नाना तथा जगन्नाथ शंकरशेट

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज मंगळवार, फेब्रुवारी १०, २०२६ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ २१, शके १९४७
सूर्योदय : ०७:०९ सूर्यास्त : १८:३६
चंद्रोदय : ०२:१०, फेब्रुवारी ११ चंद्रास्त : १२:२५
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : शिशिर
चंद्र माह : माघ
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : अष्टमी – ०७:२७ पर्यंत
नक्षत्र : विशाखा – ०७:५५ पर्यंत
योग : ध्रुव – ०१:४२, फेब्रुवारी ११ पर्यंत
करण : कौलव – ०७:२७ पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – २०:४३ पर्यंत
सूर्य राशि : मकर
चंद्र राशि : वृश्चिक
राहुकाल : १५:४५ ते १७:१०
गुलिक काल : १२:५३ ते १४:१९
यमगण्ड : १०:०१ ते ११:२७
अभिजित मुहूर्त : १२:३० ते १३:१६
दुर्मुहूर्त : ०९:२७ ते १०:१३
दुर्मुहूर्त : २३:३७ ते ००:२७, फेब्रुवारी ११
अमृत काल : २३:१२ ते ००:५९, फेब्रुवारी ११
वर्ज्य : १२:२५ ते १४:१२

नाना तथा जगन्नाथ शंकरशेट यांचा जन्म मुंबईत दैवज्ञ ब्राह्मण (साेनार) कुटुंबात झाला. पूर्वजांप्रमाणे त्यांनी व्यापार केला व अतिशय विश्वासू आणि प्रामाणिक व्यापारी असल्याची ख्याती मिळविली. अनेक अरब, अफगाण तसेच इतर परदेशी व्यापारी आपली भारतातील मालमत्ता बँकांकडे न देता शंकरशेट यांच्या हवाली करीत.नाना तथा जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे हे मराठी शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती होते.
नाना एक दानशूर व्यक्तिमत्त्व होते. समाजोपयोगी कार्यासाठी त्यांनी कधीच कुणाला रिकाम्या हाताने परत पाठविले नाही. मुंबई शहराच्या घडणीत त्यांचा मोठा वाटा मानला जातो.

बाँबे स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापना, मुंबई-ठाणे रेल्वेचा प्रारंभ, नाटकांचे प्रेक्षागृह, सोनापूरच्या स्मशानभूमीचे रक्षण याही गोष्टींचे श्रेय नानांनाच द्यावे लागेल. नानांनी अनेक मान्यवर संस्थांना देणग्या दिल्या : रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखेला रु. ५,०००; व्हिक्टोरिया ॲन्ड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयाला रु. ५,०००; जगन्नाथ शंकरशेट स्कूलला रु. ३०,०००; एल्फिन्स्टन शिक्षण निधीस रु. २५,००० आणि जिजामाता (राणीच्या) बागेसाठी रु. २५,०००. देशाच्या सर्वांगीण सुधारणेच्या सार्या चळवळींत पुढाकार घेणाऱ्या या थोर पुरुषाचा पुतळा जिजामाता बागेत उभारण्यासाठी लोकांनी स्वेच्छेने २५,००० रु जमविले होते. नानांचे वयाच्या बासष्टाव्या वर्षी मुंबईत देहावसान झाले. नानांच्या स्मरणार्थ मॅट्रिकला संस्कृत विषयात पहिला येणार्या विद्यार्थास जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृती देण्यात येऊ लागली.

१८०३: दानशूर व शिक्षणतज्ञ जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जुलै १८६५)

साहित्यिका व मानववंशशास्त्रज्ञ दुर्गा भागवत – १९२७ साली त्या मॅट्रिक उत्तीर्ण झाल्या. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सेंट झेवियर्स महाविद्यालय, मुंबई येथे झाले. १९३२ मध्ये त्या पहिल्या वर्गात बी.ए. (संस्कृत व इंग्रजी) झाल्या. १९२९ साली शिक्षण स्थगित करुन म.गांधीच्या राष्ट्रीय चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

१९३५ मध्ये त्या एम्.ए. झाल्या. त्यासाठी ‘इंडियन कल्चरल हिस्टरी’ शाखेत ‘अर्ली बुद्धिस्ट ज्युरिसप्रुडन्स’ या विषयावर त्यांनी प्रबंधलेखन केले. पीएच्.डी. च्या प्रबंधासाठी ‘सिंथिसीस ऑफ प्रूबंधासाठी सिंथिसीस ऑफ हिंदू अँड ट्रायबल कल्चर्स ऑफ सेंट्रल प्रॉव्हिंन्सेस ऑफ इंडिया’ या विषयावर त्यांनी संशोधन कार्य केले परंतु प्रबंध सादर केला नाही. त्यांच्या प्रबंधातील निवडक भाग परदेशी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाला होता.

