कारगिल विजय दिन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शनिवार, जुलै २६, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक ४, शके १९४७
सूर्योदय : ०६:१३ सूर्यास्त : १९:१७
चंद्रोदय : ०७:२९ चंद्रास्त : २०:४०
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : वर्षा
चंद्र माह : श्रावण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : द्वितीया – २२:४१ पर्यंत
नक्षत्र : आश्लेषा – १५:५२ पर्यंत
योग : व्यतीपात – ०४:०६, जुलै २७ पर्यंत
करण : बालव – १०:५७ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – २२:४१ पर्यंत
सूर्य राशि : कर्क
चंद्र राशि : कर्क – १५:५२ पर्यंत
राहुकाल : ०९:२९ ते ११:०७
गुलिक काल : ०६:१३ ते ०७:५१
यमगण्ड : १४:२३ ते १६:०१
अभिजित मुहूर्त : १२:१९ ते १३:११
दुर्मुहूर्त : ०६:१३ ते ०७:०५
दुर्मुहूर्त : ०७:०५ ते ०७:५८
अमृत काल : १४:१६ ते १५:५२
वर्ज्य : ०४:०७, जुलै २७ ते ०५:४५, जुलै २७

कारगिल युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान इ.स. १९९९ च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादित युद्ध होते.

या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगिल व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली, त्यामुळे याला मर्यादित युद्ध म्हणतात. तसेच या पूर्वीच्या भारत पाक युद्धांप्रमाणेच याही युद्धात, युद्ध सुरू झाल्याची व संपल्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नव्हती. उलट पाकिस्तानतर्फे युद्धादरम्यान त्यांचा देश अलिप्त आहे असा कांगावा करण्यात आला होता. पुढे अनेक वर्षांनंतर हळूहळू पाकिस्तान सरकारने व अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी हे युद्धच होते असे जाहीर केले.

मे १९९९ मध्ये सुरू झालेले कारगिल युद्ध ७७ दिवस चालले. नियंत्रण रेषेपलिकडे घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी सैनिकांना भारतीय जवानांनी सडेतोड प्रतिउत्तर देत २६ जुलै १९९९ या दिवशी पाकिस्तानच्या चारी मुंड्या चीत केल्या. तेव्हापासून कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानी घुसखोरांवर २.५ लाख रॉकेट डागले. म्हणजे दररोज पाच हजार रॉकेट डागण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणावर रॉकेट केवळ दुस-या महायुद्धात डागण्यात आले होते. या युद्धात ३० हजार भारतीय जवान लढले त्यापैकी ५२७ शहिद, तर १३६३ जवान गंभीर जखमी झाले.

आज कारगिल विजय दिन आहे.

सख्या रे, सख्या रे सख्या रे घायाळ मी हरीणी

श्वास, सामना, गारंबीचा बापू, सरीवर सरी, एक डाव भुताचा असे गाजलेले चित्रपट आणि ‘घाशीराम कोतवाल’सारखी अजरामर नाट्यकृती संगीतबद्ध करणारे प्रयोगशील संगीतकार, प्रसिद्ध सतारवादक आणि अध्यापक म्हणजे भास्कर चंदावरकर. त्यांनी पं. रविशंकर व त्याच्या पत्नी अन्नपूर्णादेवी यांच्याकडून सतारवादनाचं शिक्षण घेतलं.

चित्रपट आणि संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि संशोधन करणाऱ्या जगातल्या मोजक्या जाणकारांमध्ये त्यांचं नाव आवर्जून घेतलं जायचं. त्यानंतर, त्यांना पश्चिमेकडचं संगीत खुणावू लागलं होतं. त्यामुळे टॉन द ल्यू, जोसेफ अँटोन रिडल आणि डिटर बॅच यांच्याकडून त्यांनी जॅझचे धडेही गिरवले होते.

संगीतामध्ये अनेक नवनवीन प्रयोग त्यांनी केले. विशेष म्हणजे प्रभा मराठे यांच्या दोन नृत्यनाटिकांसाठी दोन तासांचं दिलेलं संगीत चांगलंच गाजलं. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी १५ वर्षं संगीत प्रशिक्षक म्हणून काम केलं.

एकीकडे विद्यादानाचे काम सुरू असतानाच, १९७०पासून मराठी रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग करण्यासही त्यांनी सुरुवात केली होती. त्यापैकीच एक प्रयोग १९७२मध्ये क्लिक झाला. विजय तेंडुलकरांच्या ‘घाशीराम कोतवाल’ला त्यांनी दिलेले संगीत मराठी नाट्यरसिकांना भावले. आपोआपच चित्रपटांचा भव्य पडदा खुला झाल्याने चंदावरकर यांच्या प्रयोगशील वृत्तीला बहरच आला. मराठी, हिंदीसोबतच, पाश्चात्य चित्रपटांच्या पार्श्वसंगीताची जबाबदारीही त्यांनी उत्साहाने उचलली आणि ती यशस्वीपणे पेलली होती.

