केदारेश्वर कारखाना निवडणूक बिनविरोध
शेवगाव : केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली असून, कारखान्यावर अॅड. प्रताप ढाकणे यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. सलग चौथ्यांदा कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी मंगळवारी (दि.6) १९ जागांसाठी १९ अर्जच शिल्लक राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाली. संचालक मंडळाच्या एकूण 19 जागांसाठी 49 अर्ज दाखल करण्यात आले होते. आता या निवडणुकीची केवळ औपचारिकता बाकी आहे.
बिनविरोध निवडून आलेल्या जागा व मतदारसंघ – सर्वसाधारण उत्पादक मतदारसंघ- बोधेगाव गट- प्रकाश गंगाधर घनवट, बाळू ज्ञानोबा फुंदे. हातगाव गट – भाऊसाहेब दादासाहेब मुंढे, सुरेशचंद्र विश्वासराव होळकर, अशोक निवृत्ती तानवडे. मुंगी गट – बापूराव भानुदास घोडके, श्रीमंत रंगनाथ गव्हाणे, रणजित पांडुरंग घुगे. चापडगाव गट – पांडुरंग हरिभाऊ काकडे, शिवाजी विश्वनाथ जाधव, सदाशिव हरिभाऊ दराडे. हसनापुर गट- ऋषिकेश प्रतापराव ढाकणे, माधव भीमसेन काटे. उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था प्रतिनिधी – प्रताप बबनराव ढाकणे. अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी – सुभाष कचरू खंडागळे.
महिला प्रतिनिधी – मीनाताई संदीप बोडखे, सुमनबाई मोहन दहिफळे. इतर मागासवर्ग प्रतिनिधी – तुषार शिवनाथ वैद्य. भटक्या विमुक्त व जाती जमाती प्रतिनिधी – त्रिंबक दत्तू चेमटे.