म. गांधी, टॉलस्टॉय, हेन्री डेव्हीड थोरो, मिल, रॉबर्ट ब्राउनिंग, राजारामशास्त्री भागवत, डॉ. केतकर ही दुर्गाबाईंची काही प्रमुख प्रेरणास्थाने होत.
गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे येथे दोन वर्षे (१९५८-६०) समाजशास्त्रविभागाच्या प्रमुखपदी त्या होत्या. तसेच साहित्य-सहकार ह्या मासिकाचे वर्षभर (१९५७) संपादनही त्यांनी केले. हे अपवाद वगळल्यास त्यांनी संशोधन-लेखन यांसाठी नोकरी व्यवसायापासून मुक्तता घेतली. त्यांचा पहिला इंग्रजी ग्रंथ अर्ली बुद्धीस्ट ज्युरिस्पूडन्स (१९३८) हा होय. तसेच त्यांचा पहिला मराठी ग्रंथ राजारामशास्त्री भागवत. व्यक्तिचित्र व वाङमयविवेचन (१९४७) आणि पहिला मराठी ललितग्रंथ महानदीच्या तीरावर-गोंडजीवनावरील नवलिका-(१९५६) हा होय.

संशोधनपर वैचारिक लेखनाने दुर्गाबाईंनी लेखनास प्रारंभ केला. समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, लोकसाहित्यशास्त्र या विषयांवरील त्यांचे लेखन मुख्यतः इंग्रजीत आहे. भाषाशास्त्रावरील ए डायजेस्ट ऑफ कम्पॅरेटिव्ह फिलॉलॉजी (१९४०) बौद्ध व जैन धर्माच्या अभ्यासात हाती आलेल्या प्रेमकथांच्या अन्वयार्थांवर आधारित रोमान्स इन सॅक्रिड लोअर (१९४६) मानववंशशास्त्राचे परिचायक ए प्राइमर ऑफ अँथ्रॉपॉलॉजी (१९५०) भारतीय लोकसाहित्याच्या संशोधनावर आधारित ॲन आउटलाइन ऑफ इंडियन फोकलोअर (१९५६) व रिडल इन इंडियन लाइफ, लोअर अँड लिटरेचर (१९६६) हे त्यांचे काही इंग्रजी ग्रंथ. त्यांचे बरेचसे महत्त्वाचे लेखन लेखरूपांतही आहे.

हिंदुइझम अँड इटस् प्लेस इन द न्यू वर्ल्ड सोसायटी (१९४७) हा डॉ. केतकरांच्या समाजशास्त्रीय ग्रंथाचा दुर्गाबाईंनी केलेला अनुवाद होय.
१९७५ मध्ये कराड येथे भरलेल्या एक्कावन्नाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले त्यांच्या पैस ह्या ग्रंथास साहित्य अकादेमीचा पुरस्कार मिळाला आहे .
आणिबाणीच्या काळात दुर्गाबाईंनी लेखन विचारस्वातंत्र्याचा जोरदार पुरस्कार केला व त्यासाठी कारावासही पतकरला.
विद्वत्ता, ज्ञानसाधना, नवनिर्मिती यांचे अनुशासन नोकरशाहीच्या हाती असू नये व खऱ्या लोकशाहीची प्रतीमा सिद्ध करण्यास विचारवंतांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. मुक्ता (१९७७) व जनतेचा सवाल (१९७९) ही त्यांच्या त्या काळातील भाषण लेखांची संकलने आहेत.

१९१०: साहित्यिका व मानववंशशास्त्रज्ञ दुर्गा भागवत यांचा जन्म. (मृत्यू: ७ मे, २००२)

  • घटना :
    १९२३: टेक्सास टेकनॉलोजिकल कॉलेज सध्याचे टेक्सास टेक विद्यापीठाची स्थापना केली.
    १९२९: जे. आर. डी टाटा हे पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले.
    १९३१: भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली.
    १९३३: न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका मुष्टियुद्ध लढतीत प्रिमो कार्नेरा याने अर्नी शाफ याचा १३ व्या फेरीत पराभव केला. या लढतीत अर्नी शाफचा मृत्यू झाला.
    १९४९: पुणे विद्यापीठाची स्थापना.
    १९४९: गांधी-वध अभियोगातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निष्कलंक सुटका झाली.
    १९९६: आय. बी. एम. (IBM) कंपनीने बनवलेल्या डीप ब्लू या महासंगणकाने बुद्धीबळात गॅरी कास्पारॉव्हचा पराभव केला.
    २००५: उत्तर कोरियाने आपण अण्वस्त्रसज्ज असल्याचे जाहीर केले.

• मृत्यू :

• १९८२: विद्वान, टीकाकार आणि लेखक नरहर कुरुंदकर यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १९३२)
• २००१: जयपूर – अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १९०४)

  • जन्म :

१९४५: केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून २०००)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »