|| देह -नश्वर किन्तु कृति के, रूप मे तुम तो अमर हो |
| हर हृदय मे ध्येय-निष्ठा की, तुम्ही उठती लहर हो ||
हे केशव तुम्हे प्रणाम……..
पूर्ण करेंगे हम सब केशव ! वह साधना तुम्हारी!!
|| आत्म हवन से राष्ट्र्देव की आराधना तुम्हारी
निशि दिन तेरी ध्येय – चिंतना |
आकुल मन की तीव्र वेदना
साक्षात्कार ध्येय का हो
यह मन कामना तुम्हारी||
||कोटी कोटी हम तेरे अनुचर
ध्येय मार्ग पर हुए अग्रसर|
होगी पूर्ण सशक्त राष्ट्र् की
वह कल्पना तुम्हारी||
||तुझसी ज्योती हृदय में पावें
कोटी – कोटी तुझसे हो जावें|
तभी पूर्ण हो राष्ट्र्देव की
वह अर्चना तुम्हारी!!
रा.स्व. संघाचे संस्थापक डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांचे महानिर्वाणानंतर (८५ वर्षानंतर सुद्धा ) संघ स्वयंसेवक संस्थापकाला त्यांनी योजिलेले कार्य पूर्ण करण्याची ग्वाही आज स्वयंसेवक त्यांना देत आहेत. परम पवित्र ध्वजाचे महत्व, संघाचे तत्व आणि राष्ट्र परं वैभवाला नेण्याचे उराशी असणारे स्वप्न साकारण्यासाठी संघ संस्थापकाच्या निर्वाणानंतर स्वयंसेवकांची सहावी पिढी आज देशभरच नव्हे विश्वभर कार्यरत आहे.
खरे म्हणजे हे कार्य सहज पणे उभे राहिलेले नाही. कोणत्याही सरकारची कृपा तसेच शासकीय निधी न मिळवता, कोणाचे कृपा मर्जीने नव्हे तर संघासाठी प्रचारकी जीवन जगणारे असंख्य ज्ञात / अज्ञात प्रचारक स्वयंसेवक, आपल्या नित्य दैनंदिन व्यवहारातील जास्तीत जास्त वेळ संघ शाखा चालवण्यासाठी वेळ देणारे संघ समर्पित स्वयंसेवक, तसेच संघाचे बद्दल सहानभूती असणारे असणारे असंख्य संघप्रेमी नागरिक यांचे बळावर संघटना वाटचाल करीत आहे. अशी वैचारिक पायाभूत भक्कम असणारे कार्यरत संघटन उभे करणाऱ्या संघ संस्थापकास विनम्र अभिवादन.
।। धूलिच्या कणांतुनी घोष हा उठे महा । स्पर्श होउनी तुझा देह धन्य हो अहा । वाट पाहता युगे अशी विभूति सापडे ।।
• १९४०: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल , १८८९)
- घटना :
१९४८: चक्रवर्ती राजगोपालाचारी पहिले भारतीय गव्हर्नर जनरल झाले.
१९६१: अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणारे यंत्र विकसित केले.
१९८९: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने देशाचा ध्वज जाळण्याची कृती आणि वाचा स्वातंत्र्याची अभिव्यक्ती असल्यामुळे वैध ठरवली.
१९९१: पी. व्ही. नरसिंह राव भारताचे ९वे पंतप्रधान.
१९९५: पर्यावरणक्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल पर्यावरणतज्ञ रश्मी मयूर यांना अमेरिकेतील द युनिटी इन योग इंटरनॅशनल या संस्थेने विशेष सन्मान जाहीर केला.
१९९८: फ्रँकफर्ट बुद्धिबळ महोत्सवात विश्वनाथन आनंदने फ्रिट्झ-५ या संगणकाचा पराभव केला.
२००६: नवीनच शोध लागलेल्या प्लूटोच्या उपग्रहांचे निक्स व हायड्रा असे नामकरण करण्यात आले.
२०१५: जागतिक योग दिनाची पराक्रमी सुरवात.
• मृत्यू :
• १९२८: सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार द्वारकानाथ माधव पितळे उर्फ नाथमाधव यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल , १८८२)
• १९८४: मराठी चित्रपट नाट्य अभिनेते अरुण सरनाईक यांचे निधन. (जन्म: ४ ऑक्टोबर, १९३५)
• २०१२: लेखक पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचे निधन. (जन्म: १२ जून, १९१७)
• २०१२: पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय छायाचित्रकार आणि पत्रकार सुनील जना यांचे निधन. (जन्म: १७ एप्रिल,१९१८)
- जन्म :
१९१२: पद्म भूषण पुरस्कार सन्मानित भारतीय लेखक व नाटककार विष्णू प्रभाकर यांचा जन्म.(मृत्यू: ११ एप्रिल ,२००९)
१९२३: मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक सदानंद रेगे यांचा जन्म. ( मृत्यू: २१ सप्टेंबर , १९८२ )
१९५८: भारतीय अभिनेत्री रीमा लागू यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे, २०१७)