संगीतकार म्हणून ‘घाशीराम कोतवाल’च्या यशानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. त्यानंतर त्यांचा ‘सामना’ हा सिनेमा चांगलाच गाजला. ‘सामना’मधली त्यांची गाजलेली गाणी रसिक श्रोते कधीच विसरू शकणार नाहीत. ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ हे याच सिनेमातले गाणे. भारतीय संगीत आणि पाश्चात्य संगीताचा तौलनिक अभ्यास करून त्यांनी जगभर व्याख्यानं दिली.

भास्कर चंदावरकर यांची संगीतातले उत्तम जाणकार, देशी सांभाळणारा पण परदेशी संगीताची जाण असणारा संगीतकार म्हणून ओळख कायम राहणार आहे.

अनेक भारतीय भाषांमधले सुमारे ४० चित्रपट भास्कर चंदावरकरांनी आपल्या संगीतानं सजवले. मृणाल सेनचा ‘खंडहर’, अपर्णा सेनचा ‘परोमा’, अमोल पालेकरांचा ‘थोडासा रुमानी हो जाए’, विजया मेहतांचा ‘रावसाहेब’, जब्बार पटेलांचा ‘सामना’, ‘सिंहासन’, तसेच ‘आक्रित’, ‘कैरी’, ‘मातीमाय’ हे त्यापैकी काही विशेष गाजलेले चित्रपट. श्वास या चित्रपटासाठी चंदावरकरांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, तर संगीत नाटक अकादमी पुरस्कारानंही त्यांना गौरवण्यात आलं होतं.

२००९ : मराठी नाट्य चित्रपट संगीतकार भास्कर चंदावरकर यांचे निधन ( जन्म : १६ मार्च, १९३६ )

  • घटना :
    १५०९ : सम्राट कृष्णदेवराय यांनी विजयनगर साम्राज्याच्या पुनरुत्थानाची सुरवात केली
    १७४५ : इंग्लंडमध्ये गिल्डफोर्ड येथे महिलांचा पहिला क्रिकेट सामना झाला,
    १८४७ : लायबेरिया हा देश स्वतंत्र झाला.
    १९६३ : सिनकॉमया ह्या पहिल्या स्थिर उपग्रहाचे प्रक्षेपण

२००५ : जोरदार पाऊस पडला की मुंबईत पाणी साचणं हे मुंबईकरांसाठी नवीन नाही. मात्र त्या दिवशी भूतो न भविष्यती मुंबई परिसरात २४ तासात सुमारे ९९५ मिमी पाऊस पडला आणि सतत धावणा-या मुंबईकरांच्या लाईफला जणू ब्रेक लागला..

न विसरता येणारा भीषण दिवस. त्या प्रलयंकारी पावसाच्या आठवणींना १७ वर्ष होत असताना आजही आपण सुरक्षित नसल्याचीच भावना प्रत्येकाच्या मनात कायम आहे. याला जबाबदार आहे तो प्रशासनाचा धीमा आणि भोंगळ कारभार ! २६ जुलैच्या प्रलयात तब्बल १४९३ जणांचे बळी गेले आणि ४५० कोटींचे नुकसान झाले. त्यानंतर मिठीच्या मगरमिठीतून बाहेर पडण्यासाठी आजवर सुमारे २५०० कोटी खर्च झाले आहेत. तरी आजही मुंबईत पाणी तुंबत आहे. याचा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागत आहे.

२००८ : अहमदबाद बॉम्ब स्फोटात ५६ नागरिक मृत्युमुखी पडले तर २०० हुन अधिक जखमी झाले.

• मृत्यू :

२०१० : भारतीय राजकारणी शिवकांत तिवारी यांचे निधन ( जन्म : २० डिसेंबर, १९४५ )
२०१५ : भारतीय राजकारणी व वकील बिजॉय कृष्णा हांडिक यांचे निधन ( जन्म : १ डिसेंबर, १९३४)

  • जन्म :
    १८६५ : भारतीय कवी व संगीतकार रजनीकांत सेन यांचा जन्म ( मृत्यू : १३ सप्टेंबर, १९१०)
    १८९३ : ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. कृष्णराव शंकर पंडित यांचा जन्म ( मृत्यू : २२ ऑगस्ट, १९८९ )
    १८९४ : कवी व समाजसेवक वासुदेव गोविंद मायदेव यांचा जन्म ( मृत्यू : ३० मार्च, १९६९ )
    १९२७ : क्रिकेटपटू जी. एस. रामचंद यांचा जन्म
    १९२८ : भारतीय पाकिस्तानी कवी व लेखक इब्न – ए – सफी यांचा जन्म ( मृत्यू : २५ जुलै, १९८०)
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »