यशवंत साखर कारखाना कार्यकारी संचालकाच्या शोधात
पुणे : जिल्ह्यातील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याने कार्यकारी संचालकांसह काही पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या कारखान्याची अलीकडेच निवडणूक झाली असून, बंद कारखाना कार्यान्वित करण्याचे प्रयत्न नव्या संचालक मंडळाने सुरू केले आहेत.
कारखान्याला कार्यकारी संचालक, फायनान्स मॅनेजर, आणि दोन ड्रायव्हर त्वरित हवे आहेत. त्यासाठी थेट मुलाखती घेण्यात येतील. कार्यकारी संचालक पदासाठी साखर कारखान्यात पाच वर्षांचा जनरल मॅनेजर पदावर काम करण्याचा आणि कार्यकारी संचालक म्हणून ५ ते १० वर्षे काम करण्याचा अनुभव अशी अट घातली आहे.
तर फायनान्स मॅनेजरसाठी या पदावर ५ ते १० वर्षे कामाच्या अनुभवाची अट आहे. अर्जदारांनी स्वत:च्या संपूर्ण माहितीसह कारखान्याच्या ईमेलवर त्वरित अर्ज करण्याची सूचना कारखान्याने केली आहे.